उन्हाळ्यात बर्याच हंगामी फळे आणि भाज्या उपलब्ध असतात विशेषत: ज्यांचा गुर्णधर्म थंड आणि जास्त पाण्याची पातळी असलेले आहेत. गरोदर महिलांनाही आरोग्याची काळजी घेण्यासाठी भरपूर भाज्या आणि ताजी फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. पण गरोदर महिलांनी देखील त्या काय खात आहेत आणि किती सेवन करतात याची काळजी घेणे आवश्यक आहे. म्हणूनच, आम्ही काकडीबाबत माहिती देणार आहोत. गरोदरपणात आई आणि तिच्या मुलासाठी काकडी पोषक तत्वांनी युक्त भाजी फायदेशीर आहे का हे जाणून घेणार आहोत.
गरोदरपणामध्ये महिलांसाठी काकडी खाणे आरोग्यदायी?
बाल पोषणतज्ञ मोना नरुला यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये त्यांनी काकडी “गरोदरपणामध्ये सर्वात आरोग्यदायी, कमी-कॅलरी स्नॅक्स” पैकी एक आहे असे सांगितले आहे. त्या पुढे सांगतात की,“ते फक्त खाण्यासाठी ताजेतवाने नाहीत तर तुमच्या बाळासाठी आणि तुमच्यासाठी अनेक आरोग्यदायी फायदे देखील देतात.
त्यांच्या मतानुसार, काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने ते शहीराला हायड्रेटेड करते आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. “काकड्यांमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, बी जीवनसत्त्वे आणि पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, जस्त यांसारख्या इतर खनिजांसह विविध सूक्ष्म पोषक घटक देखील असतात जे गर्भाच्या निरोगी वाढीसाठी आणि विकासासाठी महत्त्वपूर्ण असतात,” असे त्यांनी सांगितले आहे.
गरोदरपणामध्ये काकडी खाण्याचे तीन उत्कृष्ट फायदे देखील त्यांनी सुचविले आहेत.
१. काकडीमध्ये बी जीवनसत्त्वे भरपूर असतात, ज्याला फील गुड व्हिटॅमिन म्हणून ओळखले जाते कारण ते चिंता कमी करतात, तणाव कमी करतात आणि मूड सुधारतात.
२. काकडीमध्ये असलेले इलेक्ट्रोलाइट्स गरोदरपणात रक्तदाब पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात
३. एक लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ असल्याने, काकडी सोडियम पातळी कमी करण्यास मदत करते आणि द्रव संतुलन राखते ज्यामुळे रक्तदाब पातळी स्थिर होते.
Salt Side Effects: जेव्हा तुम्ही गरजेपेक्षा जास्त मीठ खाता तेव्हा काय होते?
काय सांगतात तज्ज्ञ?
काकडी सहसा कोणत्याही गरोदरपणातील आहाराचा भाग नसतात यावर भर देताना, नवी दिल्ली आणि वृंदावन येथील मदर्स लॅप IVF सेंटरमध्ये वैद्यकीय संचालक आणि IVF विशेषज्ञ असलेल्या डॉ शोभा गुप्ता यांनी नमूद केले की “तुम्ही पुरेश्या प्रमाणात कोणत्याही पदार्थाचे सेवन केले तर आरोग्यासाठी चांगले असते”.
गरोदरपणात काकडीचे सेवन करावे की नाही?
“काकडीचे सेवन केल्याने काही दुष्परिणाम होतात जसे की, भरपूर मीठ आणि पाण्यामुळे वारंवार लघवी होणे, ऍलर्जीची प्रतिक्रिया, अपचन आणि ढेकर येणे. परंतु साइड इफेक्ट्स बाजूला ठेवून, असे बरेच आरोग्यदायी फायदे आहेत ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही, विशेषत: गरोदरपणात,” असेही डॉ गुप्ता यांनी सांगितले.
त्यांनी असे देखील सांगितले की, काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने ते गरदोरपणा संबंधित निर्जलीकरण टाळण्यासाठी” मदत करतात. “काकडीमध्ये भरपूर फायबर असते; बद्धकोष्ठता आणि मूळव्याध, जे गरोदरपणामध्ये वारंवार समस्या असतात, परिणामी शक्यता कमी असते. व्हिटॅमिन बी, ज्याला ‘फील-गुड’ व्हिटॅमिन देखील म्हणतात, काकडीत मुबलक प्रमाणात असते. जेव्हा तुमचा मूड चांगला असतो, तेव्हा तुमचे बाळ अधिक निरोगी वाढते. शिवाय, काकडी रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी ओळखली जातात आणि त्यांच्यातील सोडियम आणि खनिज घटक रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात,” डॉ गुप्ता म्हणाले.