दिवसाची सुरुवात कशी करावी, याबाबत अनेक प्रश्न आहेत. त्यासाठी कोणतेही ठराविक नियम नाहीत पण शरीरातील पाण्याची पातळी राखण्यासाठी रोज सकाळी उठल्यानंतर पाणी पिण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. याबाबत जेव्हा फिटनेस कोच दीक्षा छाब्रा यांनी दिवसाची सुरुवात करताना डिटॉक्स ड्रिंक घेण्याचा सल्ला दिला तेव्हा खरेच याची गरज आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला.

”दिवसाची सुरुवात एक ग्लास डिटॉक्स ड्रिंकने करावी. जसे की “ग्रीन टी, कोमट लिंबू पाणी, जिरे-ओवा पाणी, रात्रभर भिजवलेले आल्याचे पाणी, काकडी किंवा लिंबू मिसळलेले पाणी” असे दीक्षा छाब्रा यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये सांगितले आहे. त्यांच्या मतानुसार, ”चांगले मॉर्निंग रुटीन वजन कमी करण्यास मदत करू शकते. ”

Fight Winter Cold Cough with lemon and clove water
Fight Winter Cold, Cough : घसा खवखवतोय, सर्दीसुद्धा झाली आहे? मग सकाळच्या कॉफीऐवजी ‘या’ पेयाने करा तुमच्या दिवसाची सुरुवात
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Five detox tips for rejuvenate your body
Post Diwali Detox Tips : सणासुदीला भरपूर गोड, तेलकट पदार्थ खाल्ले का? मग शरीर डिटॉक्स करण्यासाठी करून पाहा हे पाच उपाय
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
dudhi barfi recipe
अवघ्या काही मिनिटांत बनवा दुधी भोपळ्याची पौष्टिक बर्फी; वाचा साहित्य आणि कृती…
Dr Abhijeet and Dr Gauri Desais research for brown skin in America
… मोहे शाम रंग दई दे
Sweet or savoury breakfast
सकाळच्या नाश्त्यामध्ये गोड पदार्थ खावे का? त्याचा आरोग्यावर काय होतो परिणाम? तज्ज्ञांकडून घ्या जाणून…
स्त्री आरोग्य : मासिकपाळीचा त्रास
स्त्री आरोग्य : मासिकपाळीचा त्रास

चांगले मॉर्निंग रुटीन तुमच्या निरोगी राहण्यासाठी प्रोत्साहन देईल आणि तुमचा संपूर्ण दिवस चांगला जाण्यासाठी मदत होईल. सोशल मीडिया टाळण्यापासून ते डिटॉक्स ड्रिंक पिण्यापर्यंत आणि व्यायाम करताना संगीत ऐकण्यापर्यंत आणि नंतर वर्कआउटनंतरचे चांगले जेवण आणि स्नॅक्स घेतल्यास, तुमचा दिवस प्रॉडक्टिव्ह किंवा उत्साही होऊ शकतो,” असे छाब्रा यांनी सांगितले आहे.

म्हणूनच, आपल्या दिवसाची सुरुवात डिटॉक्स किंवा हर्बल ड्रिंक्सने करणे आवश्यक आहे की नाही हे समजून घेण्यासाठी आम्ही काही तज्ज्ञांशी संपर्क साधला.

याबाबत ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला जयपूर येथील नारायणा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या ज्येष्ठ आहारतज्ज्ञ, डॉ. सोनल भटनागर यांनी सांगितले की, ”मॉर्निंग रुटीनमध्ये हर्बल ड्रिंक्सचा समावेश असणे गरजेचे आहे की नाही हे वैयक्तिक प्राधान्ये आणि ध्येयांवर अवलंबून आहे.”

हेही वाचा – झोप पूर्ण न झाल्यास तुम्हाला व्हर्टिगोचा त्रास होऊ शकतो का? काय सांगते संशोधन, वाचा 

दिवसाची सुरुवात डिटॉक्स ड्रिंकने करावी का?


“हर्बल ड्रिंक्स, जसे की हर्बल टी किंवा infusions याचे सेवन त्यांच्या संभाव्य आरोग्य फायद्यांसाठी आणि दिवसाची सुरुवात ताजेतवाने करण्याचा एक मार्ग म्हणून केला जातो. पण, त्यांना आपल्या मॉर्निंग रुटीनमध्ये हे समाविष्ट करण्याचा निर्णय ही शेवटी प्रत्येकाची वैयक्तिक निवड आणि प्रत्येकाच्या लाइफस्टाइलच्या विविध घटकांवर अवलंबून असते,” असे डॉ. भटनागर यांनी सांगितले आहे.

हर्बल ड्रिंक्सचे आरोग्यासाठी आहेत अनेक फायदे-

डॉ. भटनागर यांच्या मते, हर्बल ड्रिंक्सचे आरोग्यासाठी विविध फायदे आहेत, ज्यामध्ये हायड्रेशन, विश्रांती (relaxation) किंवा विशिष्ट औषधी वनस्पतींशी संबंधित संभाव्य आरोग्य फायदे यांचा समावेश होतो. “उदाहरणार्थ, ग्रीन टी बहुतेकदा त्याच्या अँटिऑक्सिडंट्स गुणधर्मासाठी वापरली जाते, तर कॅमोमाइल चहा त्याच्या शांत गुणधर्मांसाठी( calming properties) ओळखला जातो. काही लोकांना असे आढळून आले आहे की, त्यांच्या मॉर्निंग रुटीनमध्ये हर्बल ड्रिंक्सचा समावेश केल्याने त्यांना अधिक उत्साही वाटण्यास मदत होते किंवा निरोगी असल्याची भावना जाणवते,” डॉ. भटनागर यांनी स्पष्ट केले.

प्रत्येक व्यक्तीसाठी त्याचा परिणाम वेगळा असू शकतो

”पण, हे लक्षात घ्या की, हर्बल ड्रिंकचा प्रभावीपणा( effectiveness) आणि विशिष्ट फायदे वैयक्तिक आणि विशिष्ट औषधी वनस्पतींचे सेवन यावर अवलंबून बदलू शकतात. काही लोकांना सकारात्मक परिणाम जाणवू शकतात, तर इतरांना कोणतेही महत्त्वपूर्ण बदल झाल्याचे लक्षात येत नाहीत. “याशिवाय, विशिष्ट औषधी वनस्पतींमुळे होणार्‍या कोणत्याही संभाव्य परस्परक्रिया ( potential interactions ) किंवा दुष्परिणामांचा विचार करणे आवश्यक आहे, विशेषत: जर तुम्हाला आधीपासून अस्तित्वात असलेली एखादी वैद्यकीय स्थिती असेल किंवा तुम्ही एखादे औषधे घेत असाल तर,” असे डॉ. भटनागर यांनी सांगितले.

हेही वाचा – सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा मेथीचे पाणी का प्यावे? काय सांगतात आहारतज्ज्ञ, जाणून घ्या…

रिकाम्या पोटी कोमट पाणी का प्यावे?

कोमट पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत आणि रिकाम्या पोटी त्याचे सेवन केल्यास फायदे वाढतात, असे नोंदणीकृत आहारतज्ज्ञ गरिमा गोयल यांनी सांगितले. “कोमट पाणी पिणे हा शरीराला डिटॉक्स करण्याचा एक चांगला मार्ग आहे; कारण ते आतड्यांमधून जमा झालेले विष आणि अन्नाचे अवशेष काढून टाकते आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळल्याने त्याला व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियमचा डोस मिळतो, रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याचा एक उत्तम मार्ग आहे,” असे गोयल यांनी सांगितले.