Peeled vs Unpeeled apple: सफरचंद खा आणि डॉक्टरकडे जाण्याच्या फेऱ्या वाचवा असं एक प्रसिद्ध वाक्य आहे. पण तुम्हाला माहित आहे का आहारशास्त्रानुसार तुम्ही काय खाता यापेक्षा तुम्ही किती व कसं खाता याला खूप जास्त महत्त्व आहे. आज आपण सफरचंदाच्या बाबत हा ‘किती व कसा’ नियम लागू होतो का हे पाहणार आहोत. डॉ. निरुपमा राव, पोषणतज्ञ, रेजुआ एनर्जी सेंटर, मुंबई यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सफरचंद सोलून खावे की न सोलता याविषयी मार्गदर्शन केले आहे. अनेकांना वेगवेगळ्या पद्धतीने फळं खाण्याची सवय असते. फळांच्या सालीची चव काहींना आवडत नाही तर काहींना आवडते पण आवडीपेक्षा त्याचे फायदे व तोटे काय आहेत याची माहिती असणे अधिक महत्त्वाचे आहे.

डॉ. निरुपमा सांगतात की, सफरचंदातील व्हिटॅमिन सी हे अधिक प्रमाणात सालीच्या खाली आढळते. म्हणून, फळाची साल काढून टाकल्याने पोषक मूल्यांचे नुकसान होऊ शकते. सालीमध्ये इतर अनेक पोषक आणि अँटिऑक्सिडंट्स देखील असतात, जे ऑक्सिडेटिव्ह तणावाचा सामना करण्यासाठी व आजारांना प्रतिबंध करण्यास मदत करू शकतात.

dead butt syndrome
तुम्हीही तासनतास बसून काम करता का? मग तुम्हाला होऊ शकतो डेड बट सिंड्रोम
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
readers comments on loksatta editorial readers reaction on loksatta articles
लोकमानस : लोकशाहीत टीका अविभाज्य घटक
loksatta editorial on union minister nitin gadkari says no more subsidies on electric vehicles
अग्रलेख : विजेला धक्का
Nitish Kumar
नितीश कुमारांना ‘एनडीए’शी प्रामाणिक असण्याबाबत का वारंवार द्यावं लागतंय स्पष्टीकरण? ‘त्या’मागचं राजकारण काय?
What does your eye discolouration say about your health? Dark Circles Solution
तुमच्या डोळ्यांचा रंग तुमच्या आरोग्याबद्दल काय सांगतो? जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात…
Take care of your scooter
‘या’ सोप्या टिप्सच्या मदतीने घ्या तुमच्या स्कुटीची काळजी; मिळेल जास्त अ‍ॅव्हरेज
ginger-lime benefits
आले-लिंबाच्या सेवनाने पचनाच्या समस्या दूर होतात का? वाचा, आहारतज्ज्ञ काय सांगतात….

डॉ उषाकिरण सिसोदिया, नोंदणीकृत आहारतज्ञ आणि क्लिनिकल पोषणतज्ज्ञ, नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, एक बाब लक्षात घ्यायला हवी, अनेकदा विक्रेते सफरचंद चमकदार दिसावे म्हणून सालीवर मेण वापरतात. शिवाय शेतकरी सुद्धा काहीवेळा कीटकनाशक वापरतात. यामुळे फळ खाण्याआधी स्वच्छ धुणे अत्यंत आवश्यक आहे.

डॉ. निरुपमा राव यांच्या माहितीनुसार, न सोलता सफरचंद खाल्ल्यास हे आहारातील फायबर, जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत ठरते. फायबर आणि अनेक पोषक द्रव्ये त्वचेमध्ये किंवा अगदी खाली असतात. तर डॉ राव यांच्या मते, ज्यांना पचनाचा त्रास असेल त्यांनी सोलून फळाचे सेवन करणे फायद्याचे ठरेल. त्यामुळे जर तुमचे पोट सालीचे पचन करू शकत असेल तर तुम्ही सालीसहित फळाचे सेवन करू शकता. शेवटी न सोलता किंवा सोळूनही सफरचंद खाण्याचे अनेक फायदे आहेत फक्त तुम्ही किती प्रमाणात सेवन करता हे लक्षात घ्यायला हवे.

हे ही वाचा<< Blood Cancer: रक्ताच्या कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे व चिन्हे ओळखा; ‘या’ लोकांना असतो सर्वाधिक धोका

दिवसाला किती सफरचंद खावे? (How Many Apples To Eat in a Day)

दिवसाला एक मध्यम आकाराचे सफरचंद खाणे हा सल्ला दिला जातो. डॉ. सिसोदिया सांगतात की, “निरोगी असताना तुमच्या रोजच्या आहारात १-२ मध्यम आकाराच्या सफरचंदांचा समावेश करणे उत्तम. फक्त एका फळावर अवलंबून न राहता अनेक फळे आणि भाज्या आहारात समाविष्ट करण्याची शिफारस केली जाते.”