नवरात्रीमध्ये अनेक जण उपवास करतात. काही जण उपवास करताना भरपूर पोषक घटक असलेले पर्याय शोधत असतात; जेणेकरून दिवसभराच्या धावपळीत त्यांची ऊर्जा टिकून राहील. असाच एक पर्याय सध्या बाजारात सर्वत्र पाहायला मिळत आहे आणि तो म्हणजे रताळे; ज्याला Sweet Potato, असेही म्हणतात. रताळ्यामध्ये भरपूर पोषक घटक असल्यामुळे तो उपवासासाठी एक चांगला पर्याय म्हणून ओळखला जातो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उपवास करताना रताळे खाण्याचे काय फायदे आहे हे जाणून घेऊ या.

याबाबत इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना अहमादाबाद येथील नारायणा मल्टिस्पेशालिटी हॉस्टिपलच्या क्लिनकल डायटेशिअन कन्सल्टंट, श्रृती भारद्वाज यांनी सांगितले की, “रताळे हे पोषकत्त्वांनी समृध्द आणि सर्वसमावेशक पदार्थ आहे जो तुम्ही नवरात्रीच्या उपवसादरम्यान किंवा वर्षभरात केव्हाही खाऊ शकता.”

“रताळ्यामध्ये नैसर्गिक गोडवा असतो तो शिजवून खाल्यानंतर आणखी वाढतो.” असे नर्चर(Nurture)च्या संस्थापक आणि हेल्थ आणि वेलनेस कन्सल्टंट, शिखा अग्रवाल यांनी सांगितले.

अग्रवाल यांनी सांगितले रताळ्याचे आणखी फायदे
६. अँटीऑक्सिटंड प्रॉपर्टीज :
रताळे हा अँटी ऑक्सिटंडने समृद्ध असलेला स्त्रोत आहे. जसे की, त्यामध्ये बीटा-कॅरोटीन (beta-carotene ) आणि अँथोसायनिन (anthocyanins) इत्यादी घटक आहेत. हे घटक दाह कमी करण्यास मदत करतात. हे दीर्घकालीन आजाराचा धोका ( chronic diseases) कमी करतात आणि निरोगी त्वचा आणि तारुण्य टिकवण्यास मदत करतात.
७. कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो : रताळ्यामध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो ज्यामुळे रक्तप्रवाहात हळू हळू साखर सोडली जाते. म्हणूनच मधुमेह असलेल्या व्यक्तीसाठी हा आदर्श पदार्थ ठरू शकतो आणि उर्जेची पातळी राखण्यास मदत करतो.
८. ह्रदयासाठी आरोग्यदायी पदार्थ: रताळ्यामध्ये असलेले पोटॅशिअम घटक हे स्ट्रोक(Strock) आणि उच्च रक्तदाब (Hypertention) होण्याचा धोका कमी करतात आणि ह्रदयाचे आरोग्य जपण्यासाठी मदत करतात. रताळ्यात असलेले व्हिटॅमिन सी घटक रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यास मदत करते.

हेही वाचा – नवरात्रीचे उपवास करताय? कसा असावा तुमचा आहार? मधुमेही अथवा गर्भवती महिलांनी उपवास करावा का?

भारद्वाज यांनी सांगितले रताळ्याचे फायदे
१. पोषकतत्वांनी समृद्ध : रताळे हे व्हिटॅमिन्स , मिनरल्सचा चांगला स्त्रोत आहे, यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, आणि पोटॅशिअमचा देखील समावेश होतो. २. उर्जा टिकून राहण्यास मदत करते : रतळ्यामधून कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटस असतात ज्यामुळे दिवसभर उर्जा टिकून राहण्यास मदत होते.
३. पचनक्रिया सुधारते : रताळ्यामध्ये फायबर्स असतात जे पचनास मदत करतात.
४. ग्लुटन मुक्त : रताळे नैसर्गिकरित्या ग्लुटन मुक्त आहे त्यामुळे जे ग्लुटनयुक्त पदार्थांच्या सेवन करू शकत नाही त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.
५. सर्मसमावेशक पदार्थ : तुम्ही रताळे वेगवेगळ्या पद्धतीने शिजवून खाऊ शकता जसे की, उकडून, भाजून किंवा रताळ्याचे चाट सारखे स्नॅनक्स तयार करून.

हेही वाचा – Navratri 2023 : गरबा किंवा दांडिया खेळताना हार्ट अटॅक येऊ शकतो का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या, काय काळजी घ्यावी? 

तुम्ही नवरात्रीमध्ये रोज रताळे खाऊ शकता का?
भारद्वाज यांच्या मतानुसार, “तुम्ही नवरात्रीमध्ये रोज किंवा इतर केव्हाही रताळे खाऊ शकता की नाही हे तुमच्या आहाराच्या निवडी आणि पोषकत्त्वांच्या गरजांवर अवलंबून असते. “

“तुमच्या संतुलित आहारातील एक भाग म्हणून तुम्ही ते आवडीने खात असाल तर रताळे रोज खाल्ले तर त्याने काही नुकसान होत नाही. फक्त तुमच्या संतुलित आहारात विविध प्रकारचे उपवासाचे पदार्थ असले पाहिजेत, जे तुमच्या शरीराला आवश्यक पोषकतत्वांचा पुरवठा करू शकतात याची काळजी घ्या”, असे भारद्वाज यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Should you have ratale or sweet potatoes or shakarkandi every day this navratri know what experts say snk
Show comments