दात आपल्या शरीराचा अविभाज्य भाग आहेत. आपले दात स्वच्छ, पांढरेशुभ्र व दुर्गंधीमुक्त असतील, तर लोकांवर आपल्या व्यक्तिमत्त्वाची वेगळी छाप पडते. शरीराच्या आरोग्याप्रमाणेच तोंडाचे आरोग्य राखणेदेखील अतिशय गरजेचे आहे. पांढरेशुभ्र आणि चमकदार दात आपले व्यक्तिमत्त्व आणखीनच चांगले बनवतात. तोंडासह एकूणच आरोग्यासाठी दात घासणे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे दातांमध्ये साचलेली घाण साफ होते. दात स्वच्छ राहिल्यास दात आणि हिरड्यांच्या आजारांचा धोका कमी होतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दातांसह तोंडाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपण सगळेच जण सकाळी उठल्या उठल्या ब्रश तर करतोच; परंतु आपल्यापैकी काही जणांना रात्री झोपण्याच्या आधीही ब्रश करण्याची सवय असते. आपले मौखिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी छोट्या-छोट्या गोष्टींद्वारे काळजी घेतली, तर त्याचा आपल्या आरोग्यावर खूप चांगला परिणाम दिसून येतो. आपले मौखिक आरोग्य उत्तम ठेवूनच एकूण आरोग्य सुधारता येते. परंतु विचार करा की, सकाळी उठल्या उठल्या तुम्ही दात घासले नाहीत, तर तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होईल? नेमक्या याच विषयावर डॉ. कमलेश कोठारी यांनी माहिती दिली आहे. त्याबाबत सविस्तर जाणून घेऊ.

(हे ही वाचा : ‘व्हिटॅमिन सी’ अति सेवनाचे दुष्परिणाम तुम्हाला माहिती आहेत का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या… )

डाॅक्टर म्हणतात, “तोंडात व्हिटॅमिन बी-१२ ची उपस्थिती हे एक गृहीतक आहे की, मौखिक पोकळीतील काही जीवाणू रात्रभर कोबालामिनचे संश्लेषण करू शकतात. तोंडातील जीवाणू काही प्रमाणात व्हिटॅमिन बी-१२ तयार करतात; परंतु एकूण बी-१२ स्तरावर लक्षणीय प्रभाव पाडण्यासाठी ते पुरेसे असण्याची शक्यता नाही. आपल्या शरीरात व्हिटॅमिन बी-१२ तयार होत नाही आणि ते आहारातून किंवा पूरक आहाराद्वारे पुरवावे लागते. व्हिटॅमिन बी-१२ सामान्यत: लहान आतड्यांत शोषले जाते आणि तोंडातील श्लेष्मल त्वचेद्वारे शोषण दर्शविणारा कोणताही ठोस पुरावा नाही किंवा बी-१२-उत्पादक जीवाणू असलेली लाळ गिळल्यास एकूण बी-१२ ची पातळी वाढू शकते. परंतु, या सिद्धान्ताला भक्कम वैज्ञानिक पुराव्यांचा आधार नाही, असे डॉ. कोठारी यांनी स्पष्ट केले.

मौखिक आणि संपूर्ण आरोग्य राखण्यासाठी व्हिटॅमिन बी-१२ महत्त्वाची भूमिका बजावते. त्याचे फायदे तोंडातील अल्सर रोखणे आणि हिरड्यांचे आरोग्य सुधारण्यापासून ते तोंडाच्या उतींच्या अखंडतेला न्यूरोलॉजिकल फंक्शन आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्यास समर्थन देतात. व्हिटॅमिन बी-१२ हे रक्तपेशी तयार करणे, डीएनए तयार करणे आणि चयापचय प्रक्रियेस मदत करणे ही कार्ये करते.

डॉ. कोठारी यांनी शिफारस केली की, मौखिक जीवाणूंचा व्हिटॅमिन बी-१२ स्तरावर होणारा परिणाम हे अजूनही चालू संशोधनाचे एक क्षेत्र आहे आणि सध्याच्या तोंडी स्वच्छतेची शिफारस अशी आहे की, दात किडणे आणि हिरड्यांचे रोग टाळण्यासाठी नियमित ब्रश करणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Should you skip brushing in the morning know from expert pdb
Show comments