Shreyas Talpade Heart Attack: ४७ वर्षीय अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर अँजिओप्लास्टी करण्यात आली. श्रेयस तळपदेची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती अभिनेत्याची पत्नी दीप्ती तळपदे हिने दिली आहे. अवघ्या ४७ व्या वर्षी श्रेयसला आलेला हृदयविकाराचा झटका हा ५० वर्षाखालील पुरुषांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. खरं तर, इंडियन हार्ट असोसिएशनच्या माहितीनुसार,भारतीय पुरुषांमधील हृदयविकाराच्या झटक्यांची ५० टक्के प्रकरणे ही ५० वर्षांपेक्षा कमी वयात आढळतात. यातील बहुसंख्य प्रकरणांमध्ये धमन्यांमधील अडथळे किंवा कार्डिअॅक अरेस्ट हे हृदयविकाराचे कारण असल्याचे समजतेय, या स्थितीमध्ये हृदयातील विद्युत आवेग (इलेक्ट्रिक इम्पल्स) अचानक बंद होतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्राप्त माहितीनुसार श्रेयस तळपदेला सुद्धा हृदयविकाराचा झटका येण्याआधी तो ठणठणीत वाटत होता, चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्याने काही अॅक्शन सीक्वेन्स शूट पूर्ण केले होते. सेटवरच अस्वस्थता जाणवल्यावर मग तो घरी गेला आणि त्याला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मणिपाल हॉस्पिटलमधील हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार व थोरॅसिक सर्जरी विभागाचे सल्लागार डॉ मोहम्मद रेहान सईद यांनी इंडियन एक्सस्प्रेसला माहिती देत सांगितले की, “धमन्यांमध्ये किती प्रमाणात प्लेक जमा झाले आहेत हे अनेकदा लक्षात येत नाही पण यामुळे कधीही समस्या निर्माण होऊ शकतात. काहीवेळा यामुळे होणाऱ्या रक्ताच्या गुठळ्या नुकसानदायक नसतात परंतु काहीवेळा यामुळे धमन्यांवर ताण येऊ शकतो, रक्त गोठण्याची शक्यता असते आणि मग याच गुठळ्या मोठ्या ब्लॉकेजमध्ये बदलतात. ही स्थिती साधारणपणे फूटपाथच्या शेजारी वाढणाऱ्या झुडुपांसारखीच असते, म्हणजे रोज ती झुडुपं रस्त्याच्या कडेला वाढत असतात पण एखाद्या दिवशी वादळासारखी स्थिती येते आणि ही झुडुपं रस्त्याच्या मध्ये येऊन पडतात व वाहतूक थांबवतात.”

श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका कशामुळे आला हे स्पष्ट माहित नसले तरी काही कारणे अशी आहेत ज्यांची लोकांना जाणीव असणे आवश्यक आहे. डॉ सईद सांगतात की, “अभ्यासात असे दिसून आले आहे, आनुवंशिकदृष्ट्या भारतीयांना पाश्चिमात्य देशातील लोकांपेक्षा एक दशक आधी हृदयविकाराच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. भारतीय प्रौढांमध्ये हृदयविकाराच्या समस्या ४० च्या दशकाच्या सुरुवातीच्या ते मध्यापर्यंत विकसित होतात आणि त्यामुळे त्यांना एनजाइना किंवा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो.”

अनुवांशिकदृष्ट्या भारतीयांमधील खराब कोलेस्टेरॉल (कमी घनतेचे लिपोप्रोटीन किंवा एलडीएल) आणि ट्रायग्लिसराइड्स सुद्धा अधिक असते, केवळ आहाराच्या सवयींमुळेच नाही तर हे काहीवेळा विशिष्ट एन्झाईमॅटिक कमतरतेमुळे होते. LDL हा प्लेक तयार करतो आणि ट्रायग्लिसराइड्स धमन्या कडक होण्यास किंवा त्यांच्या भिंती घट्ट होण्यास हातभार लावतात.

डॉ सईद म्हणतात, हे सर्व मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांमुळे आणखी गुंतागुंतीचे होते. आपल्याकडे अनेकांची जीवनशैली लहानपणापासूनच बैठी आणि अस्वास्थ्यकर असते जी आरोग्य समस्या आणि हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका निर्माण करते. कोणतेही अचानक झालेले बदल जसे की शारीरिक हालचाली सुरू करणे किंवा HIIT (उच्च तीव्रतेचे प्रशिक्षण) आणि जिमिंगमुळे हृदयाच्या धोकादायक स्थितीत वाढ होऊ शकते. इस्ट्रोजेनच्या संरक्षणात्मक शक्तीमुळे पुरुषांना महिलांपेक्षा हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण अधिक असू शकते.

हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे ओळखण्यास उशीर का होतो?

डॉ. सईद सांगतात की, हृदयविकाराच्या झटक्याची चिन्हे बहुधा विशिष्ट नसतात आणि आम्लपित्त, मज्जातंतू किंवा जठरासंबंधी वेदनांसारखीच जाणवतात, त्यामुळे काही वेळा हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे ओळखण्यास उशीर होऊ शकतो.

हृदयविकाराचा झटका वेळीच ओळखण्यासाठी कोणत्या चाचण्या घ्याव्या?

धमनीची सुस्थिती निश्चित करण्यासाठी सामान्य ईसीजी, इको आणि तणाव चाचणी फार प्रभावी ठरू शकत नाही. CT-कोरोनरी अँजिओग्राममध्ये कमी कॅल्शियम स्कोअर किंवा ३० टक्क्यांपेक्षा कमी ब्लॉकेज दिसणे हे कोरोनरी आर्टरी डिसीज (CAD) ची कमी जोखीम दर्शवणारे संकेत आहेत. म्हणूनच हृदयाची तपासणी करणे महत्त्वाचे आहे.

तसेच, तुमची मधुमेह स्थिती निश्चित करणे हा CAD दूर ठेवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. शिवाय, जर हृदयविकाराच्या समस्यांचा कौटुंबिक इतिहास असेल, तर तुम्ही तुमच्या २० व्या वर्षापासून नियमित मास्टर हेल्थ चेक-अप करून घ्या, अशी शिफारस केली जाते.

४० आणि ५० च्या वयोगटातील व्यक्तींनी दम लागणे, धडधडणे आणि बेशुद्ध होणे अशा घटनांमध्ये त्वरित हॉस्पिटल गाठायला हवे. आहाराव्यतिरिक्त, मध्यम व्यायाम आणि वजन व्यवस्थापन अनिवार्य नियम बनायला हवेत. आहाराचे भाग करायला हवेत, किमान सहा भाग हे चयापचयासाठी उत्तम ठरू शकतात. मद्यपान आणि धूम्रपान मर्यादित करणे हे सुद्धा अत्यंत आवश्यक आहे.