Amitabh Bachchan And Jaya Bachchan skincare : महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री जया बच्चन हे दोघेही भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांपैकी एक आहेत, ज्यांचे आजही लाखो चाहते आहेत. अमिताभ बच्चन यांचे वय ८१ वर्ष, तर जया बच्चन यांचे वय ७६ वर्ष असूनही आजही त्यांची त्वचा खूप चांगली आहे. याबाबत अमिताभ आणि जया बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन यांनी मोठा खुलासा केला आहे. अमिताभ आणि जया बच्चन यांच्या चांगल्या उत्कृष्ट त्वचेचे रहस्य तिने उघड केले आहे.

मीरा कपूरच्या यूट्यूब सीरिज ‘स्किन अँड विदिन’मध्ये माहिती देताना श्वेताने सांगितले की, “बच्चन कुटुंबाने त्यांच्या आरोग्याच्या दिनचर्येत मोहरीच्या तेलाचा समावेश केला आहे. मला माझ्या अनेक गोष्टींवर काम (सर्जरी) करायला आवडेल. परंतु, मला सुया आणि वेदनांची भीती वाटते; पण मी हे सर्व करण्यास सक्षम आहे की नाही ते मला माहिती नाही, म्हणून माझा एकच पर्याय आहे की, त्यामुळे मला माझ्या त्वचेची काळजी घेण्यासाठी खरोखर कठोर परिश्रम करावे लागतात. मला असेही वाटते की, “तुमची ८० टक्के त्वचा अनुवांशिक आणि आहारावर अवलंबून असते आणि माझे आई-वडील (अमिताभ बच्चन आणि जया बच्चन) यांची त्वचा खूप छान आहे.”

aishwarya rai and abhishek bachchan
“सेटवर आम्ही कधीच त्यांना…”, ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनबाबत अभिनेता म्हणाला, “त्यांच्या नात्यामुळे…”
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
actor jitendra joshi speech in Sarva Karyeshu Sarvada Event
सामाजिक काम करणाऱ्यांना आपलेसे करा!
Amitabh Bachchan shouted at R Balki
दिग्दर्शकाच्या करिअरच्या पहिल्याच सिनेमाचा पहिलाच सीन; चिडलेले अमिताभ बच्चन त्याच्यावर सर्वांसमोर ओरडलेले अन्…
salman khan reacted on aishwarya rai abhishek bachchan marriage
ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनशी लग्न केल्यानंतर सलमान खान म्हणालेला, “माझ्या आयुष्याचा एक…”
sushant singh rajput prateik babbar
सुशांत सिंह राजपूतने प्रतीक बब्बरला सांगितलेली ‘ही’ इच्छा राहिली अपूर्ण, खुलासा करत म्हणाला…
Amitabh Bachchan share school days memories in kaun Banega crorepati season 16
अमिताभ बच्चन होते बॅकबेंचर, शाळेच्या आठवणी सांगत म्हणाले, “मागे बसून मी आणि माझे मित्र…”
Amitabh Bachchan
अभिषेक बच्चनचे निम्रत कौरशी अफेअर असल्याच्या चर्चा; अमिताभ बच्चन यांनी अभिनेत्रीला लिहिलेले पत्र झाले व्हायरल

ती पुढे म्हणाली, “मला वाटतं एकच गोष्ट आहे जी ते दोघेही पाळतात, ते म्हणजे मोहरीचं तेल. माझी आई भरपूर मासे आणि सर्व काही खाते आणि बंगाली लोक आहारात मोहरीचे तेल वापरतात. माझे बाबा मोहरीचे तेल चेहऱ्यावर आणि शरीरावर वापरतात. त्यांनी कधीही त्यांच्या चेहऱ्यावर कॉस्मेटिक उपचार आणि प्रक्रिया केल्या नाहीत आणि मला वाटते की, वयाच्या ८१ आणि ७६व्या वर्षी त्यांची त्वचा खूप चांगली आहे.

हेही वाचा – “नवरात्रीमध्ये खा केळ्यांचे वेफर्स, खारीक अन् काजू-बदामाची पुरी”, सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकरचा सल्ला, तज्ज्ञांचे काय आहे मत?

मोहरीच्या तेलामुळे खरंच त्वचा चांगली होते का? श्वेता बच्चनने केलेल्या दाव्याबाबत तज्ज्ञ काय सांगतात, जाणून घेऊ या…

मोहरीच्या तेलाच्या त्वचेसाठी होणाऱ्या फायद्यांबद्दल एस्थेटिक क्लिनिक्समधील सल्लागार त्वचाशास्त्रज्ञ डॉ. रिंकी कपूर यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, “मोहरीचे तेल त्वचेचा रंग उजळवण्यासाठी, सुरकुत्या कमी करण्यासाठी मदत करते आणि त्वचेची लवचिकता (skin elasticity) सुधारते असे मानले जाते. काहींचा असा विश्वास आहे की, “ते चांगले रक्ताभिसरण वाढवते आणि डोळ्यांखालील काळेपणा गायब करण्यासदेखील मदत करू शकते.

“मोहरीचे तेल त्वचेच्या पेशींचे नूतनीकरण करण्यासदेखील मदत करते. फाटलेले ओठ आणि सुरकुत्या यांवर उपचार करण्यासाठीही अनेक जण मोहरीच्या तेलावर अवलंबून असतात. हे फायदे आशादायक वाटत असले तरी मोहरीचे तेल उत्कृष्ट त्वचा प्राप्त करण्यासाठी थेट योगदान देते; या दाव्यांचा आधार घेण्यासाठी कोणतेही ठोस वैज्ञानिक पुरावे नाहीत,” असेही डॉ. कपूर यांनी स्पष्ट केले.

“हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, फक्त मोहरीचे तेल फायदेशीर आहे असे मानले जाते, याचा अर्थ ते त्वचेसाठी फायदेशीर आहे हे सिद्ध होत नाही,” अशी चेतावणी डॉ. कपूर यांनी दिली.

हेही वाचा – फ्रिजमध्ये किती दिवस भात ठेवू शकतो? फ्रिजमध्ये भात ठेवताना कसा ठेवावा? तज्ज्ञांनी केला खुलासा

प्रत्येकाने मोहरीचे तेल वापरावे का? (Should everyone use mustard oil)

मोहरीच्या तेलाच्या फायद्यांची यादी आकर्षक वाटत असली तरीही डॉ. कपूर सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देतात. “प्रत्येकाने त्वचेवर मोहरीचे तेल वापरणे टाळावे. सोशल मीडियावरील ट्रेंड किंवा व्हायरल पोस्ट पाहून त्याचे अनुसरण करणे धोकादायक असू शकते. मोहरीच्या तेलासह अनेक घरगुती उपचारांवर त्वचेची काळजी घेण्यासाठी त्यांची प्रभाविता किंवा सुरक्षितता सिद्ध करण्यासाठी व्यापक संशोधन झालेले नाही. मोहरीचे तेल काही लोकांसाठी फायदेशीर ठरत असले तरी त्याचे परिणाम प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळे असू शकतात.”