वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेकजण डाएटमध्ये सॅलेडचा समावेश करतात. सॅलेडमध्ये पौष्टिक फळं आणि भाज्यांचा समावेश केला जातो. पण यात मिठाचा वापर सर्रास केला जातो. ज्यामुळे या पदार्थांची पौष्टिकता कमी होण्याबरोबरच ते आरोग्यासाठीही हानीकारक ठरू शकते. त्यामुळे सॅलेडमध्ये मीठ न टाकण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे आरोग्यावर काय दुष्परिणाम होऊ शकतात जाणून घ्या.
सॅलेडमध्ये मीठ टाकल्याने होणारे दुष्परिणाम
आणखी वाचा: मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये चुकूनही करू नका ‘हे’ पदार्थ गरम; आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक
शरीरातील मिठाचे प्रमाण वाढू शकते
सॅलेडमध्ये मीठाचा समावेश केल्यास शरीरातील मिठाचे प्रमाण वाढू शकते. सामान्यतः एका व्यक्तीला दिवसभरात पाच ग्रॅम मिठाची गरज असते, ही गरज जेवणातील अन्नपदार्थांमधून पूर्ण होते, त्यामुळे जर फळ किंवा सॅलेडमध्ये मिठाचा समावेश केला तर शरीरातील मिठाचे प्रमाण वाढू शकते. यामुळे उच्च रक्तदाब, हृदयाचे विकार अशा समस्या उद्भवू शकतात.
पोषकतत्त्व
मिठामुळे सॅलेड बनवण्यासाठी वापरण्यात आलेल्या फळांमधील, भाज्यांमधील पोषकतत्त्व कमी होऊ शकतात. मीठ टाकल्यानंतर फळांमधून पाणी बाहेर पडत असल्याचे तुम्ही पाहिले असेल, यामुळे त्यातील पोषकतत्त्व निघून जातात.
वॉटर रिटेंशन
सॅलेडमध्ये मीठ टाकल्याने वॉटर रिटेंशनचा त्रास होऊ शकतो. हा त्रास शरीरातील मिठाचे प्रमाण वाढल्याने होऊ शकतो.
आणखी वाचा: सतत होणाऱ्या डोकेदुखीमुळे त्रस्त आहात? त्यामागे असू शकतात ‘ही’ कारणं लगेच जाणून घ्या
किडनी निगडीत समस्या उद्भवू शकतात
सॅलेडमध्ये मिठाचा समावेश केल्याने, शरीरातील सोडियमचे प्रमाण वाढवून किडनीची समस्या उद्भवू शकते. शरीरातील मिठाचे प्रमाण वाढल्याने शरीरातील पाणी युरीन आणि कामाच्या स्वरूपात बाहेर पडते ज्यामुळे किडनी निगडीत समस्या उद्भवण्याची शक्यता असते.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)