Simple neck massage for headache: जर तुम्ही डेस्क जॉब करत असाल तर तुम्हाला मानेच्या दुखण्याचा सामना करावा लागू शकतो. पण, फक्त काही मनिटे मसाज केल्याने तुम्हाला यातून आराम मिळू शकतो. चला तर मग कंटेंट क्रिएटर विक्टोरिया लेगकुन यांच्याकडून एक जलद मसाज टेकनिक शिकून घेऊ या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

फक्त एक हात आपला डोक्याच्या मागे ठेवून, मानेच्या प्रत्येक बाजूस सौम्य दाब देऊन मसाज करा.

विक्टोरिया लेगकुनच्या मते, मानेचा मसाज केल्याने अनेक आरोग्य फायदे होऊ शकतात.

ताण कमी करतो : मानेचा मसाज मसल्सचा ताण आणि जडपण कमी करण्यात मदत करू शकते, ज्यामुळे आराम मिळतो आणि शारीरिक ताण हलका होतो.

डोकेदुखी कमी करते : मसाज मानेच्या मसल्समधील ताण हलका करू शकते, जो डोकेदुखीला कारणीभूत असू शकतो.

रक्त संचार सुधारतो : मानेचा मसाज रक्तप्रवाह वाढवतो, ज्यामुळे मसल्स आणि टिश्यूजला ऑक्सिजन आणि पोषणतत्त्वे चांगले मिळू शकतात.

लवचिकता वाढवते : नियमित मानेचा मसाज गळा आणि खांद्यांची हालचाल सुधारू शकते, ज्यामुळे जडपण टाळता येते.

ताण कमी करतो : मसाज एंडोर्फिन्सचे (endorphins) स्त्राव वाढवते, ज्यामुळे आराम मिळतो आणि ताण आणि चिंता कमी होतात.

मानेच्या वेदनेपासून आराम : ज्यांना मानेची दीर्घकालीन वेदना आहे, त्यांना रक्तप्रवाह सुधारून आणि टाईट मसल्स रिलॅक्स करून मसाजमुळे तात्पुरता आराम मिळतो.

चांगलं पोस्चर (Better posture) : नियमित मसाज केल्याने मान आणि खांद्यांच्या स्थितीबद्दल अधिक जागरूक राहण्यास मदत होऊ शकते, ज्यामुळे ताण कमी होतो.

तणाव कमी करतो : मानेची मसाज केल्याने शिरेवर दबाव पडतो, ज्यामुळे वेदना कमी होऊ शकते.

हेही वाचा… चहा ठरेल पिंपल्स, केसगळती आणि काळे डाग घालवण्यासाठी सर्वोत्तम उपाय! कॉन्टेन्ट क्रिएटरच्या ‘या’ रेसिपीवर तज्ज्ञ म्हणाले…

मानेची मसाज खरच खूप फायदेशीर आहे का?

“नियमित मानेची मसाज रक्तप्रवाह आणि लिम्फॅटिक ड्रेनेज (lymphatic drainage) सुधारू शकते, तसेच सूज आणि मसल्सच्या वेदना कमी करू शकते,” असे डॉ. अनुप खत्री, सीनियर कन्सल्टंट, ऑर्थोपेडिक्स, ग्लिनिगल्स हॉस्पिटल, परळ, मुंबई यांनी सांगितले. “तुम्हाला ताजेतवाने आणि उत्साही वाटेल. डोकेदुखी दूर करणे आणि मानेच्या वेदनेपासून आवश्यक आराम मिळवणे या मसाजमुळे शक्य आहे. नियमित मानेच्या मसाजचे फायदे स्वीकारल्याने नर्व्ह कम्प्रेशनपासून (nerve compression) आराम मिळवणे शक्य होईल”, असे डॉ. खत्री म्हणाले.

डॉ. खत्री यांच्या मते, मानेचा मसाज पोस्चर सुधारण्यास मदत करते.

काय लक्षात ठेवावे?

व्यायाम करताना तुमच्या हालचाली सौम्य ठेवणं महत्त्वाचं आहे. “खूप दबाव लागू करू नका. मानेशी संबंधित काही समस्या, इजा, कंबरदुखी, मानेची शस्त्रक्रिया किंवा रक्ताच्या गाठींचा आजार असलेल्या व्यक्तीला मसाज करणे टाळा,” असे डॉ. खत्री म्हणाले. त्यांनी हे देखील सांगितले की, मुलांच्या मानेचा मसाज टाळावा, कारण त्यांची मान नाजूक असते आणि तीव्र वेदना होऊ शकतात.