तुम्ही जर डेस्क जॉब करत असाल, ज्यामुळे दिवसभरातील बराच काळ तुम्ही बसून असता, तर तुम्हाला दीर्घकाळ बसून राहण्यामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांचा धोका असण्याची चिंता वाटू शकते. ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोर्टस मेडिसनच्या नव्या संशोधनातून काही चांगले निष्कर्ष समोर आले आहेत. यानुसार, आपल्या दिनक्रमामध्ये रोज सोपे व्यायाम आणि काही वेळ विश्रांती घेतली तर आपल्या बैठ्या जीवनशैलीमुळे निर्माण होणारा धोक्यांचा सामना करण्यास मदत होऊ शकते.

नॉर्वेमधील ट्रॉ (Trom) विद्यापीठ आणि डेन्मार्कमधील आरहस ( Aarhus) विद्यापीठातील संशोधकांनी हा अभ्यास केला आहे. या अभ्यासामध्ये नॉर्वे आणि स्वीडनमधील ५० किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींनी केलेल्या व्यायामाच्या सत्रांमध्ये मिळणाऱ्या फायद्यावर विशेष भर दिला होता.

Woman dies after falling off her bike in Kondhwa Pune news
कोंढव्यात दुचाकी घसरुन महिलेचा मृत्यू; दुचाकीस्वार पती जखमी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
I don’t believe in work-life balance Narayana Murthy stands firm on 70-hour workweek
“माझा वर्क-लाइफ बॅलन्सवर विश्वास नाही”; आठवड्यातील ७० तास काम करण्याच्या मतावर नारायण मूर्ती अजूनही ठाम
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
How exercising for 2-3 days may help reduce risk of Alzheimer’s Alzheimer Disease exercise
व्यायामामुळे ‘अल्झायमर’चा धोका कमी होऊ शकतो; डॉक्टरांनी सांगितले व्यायाम प्रकार
History Of Tipu Sultan
एका रात्रीत ८०० मंड्यम अय्यंगारांची हत्या; ‘नरक चतुर्दशी’ हा दिवस शोकदिवस का ठरला?

संशोधनाचे निष्कर्ष अत्यंत स्पष्ट होते. जे लोक १२ तासांपेक्षा जास्त काळ बसून होते, त्यांचा लवकर मृत्यू होण्याचा धोका ३८ टक्के जास्त होता. पण, रोज २० ते २५ मिनिटे व्यायाम करून हा धोका लक्षणीयरित्या कमी करता येऊ शकतो.

हेही वाचा – दुपारच्या जेवणानंतर झोपण्याची इच्छा होते का? महिलांमध्ये ही इच्छा खूप तीव्र का होते? तज्ज्ञांकडून जाणून घ्या… 

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यायाम खूप तीव्र असण्याची आवश्यकता नाही. वेगाने चालणे, आरामात सायकल चालवणे किंवा अगदी लहान मुलांसोबत किंवा पाळीव प्राण्यांसोबत खेळणे यांसारख्या साध्या हालचालींमुळेदेखील लक्षणीय फरक पडू शकतो. अर्थात, तीव्र हालचाल करण्याचे जास्त फायदे मिळू शकतात, पण फक्त चालण्यासारखा सोपा व्यायाम केला तरी त्याचा सकारात्मक प्रभाव पडू शकतो.

फरिदाबादच्या फोर्टिस एस्कॉर्ट हॉस्पिटलमध्ये इंटरनल मेडिसीन विभागाचे सल्लागार डॉ. अनुराग अग्रवाल यांनी संशोधनाच्या निष्कर्षांचे समर्थन केले. त्यांनी सांगितले की, यापूर्वी झालेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, बराच काळ एका जागी बसल्यामुळे लठ्ठपणा, ह्रदय विकार, मधुमेह आणि विशिष्ट प्रकारचा कॅन्सर होऊ शकतो. दीर्घकाळ बसून राहण्याने चयापचयदेखील मंद करू शकते, ज्यामुळे वजन वाढू शकते आणि संभाव्य चयापचय समस्या उद्भवू शकतात.

हे नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी नियमित विश्रांती, उभे राहून डेस्कवर काम करणे आणि दिवसभर शारीरिक हालचाल करण्याची शिफारस डॉ. अग्रवाल करतात.

तज्ज्ञांच्या मते, रोज २० ते २५ मिनिटे व्यायाम केल्याने तुम्हाला खालीलपैकी काही फायदे मिळू शकतात.

दीर्घायुष्य मिळू शकते : नियमित व्यायाम केल्यामुळे एखाद्याला दीर्घायुष्य मिळू शकते. फक्त २० ते २५ मिनिटे मध्यम स्वरूपाचा व्यायाम करण्यामुळे पुरेसा फायदा मिळू शकतो. अनेक आजारांचा धोका कमी होऊन तुमचे आयुष्य वाढण्याची शक्यता असते.

आजारांचा धोका कमी होतो – नियमित व्यायाम करण्यामुळे ह्रदयविकार, टाईप २ मधुमेह आणि विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो. वजन कमी करण्यासाठीदेखील हे फायदेशीर ठरते आणि ह्रदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधित आरोग्य सुधारते आणि रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते.

मानसिक आरोग्यासाठी फायदा होतो – व्यायाम करण्यामुळे फक्त शारीरिक आरोग्यावरच नव्हे, तर मानसिक आरोग्यावरही सकारात्मक प्रभाव होतो. नैराश्य, चिंता आणि तणाव अशा समस्यांचा धोका कमी होऊ शकतो. एकूणच मानसिक आरोग्य सुधारू शकते.

हेही वाचा – पास्ता खायला आवडतो, पण वजन वाढण्याची चिंता वाटतेय? मग हेल्दी पास्ता खा! तज्ज्ञांनी सांगितला हेल्दी उपाय 

निरोगी आरोग्य – नियमितपणे व्यायाम करण्यामुळे एकूण आरोग्य सुधारते. शरीरातील ऊर्जेची पातळी वाढते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते, म्हणजेच शांत झोप लागते. शरीराची लवचिकता वाढते. एखाद्या व्यक्तीला जास्तीत जास्त सक्रिय करण्यास मदत करते आणि आयुष्याचा आनंद घेता येतो.

हे निष्कर्ष दीर्घकाळ बसून राहण्याच्या नकारात्मक परिणामांचा सामना करण्यासाठी आणि तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी तुमच्या दैनंदिन दिनचर्येत थोड्या प्रमाणात व्यायामाचा समावेश करण्याचे महत्त्व अधोरेखित करतात.