सध्या या धावपळीच्या आयुष्यात आपण आरोग्याकडे लक्ष देत नाही. जास्त वेळ एकाच ठिकाणी बसून काम करणे आणि सोशल मीडियावर सर्वाधिक वेळ घालवणे, हा जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनलाय. अपुरी झोप, पोषक आहार न घेणे, जंक फूड खायला खूप आवडणे, सतत तणाव जाणवणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यायामाची सवय नसणे इत्यादी गोष्टींमुळे आपण निरोगी जीवन जगू शकत नाही. पण, नियमित २० मिनिटे चालण्यामुळे तुम्हाला फरक जाणवू शकतो. या विषयी द इंडियन एक्स्प्रेसनी ‘होलिस्टिक हेल्थ’ तज्ज्ञ डॉ. मिकी मेहता यांच्या हवाल्याने या संदर्भात माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाच ते दहा मिनिटे व्यायाम केल्यामुळे शरीरातील असंतुलन सुधारण्यास मदत होते. याशिवाय शरीराला भरपूर ऑक्सिजन मिळते आणि सर्व अवयवांचे कार्य सुधारण्यास मदत होते. यामुळे एकाग्रता, सहनशक्ती, लवचिकता आणि स्टॅमिना वाढतो. दहा मिनिटे व्यायाम केल्यामुळे कॅलरी खर्च होतात, पण काहीच हालचाल न करणे, यापेक्षा दहा मिनिटे व्यायाम केल्यामुळे शरीराला प्रोत्साहन मिळू शकते. यामुळे शरीरातील इन्सुलिनची पातळी सुधारते. हे खालील व्यायामाचे प्रकार तुम्ही सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस नियमित करावे

१. जम्पिंग जॅक कॉम्बो (The jumping jack combo) – सुरुवातीला तीन मिनिटे साधा वाॅर्मअप व्यायाम करावा, ज्यामध्ये मानेची हालचाल, हात आणि खांदे फिरवणे, पाय हलवणे, समोर-मागे, आजू-बाजूला वाकणे इत्यादी प्रकारचा व्यायाम करावा. जम्पिंग जॅक हा मुळात हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम व्यायाम आहे. हा व्यायाम हळूवारपणे करावा.

२. दोरी उड्या मारणे (Jumping rope )- हा एक उत्तम पर्याय आहे. या व्यायामामुळे तुमच्या हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत होते. यामुळे जास्तीत जास्त कॅलरी वापरल्या जातात आणि चयापचय क्रिया सुधारतात. कारण दोरी उड्या मारणे खूप सोपे आहे आणि तुम्ही हा व्यायाम कुठेही आणि कोणत्याही वेळेवर करू शकता.

हेही वाचा : मकर संक्रांतीला बनवली जाणारी खिचडी वजन कमी करण्यासाठी आहे अतिशय फायदेशीर; जाणून घ्या, आहारतज्ज्ञ काय सांगतात…

३. बॉडीवेट स्क्वॅट्स (Bodyweight Squats) – सर्वात आधी सरळ उभे राहा आणि तुमचे पाय आणि खांदे सरळ ठेवा. त्यानंतर पाठ ताठ करून खुर्चीवर बसतात तसे मागच्या बाजूला बसा आणि एका मिनिटासाठी याच स्थितीत राहा.

४. गुडघे वर उचला (High Knees) – जेव्हा तुम्ही जागेवर धावता, तेव्हा तुमचे गुडघे वर उचलून छातीच्या दिशेने आणा. हा व्यायाम एक मिनिटासाठी करा. या व्यायामामुळे हृदयाचे ठोके वाढतात, कॅलरी जास्त वापरले जातात आणि हृदयाचे स्नायू बदलतात.

५. लंज (Lunges) – लंज हा व्यायाम करताना ताठ उभे राहावे. उजवा पाय पुढे टाकावा आणि डावा पाय गुडघ्यातून दुमडून जमिनीच्या दिशेने खाली वाकवा. त्यानंतर डावा पाय पुढे टाकावा आणि उजवा पाय गुडघ्यातून दुमडून जमिनीच्या दिशेने खाली वाकवा, असे १५ ते २० वेळा करा.

६. बर्पी (Burpees)- हा एक असा व्यायाम आहे, ज्यामुळे खूप कमी वेळात जास्तीत जास्त कॅलरी वापरले जातात. छाती, हात, पाय आणि स्नायूच्या आरोग्यासाठी हा व्यायाम फायदेशीर आहे. सुरुवातीला स्क्वॅट्स स्थितीत उभे राहा, त्यानंतर दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवा. कंबर ताठ असायला हवी. दोन्ही हात जमिनीवर खाली टेकवा, नंतर पाय मागे घेऊन जा आणि पुश अपच्या स्थितीत या. एकदा पुश अप करा, नंतर पुन्हा स्क्वॅट स्थितीत या. हात वर करून उंच उडी मारा, हे पाच-दहा मिनिटे करा.

डॉ. मिकी मेहता सांगतात, “याबरोबरच पौष्टिक जेवण, भरपूर पाणी पिणे आणि विश्रांती घेणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे.”

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sitting too long have bad effect on health read how five to ten minuts exercise routine help for healthy lifestyle know six exercise told by expert ndj
Show comments