Is size of Finger proportional to penis size: अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी यांच्या अभिनयाने नटलेला OMG 2 चित्रपट बराच वादग्रस्त ठरूनही बॉक्स ऑफिसवर मात्र हिट ठरला होता. लैंगिक शिक्षण (Sex Education) यासारख्या संवेदनशील विषयावर धार्मिक, पौराणिक दाखले देत अनेक मुद्दे या चित्रपटातून मांडण्यात आले. चित्रपटाचा पूर्वार्ध एका साध्या प्रश्नावर आधारित आहे, हा प्रश्न म्हणजे, पुरुषांच्या उजव्या हाताच्या अंगठा व तर्जनीतील अंतर याचा पुरुषांच्या लिंगाच्या लांबीशी संबंध असतो का? या प्रश्नाचे उत्तर नीट समजून न घेतल्याने सिनेमातील तरुण मुलाच्या मनात न्यूनगंड तयार होतो. शिक्षकांकडून सुद्धा याविषयी नीट माहिती न मिळाल्याने अखेरीस तो एक चुकीचे पाऊल उचलतो ज्याचा प्रभाव त्याच्या आरोग्यावर होतो आणि मग तिथूनच पुढील कथानक सुरु होते. ज्यामध्ये लैंगिक शिक्षणाची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.

२०२३ मध्ये आलेल्या चित्रपटात मांडलेल्या या प्रश्नावर २०११ मध्ये सुद्धा एक संशोधन प्रसिद्ध झाले होते. अंगठा व तर्जनीतील अंतर याचा पुरुषांच्या लिंगाच्या लांबीशी संबंध आहे का, हे जाणून घेण्यासाठी एशियन जर्नल ऑफ एंड्रोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिसर्च बद्दल आपण जाणून घेऊया. तसेच यासंदर्भातील अन्य संशोधनांवर सुद्धा एक नजर टाकूया..

Sitaram Yechury pass away know about his important role in politics
येचुरींच्या जाण्याने आशावादाचा स्रोत गमावला!
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Why will families migrate from tiger protected areas
वाघांच्या संरक्षित क्षेत्रांतील कुटुंबांचे स्थलांतरण का होणार? समस्या काय? आव्हाने कोणती?
paradise painting venice loksatta article
कलाकारण: जुन्या कलेच्या (आणि व्यवस्थेच्याही) चिंध्या…
Shekhar Khambete, tabla maestro shekhar khambete, tabla maestro, theater, Vijaya Mehta, artistic legacy, versatile artist, musical heritage
शेखर खांबेटे : एक कलंदर तबलावादक…
iit bombay researchers discover with help of robots how animals find their way back home
IIT Bombay Research : रस्ता न चुकता प्राणी स्वगृही कसे परततात? यंत्रमानवाच्या सहाय्याने आयआयटी मुंबईचे संशोधन
Only 14 thousand 839 applications in 117 days for allotment of 2030 houses of Mumbai Mandal of MHADA Mumbai news
सोडतपूर्व प्रक्रियेला १५ दिवसांची मुदतवाढ ? म्हाडाकडे ११७ दिवसांमध्ये केवळ १४ हजार ८३९ अर्ज
Goddess Lakshmi will give money
शुक्र देणार बक्कळ पैसा; कन्या राशीत निर्माण होणार युती; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींवर देवी लक्ष्मीची असणार कृपा

२०११ मध्ये झालेल्या एका अभ्यासातील संशोधकांनी १४४ कोरियन पुरुष प्रतिनिधींवर आधारित हे सर्वेक्षण केले होते. हे प्रतिनिधी यूरोलॉजिकल शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल झाले होते. एका संशोधकाने रूग्णांना शस्त्रक्रियेसाठी भूल दिल्यावर लिंगाची लांबी मोजली होती तर एका वेगळ्या संशोधकाने पुरुषांच्या बोटांची लांबी मोजली.

परिणामांवरून असे दिसून आले की ज्यांची तर्जनी (किंवा दुसरं बोट, 2D) अनामिका (किंवा चौथं बोट, 4D) पेक्षा लहान असते, त्यांच्या लिंगाची लांबी जास्त होती. कोरियाच्या इंचॉन येथील गॅचोन विद्यापीठातील प्रमुख संशोधक डॉ. ताई बीओम किम लिहितात, “या पुराव्याच्या आधारे, आम्ही सुचवितो की बोटांच्या लांबीच्या सरसरीवरून प्रौढ लिंगाच्या आकाराचा ‘अंदाज’ लावता येऊ शकतो.”

दरम्यान यापूर्वी झालेल्या संशोधनांमध्ये 2D:4D गुणोत्तराचा संबंध एस्ट्रोजेन आणि टेस्टोस्टेरॉन या सेक्स हार्मोन्सच्या प्रमाणाशी जोडलेला होता. गर्भाच्या विकासादरम्यान वृषणात सेक्स हार्मोन्सची कमी पातळी ही कमी 2D:4D गुणोत्तराशी संबंधित आहेत, तर उच्च इस्ट्रोजेन पातळी 2D:4D उच्च गुणोत्तराशी संबंधित आहेत. बहुतेक पुरुषांचे तर्जनी बोट त्यांच्या अनामिकापेक्षा लहान असते तर बहुतेक स्त्रियांची तर्जनी त्यांच्या अनामिका बोटांपेक्षा समान आकाराची किंवा लांब (उच्च प्रमाण) असते.

बुटांच्या आकारावरून लिंगाची लांबी?

याव्यक्तिरिक्त PUBMED वर प्रकाशित एक अभ्यास असेही सुचवतो की पुरुषांच्या लिंगाची लांबी ही त्यांच्या शू साईजवरून सुद्धा ठरते. यासाठी दोन युरॉलॉजी तज्ज्ञांनी १०४ पुरुषांच्या लिंगाची लांबी मोजली आणि हे त्यांच्या बुटाच्या आकाराशी संबंधित आहे हे तपासण्यासाठी निरीक्षण केले होते. नमुना घेतलेल्या प्रतिनिधींमध्ये इरेक्टेड लिंगाची लांबी १३ सेमी होती. तर युकेमधील पुरुषांच्या बुटांचा सरासरी आकार ९ होता. यावरून असे लक्षात आले की बुटांचा आकार आणि लिमनगाची लांबी यांच्यात स्पष्ट असा संबंध नव्हता.

हे ही वाचा<< ३० दिवस चहा बंद! एका महिन्यात शरीरात काय व कसे बदल दिसतील? फायदेच नाही, तोटेही आहेत, तज्ज्ञ सांगतात… 

या अभ्यासकांचे निष्कर्ष तपासले असता बोटांची लांबी किंवा बुटांचा आकार याचा थेट संबंध पुरुषांच्या लिंगाची लांबी किती हे मोजण्यासाठी जोडला जाऊ शकत नाही. यासंदर्भात आणखी ठोस वैज्ञानिक पुरावे समोर येण्यासाठी अभ्यास आवश्यक आहे.