Pigmentation Skin care: पिग्मेंटेशन, हायपरपिग्मेंटेशन अशा त्वचेशी संबंधित समस्या संभावण्याची शक्यता असते. यामुळे डोळ्यांच्या खालच्या बाजूला काळे डाग दिसू लागतात. चेहऱ्यावर सुरकुत्या यायला सुरुवात होते. चेहरा धुवून स्वच्छ केला तरीही तो घाण आहे असे वाटत राहते. त्वचा कोरडी झाल्याने, उन्हाच्या अतिप्रखर किरणांमुळे चेहरा खराब होऊ शकतो. त्याशिवाय हानिकारक रसायनांपासून तयार केल्या जाणाऱ्या उत्पादनांचा वापर केल्यानेही चेहऱ्याच्या त्वचेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. या समस्या उद्भवू नयेत यासाठी डॉक्टराकडून उपचार करवून घेणे योग्य मानले जाते. पण काही घरगुती पदार्थांचा वापर करुनही हा गंभीर प्रश्न सोडवता येऊ शकतो.

कोरफड (Elovera)

कोरफडीमुळे पिग्मेंटेशनचा प्रभाव कमी होतो. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या, काळे डाग यांचे प्रमाण देखील कमी होते. कोरफडीच्या अर्कामध्ये दाहकविरोधी घटक असतात. या घटकांमुळे त्वचेवरील मेलानिन (Melanin) पेशींचा थर हटवण्यासाठी मदत होते. चेहरा धुतल्यानंतर कोरफडीचा अर्क चेहऱ्यावर लावणे फायदेशीर समजले जाते.

How to properly clean your chopping board
Chopping Board : तुम्हीसुद्धा भाज्या कापण्यासाठी चॉपिंग बोर्ड वापरता का? मग डॉक्टरांनी सांगितलेल्या ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
The small boy to save the shop
“प्रत्येकाचे दिवस सारखे नसतात…”, दुकान वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड; VIDEO पाहून युजर्सही झाले भावूक
control your blood sugar level
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी हे १० पदार्थ खाल्लेच पाहिजेत! जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात…
dhane
रात्रभर भिजवलेल्या धण्याचे पाणी प्यायल्याने छातीतील तीव्र जळजळ कमी होते का? तज्ज्ञांनी सांगितले फायदे आणि तोटे
families and children waited for hours to receive 3 kg of wheat and 4 kg of rice
पनवेल ः रास्त धान्यासाठी तीन तासांची रांग
Pear For Gut Health
Benefits Of Pear Fruit: पेर फळ रोज खाल्ल्यानं कोणते आरोग्यदायी फायदे मिळतात? जाणून घ्या
Here Is How You Can Grow Your Eyebrows Faster and Thicker 10 tips
कमी खर्चात भुवया छान दाट व जाड करण्याचे १० सोपे उपाय; कसा वापर करायचा जाणून घ्या

आणखी वाचा- Hormonal imbalance मुळे होऊ शकतात गंभीर आजार, हार्मोन्स संतुलित राहण्यासाठी आहारामध्ये करा ‘या’ पदार्थांचा समावेश

दूध किंवा दही

दूध-दही या दोन्ही पदार्थांमध्ये लॅक्टिक अ‍ॅसिड मुबलक प्रमाणामध्ये असते. लॅक्टिक अ‍ॅसिडमुळे कोरड्या मृत त्वचेचा थर हटवण्यास मदत होते. त्याबरोबर मुरुम आणि डागांपासूनही सुटका होते. दही किंवा दूध छोट्या कापसाच्या गोळ्यावर लावून चेहऱ्यावर पसरवावे. काही मिनिटांनी चेहरा स्वच्छ करावा. ही कृती दिवसातून दोनदा करावी.

हळद

अनेक औषधी गुणधर्मांनी युक्त असलेल्या हळदीचा वापर फार पूर्वीपासून स्कीनकेअरमध्ये करण्यात येत आहे. मेलानिनचे उत्पादनावर नियंत्रण ठेवण्यासाठी हळद चेहऱ्यावर लावली जाते. एका वाटीमध्ये बेसन, हळद आणि गुलाबजल एकत्र करावे. तयार झालेले ते चेहऱ्यावर लावून १० ते १५ मिनिट तसेच राहून द्यावे. एक दिवसआड करुन हा लेप चेहऱ्यावर लावू शकता.

आणखी वाचा- ‘ब्रेस्ट मिल्क’ डोनेट कसं केल जातं? परवानगी कशी मिळते? A टू Z प्रश्नांची उत्तर जाणून घ्या

बटाटा

बटाट्यामध्ये ब्लीचिंग गुण असतात. एका वाटीमध्ये बटाट्याचा रस घ्यावा आणि कापसाचा छोट्या गोळा त्यात बुडवून तो रस चेहऱ्यावर लावावा. थोड्या वेळाने चेहरा धुवून स्वच्छ करावा. एक-दोन आठवड्याच्या अंतराने हा उपाय करता येतो.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)