Health Special झोपेतून उठून आपण एकदम ताजेतवाने होतो आणि आपल्या नवीन दिवसाला सुरुवात करतो. झोप ही आपली रिचार्जिंग व्यवस्था आहे; दिवसभरातील धावपळ, काबाडकष्ट, शारीरिक, मानसिक दगदग यामुळे शरीर व मन थकून जाते. प्रत्येक जण घरी जाऊन आपापल्या ऐपतीप्रमाणे घरात असणाऱ्या स्वतःच्या बिछान्यात जाऊन अंग झोकून देतो. शरीराला आराम मिळावा या हेतूने शांत झोपी जातो. ज्या व्यक्तीला अंथरुणावर पडल्या पडल्या झोप लागते, ती व्यक्ती सर्वात सुखी अशी आपल्याकडे धारणा आहे नव्हे तर ती वस्तुस्थितीच आहे. सर्व प्राणीमात्रांसाठी भाकर, वस्त्र व घर या मूलभूत गरजांमध्ये झोप खरंतर आपण इतकी मूलभूत आहे की, ती आपण गृहितच धरतो. तिचा वेगळा विचार करत नाही परंतु तो आपण करायला हवा. साधारणतः ६ ते ८ तास आपण दररोज झोप आवश्यक आहे, असे सर्व शास्त्रज्ञ तसेच झोप या विषयावर संशोधन करणारेही मान्य करतात!

झोपेबाबतची एक अत्यंत आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे सर्व प्राणीमात्रांत फक्त मनुष्य हाच असा प्राणी आहे की जो पाठीवर झोपू शकतो. जरा वेळेसाठी आपण इतर सर्व प्राणी उदाहरणार्थ कुत्रा, मांजर, गाय, उंट, हत्ती, घोडा इत्यादी नजरेसमोर आणा आणि त्यांची झोपतानाची अवस्था डोळ्यासमोर आणल्यानंतर आपल्या लक्षात येईल की, या पृथ्वीतलावर मनुष्य हाच एकमेव प्राणी आहे जो पाठीवर झोपू शकतो, इतर कुणालाही पाठीवर झोपता येत नाही.

Viral Video Of Girls Hostel
आनंदच निराळा…! अंघोळीसाठी रांगा, केसांत ब्रश अन्… VIRAL VIDEO पाहून डोळ्यांसमोर येईल तुमची ‘हॉस्टेल लाईफ’
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
badlapur east gas spread loksatta news
बदलापूर पूर्वेत पसरला रासायनिक वायू; रहिवाशांना डोळे चुरचुरणे, श्वसनाचा त्रास, वायूगळतीचा संशय
One decision can change your life fish jumping in big ocean shocking video goes viral
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! ‘या’ छोट्याश्या माशाचा VIDEO पाहून कळेल एका निर्णयानं संपूर्ण आयुष्य कसं बदलतं
Union Health Minister confirms sudden deaths in India are not caused by COVID-19 vaccines, addressing public concerns about vaccine safety.
Deaths Due To Corona Vaccine : “करोना लशीमुळे झाले नाहीत लोकांचे मृत्यू”, मोदी सरकारने संसदेत सांगितली अचानक मृत्यूंमागील कारणे
account wise inquiry started against clerk in case of corruption in Jijamata Hospital of Municipal Corporation in Pimpri
पिंपरी : जिजामाता रुग्णालयातील रकमेचा अपहार; लिपिकाची खातेनिहाय चौकशी
brain rot disease loksatta news
विश्लेषण : ‘ब्रेन रॉट’ यंदाचा ऑक्सफर्ड शब्द मानकरी! पण ही अवस्था नक्की काय असते? हा चिंताजनक विकार का?
What happens to the body when you take cold showers in winter? Cold Water Bath Benefits
हिवाळ्यात थंड पाण्यानं अंघोळ केल्यास शरीरावर काय परिणाम होतात? चांगलं की वाईट, जाणून घ्या

हेही वाचा : उन्हाळ्यात घरच्या घरी तयार केलेले दही का खावे? जाणून घ्या, घट्ट दही घरी कसे बनवावे?

एका अर्थाने पाहिलं तर ही एकमेवाद्वितीय घटना आहे, परंतु यात एक निसर्गाविरोधी म्हणावी अशी कृती आपल्याकडून घडली आहे का? याचा आपण विचार केला पाहिजे. हा प्रश्न आपण का विचारला पाहिजे याचाच विचार करण्यासाठी आजचा आपला विषय म्हणजे झोपेत श्वास थांबणे, याला इंग्रजीत स्लीप अ‍ॅप्नीया म्हणतात. लेखाचे आपले पहिलेच वाक्य होते की, सकाळी झोपेतून उठल्यानंतर कसे आपल्याला ताजेतवाने वाटते; पण खरंच का आपण सर्वच एकदम ताजेतवाने असतो? एकदा परत सर्व क्रम आठवून पाहिल्यास लक्षात येईल, की सर्वजण झोपेतून उठल्या उठल्या एकदम फ्रेश असतातच असे नाही. आता हे खरं आहे की, सकाळी झोप झाल्यानंतर काही वेळा अंथरुणातच पडून राहायला आपल्याला आवडतं. काही जण तर अर्धा-अर्धा तास एक डुलकी घ्यायलाही कमी करत नाहीत, बेडवरच लोळत दिवसभराचे प्लानिंग करत बसतात, परंतु त्यानंतर मात्र बहुतांश लोक उठून सकाळचे सर्व विधी आटोपून नाश्ता करून दिवसाची सुरुवात करतात.

काही लोक मात्र असे असतात की, त्यांना आपली झोप पूर्ण झाली असे वाटत नाही तसेच त्यांचा चेहरा एकदम ताजातवाना न वाटता झोपेतून उठल्यानंतरही एक प्रकारचा आळस किंवा शिथिलता त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत राहते. त्यांच्या हालचाली या तितक्याशा चपळ किंवा जास्त लयीत घडताना दिसत नाही. उठल्यानंतरही त्यांच्या जांभया बराच काळ चालू असतात किंवा चेहऱ्यावर थकवा किंवा उदासभाऊ असतात, त्यांना समाधानकारक झोप मिळाली असे वाटत नाही. अशाच लोकांना स्लीप अप्नीया किंवा झोपेत श्वास थांबणे अशा प्रकारची समस्या असू शकते व त्यांच्या या समस्येबद्दलच आपण आज चर्चा करणार आहोत त्यावरील उपायांचा ऊहापोह करणार आहोत.

हेही वाचा : Health Special: उष्माघात म्हणजे नेमके काय? तो कसा टाळायचा? उपाय काय?

अगोदरच म्हटल्याप्रमाणे मनुष्य हा पाठीवर झोपणारा एकमेव मनुष्य प्राणी आहे. हे पाहून आपल्याला आनंद झालाच असेल पण या उत्क्रांतीच्या टप्प्यावर आपण एक निसर्गविरोधी कृती केलीय हे जाणून घेऊया. आपली उत्क्रांती ही माकडांपासून झाली. हे तर डीएनएच्या अभ्यासातून आपल्याला उमगलेच आहे. पण माकडावर का थांबायचं ? कारण माकड ही कशापासून तरी उत्क्रांत होत आलेच असेल, मग आपण पाण्याबाहेर पडणाऱ्या पहिल्या उभयचर महाकाय मगरीपर्यंत जातो. तिथूनही आपण अमिबापर्यंत व एकपेशीय प्राण्यापर्यंत जाऊ शकतो हा भाग अलहीदा…

आफ्रिकेतील कुठल्या एका भागात उत्क्रांत होऊन २० लाख ते ५० लाख वर्षांपूर्वी ही उत्क्रांत माकडं जगभर पसरायला लागली. ते करताना चार पायांवरून त्यांना ताठ उभे राहून दोन पायावर चालणे शक्य झाले. दोन हातांचा विकास होत होत त्यात अनेक बदल घडले व ७०-८० हजार वर्षांपूर्वी हा उत्क्रांत मानव संपूर्ण जग काबीज करायला ताठ मानेने पुढे सरसावला पाठीचा कणा ताठ झाला तसं त्याला वाटू लागले; पोटावर झोपण्यापेक्षा पाठीवर झोपावं त्याने प्रयत्न करून पाहिला व पोटावर तर सर्वच झोपतात आपण वेगळे आहोत ही ‘अल्फामेल’ची भावना कदाचित तेव्हापासूनच त्याचा अहंकार जोपासू लागली व तो पाठीवर जास्तीत जास्त झोपण्याचा सराव करू लागला. काही गोष्टी या इतक्या अनुकरणीय होऊन जातात की, ती एक रीत, एक पद्धत एक मापदंड होवून जाते व सर्व मिळून एक समाज म्हणून तिला मान्यता मिळते.

हेही वाचा : Health Special: स्तनपान आणि वजन, खरंच काही संबंध असतो का?

पाठीवर झोपणे हे मानवाचे एकमेवाद्वितीय लक्षण तर झालेच, परंतु या प्रक्रियेत त्याचे जे मूळचे शरीर व त्यातील अवयव यांची रचना काही बदलली नाही. साधारणतः जेव्हा आपण झोपतो तेव्हा श्वसननलिकेतून आपण हवा आत घेतो व ती फुफ्फुसांपर्यंत जाते व ही प्रक्रिया सतत चालूच असते. परंतु, झोपेत जेव्हा तुम्ही पाठीवर झोपता व झोपेत तुमचे स्नायू हे शिथिल होतात, तेव्हा श्वासनलिकेतून हवा फुप्फुसांपर्यंत जाताना बऱ्याचदा अडथळे निर्माण होतात. अडथळा येताना काही संदेश आपल्या मेंदूपर्यंत जातात व आपण अंशतः जागे होतो.

स्नायू परत पूर्ववत होऊन श्वासातला अडथळा दूर होतो व आपल्याला परत झोप लागते. काही वेळा मात्र हा अडथळा इतका वाढतो की, आपली झोप पूर्ण होत नाही. सतत झोपेत श्वास रोखणे, मेंदूला संदेश जाणे, आपण काही काळासाठी जागे होणे, पुन्हा स्नायू पूर्ववत होणे, पुन्हा काही वेळ झोप लागणे व पुन्हा श्वासात अडथळा येणे या सततच्या चक्रामुळे संपूर्ण गाढ झोप आपल्याला मिळत नाही. त्यात तुम्ही लठ्ठ असाल तर तुमच्या त्रासात अजून भर पडते लठ्ठपणामुळे मानेच्या व गळ्याच्या भागातील चरबी व मासपेशीचं आकारमान वाढणे त्यामुळे श्वासात अडथळा येण्याचे प्रमाण अजून वाढते व आपण जास्त या समस्येने त्रस्त होतो. सकाळी उठल्यानंतर आपल्या पुढे कामाचा इतका पसारा असतो की, त्या कामाच्या मागे आपण दिवसभर धावपळ करतो. ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो या सर्व समतोल करण्याच्या प्रयत्नात खरंतर आपला तोल कासव गतीने का होईना पण बिघडत जातो. हळूहळू तणाव वाढत जातो. विश्रांती योग्य न मिळाल्याने तणावाचे कणकण वाढत जाऊन आपण काहीसे चिडखोर बनू लागतो. बऱ्याचदा अकारण रागावणे, आदळआपट करणे व एकाचा राग दुसऱ्यावर काढणे, असे चालू होते घरातील मंडळींना आपल्यातील हे बदल जाणवत असतात. ते आपल्याला डॉक्टरांकडे जायचा सल्ला देतात. आपल्याला वाटते आपण तर नॉर्मल आहोत ? आपल्याला कुठलाही आजार नाही कामाच्या ताणात अशा गोष्टी सगळ्यांच्याच होतात. त्यात वेगळे काय ? असं चक्र बरेच वर्ष चालू राहते. किरकिर, चिडचिडपणा, त्रागा वाढतो, क्रयशक्ती कमी होते. शेवटी आपण ठरवतो एकदा जाऊया डॉक्टरांकडे…

हेही वाचा : तुम्हीही झोपेतून उठल्यावर डोळ्यांवर पाणी मारताय? ही सवय ठरू शकते हानिकारक! डॉक्टरांनी दिलाय सल्ला

डॉक्टर आपल्याला तपासतात बीपी वाढलेलं असतं, वजन वाढलेलं असतं व त्यावरच्या गोळ्या औषध चालू होतात. काही काळ थोडं नॉर्मल चालू होते. परंतु संपूर्ण समाधान वाटत नाही. काय चुकतंय आपल्या काही कळत नाही. दिवसभरामध्ये जांभया येत राहतात. आपण चहा कॉफीचा मारा त्यावर करून त्यांना पळवून लावायचा प्रयत्न करत राहतो. हे चक्र काही संपत नाही. खरं तरं हे उदाहरण खरंतर प्रतिनिधिक आहे परंतु, आपल्यातील बऱ्याच जणांना याचा अनुभव येत असेलच. यातच काही लोकांना तुम्ही झोपेत खूप घोरता हा टोमणाही ऐकावा लागत असेल. आपल्या देशात घोरणे हे इतक्या हसण्यावारी व क्षुल्लक बाब म्हणून दुर्लक्षित केले जाते. त्यामुळे घोरण्याचा हा तारस्वर घराघरातून सुरू असूनही व घरातील घोरणाऱ्या पुरुषाबरोबर त्याचे कुटुंबही सहन करत राहते पण यावर उपाय काही करता येईल का? यावर मात्र विचार करत नाही. म्हणजे जसे आता आपण सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान वर्ज्य केले आहे; तसेच घोरणाऱ्या प्रत्येक घरांमधील व्यक्तीने घोरणे हे नॉर्मल नसून झोपेच्या समस्येचे एक लक्षण आहे व त्यावर इलाज केल्याने केवळ त्या घोरणाऱ्या माणसालाच बरं वाटेल असे नाही तर संपूर्ण कुटुंबाला शांत व सुखाची झोप लागेल हे लक्षात घेतलं पाहिजे. लवकरात लवकर त्यावर उपाय केला पाहिजे. पुढच्या लेखात स्लीप अ‍ॅप्नीया किंवा झोपेत श्वास थांबणे या समस्येवर सविस्तर स्वरूपात माहिती घेऊयात. त्यावरच्या शक्य त्या सर्व उपायांवर चर्चा करूया.

Story img Loader