पुरेशी झोप घेणे हे आपल्या निरोगी आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. पण सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात आपल्याला पुरेशी झोप घेणे शक्य होत नाही. तज्ज्ञांच्या सल्यानुसार किमान ७-८ तासांची झोप घेणे आरोग्यासाठी गरजेचे असते. पुरेशी झोप न घेतल्यांने आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. याबाबत एक संशोधन समोर आले आहे ज्यामध्ये ५ तासांपेक्षा कमी झोपल्यामुळे आरोग्याला निर्माण होणाऱ्या धोक्याबाबत यामध्ये चेतावणी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नव्या संशोधनानुसार, जे लोक रात्री पाच तासांपेक्षा कमी झोपतात त्यांना, सात ते आठ तास झोपणाऱ्यांच्या तुलनेमध्ये पेरिफेरल आर्टरी डिसीज (PAD) होण्याचा ७४ टक्के धोका असू शकतो. जागतिक पातळीवर २०० दशलक्षहून अधिक लोकांना पीएडी हा आजार आहे, ज्यामध्ये पायांच्या रक्तवाहिन्या बंद होतात आणि त्या रक्त प्रवाह प्रतिबंधित करतात ज्यामुळे स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.

पीएडीमुळे वाढू शकतो ‘हार्ट अटॅक’चा धोका!

यूकेमध्ये 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पाचपैकी एक व्यक्ती पीएडी स्थितीने ग्रस्त आहे, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. ही समस्या धूम्रपान करणाऱ्यांमध्ये आणि मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा उच्च कोलेस्ट्रॉलने ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये अधिक सामान्य आहे. या आजारात पायांचे केस गळणे, चालताना वेदना होणे, पाय बधीर होणे, पायची नख कमकुवत होणे, व्रण येणे ही लक्षणे दिसू शकतात.

हे संशोधन युरोपिअन हार्ट जर्नल-ओपनमध्ये प्रकाशित झाले. या संशोधनामध्ये ६५०००० अधिक सहभागींचा समावेश होता. यामध्ये त्यांचा झोपण्याचा कालावधी आणि त्यांनी दिवसा घेतलेल्या डुलकीचे पीएडीसोबतच्या संबधाचे विश्लेषण आणि त्यामागील कारणांचे परिक्षण करण्यात आले.

पाच तासांपेक्षा कमी झोप घेतल्यास पीएडी चा धोका जवळपास दुप्पट

स्वीडनच्या कॅरोलिंस्का इन्स्टिट्यूटमधील संशोधनाचे लेखक शुई युआन सांगतात की, ५३४२६ प्रौढांच्या निरीक्षणात्मक विश्लेषणामध्ये, सात ते आठ तासांच्या तुलनेत रात्री पाच तासांपेक्षा कमी झोप घेतल्यास पीएडीचा धोका जवळपास दुप्पट असतो असा निष्कर्ष समोर आला आहे.

या निष्कर्षाचे समर्थन १५६५८२ आणि ४५२०२८ व्यक्तींमधील पुढील विश्लेषणाद्वारे करण्यात आले. यामागील कारणांबाबत अभ्यास केल्यानंतर हे स्पष्ट झाले की, कमी झोपण्याचा पीएडीच्या वाढत्या धोक्यासोबत संबंध होता. याव्यतिरिक्त, पीएडीमुळे झोप कमी होण्याच्या संभाव्यतेशी संबंधित होता.

हेही वाचा : गरोदरपणात महिलांनी काकडी खावी का? जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ

“परिणाम सूचित करतात की, रात्रीच्या वेळेची कमी झोपणे पीएडी विकसित होण्याची शक्यता वाढवू शकते आणि पीएडी असलेल्यांची कमी झोप होण्याची शक्यता वाढते,” युआन म्हणाले.

आठ तासांपेक्षा जास्त झोपल्यास पीएडीचा धोका २४ टक्क्यांनी वाढतो
५३४१६ प्रौढांच्या जास्त वेळ झोपण्याबाबत केलेल्या निरिक्षणात्मक विश्लेषणात असे स्पष्ट झाले की, रात्री आठ तास किंवा त्यापेक्षा जास्त तास
झोपल्यास पीएडी विकसित होण्याचा धोका २४ टक्क्यांनी वाढतो. १५६५८२ आणि ४५२०२८ व्यक्तींच्या दोन मोठया लोकसंख्येचे विश्लेषण या निष्कर्षाचे समर्थन करते. पण जास्त काळ झोपण्यामुळे पीएडी होण्यामागील कोणतेही कारण स्पष्ट झाले नाही.

दिवसा डुलकी घेणाऱ्यांमध्ये पीएडीचा ३२ टक्क्यांनी वाढतो
दिवसा डुलकी घेण्याबाबत देखील असेच निष्कर्ष समोर आले आहेत. दिवसा डुलकी घेणाऱ्यांमध्ये डुलकी न घेणाऱ्यांच्या तुलनेत पीएडी होण्याचा धोका ३२ टक्क्यांनी वाढतो पण कोणतेही कारण स्पष्ट झाले नाही.

आणखी संशोधनाची आवश्यकता
रात्रीच्या वेळी दिर्घकाळ झोपणे, दिवसा डुलक्या घेणे आणि पीएडी यांच्यामधील परस्परसंबधावर आणखी संशोधन करण्याची आवश्यकता असल्याचे मत युआन यांनी मांडले. ”जरी आम्हाला निरक्षणात्मक अभ्यासामध्ये संबध आढळले असले तरी आम्ही त्यामागील कारणांबाबत स्पष्ट करु शकलो नाही,” असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा : Salt Side Effects: जेव्हा तुम्ही गरजेपेक्षा जास्त मीठ खाता तेव्हा काय होते?

सात ते आठ तास झोपणे पीएडीचा धोका करु शकते कमी

संशोधनाचे लेखक युआन सांगातात, की आमच्या अभ्यासातून असे स्पष्ट झाले आहे की, रात्री सात ते आठ तास झोपणे ही पेरिफेरल आर्टरी डिसीजचा धोका कमी करण्यासाठी चांगली सवय आहे.

जीनवशैलीमध्ये बदल केल्यामुळे लोकांना अधिक झोप घेता येऊ शकते. जसे की, ”शारीरिकरित्या सक्रिय राहणे पीएडी विकसित होण्याचा धोका कमी करु शकतो. पीएडी ग्रस्त रुग्णांनी वेदना व्यवस्थापण केल्यामुळे रात्रीची पुरेशी झोप घेणे शक्य होऊ शकते.” असे युआन यांनी सांगितले.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sleeping less than 5 hours can double risk of clogged leg arteries study snk