Sleeping on the stomach increase heart attack risk? झोप ही प्रत्येकालाच आवडते आणि प्रत्येकाची झोपण्याची शैली वेगवेगळी असते. आजकालच्या धावपळीच्या जीवनात चांगली झोप घेणं फारच अवघड झालं आहे. झोपताना योग्य पोझिशन मिळत नसल्याने झोपेचं खोबरं होतं. काहींना सरळ झोपायला आवडतं, तर काहींना डाव्या किंवा उजव्या बाजूला झोपायला आवडतं. काहींना पोटावर झोपायला आवडतं. मात्र, तुमच्या झोपण्याच्या स्थितीचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो हे तुम्हाला माहीत आहे का? पोटावर झोपू नका, असे तुम्हाला घरात अनेकदा सांगण्यात आले असेल. यामागेही आरोग्य हेच कारण आहे. दरम्यान, तुमची झोपण्याची स्थिती, विशेषत: पोटावर झोपल्यामुळे श्वासोच्छ्वासावर थेट परिणाम होतो का आणि हृदयाची धडधड थांबवते का? आणि यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का? यासंदर्भात द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलमधील इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट, सल्लागार डॉ. अमित गंगवानी यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

पोटावर झोपणे आणि हृदयविकाराचा धोका वाढणे याचा थेट संबंध नाही

Can 30 grams of protein within 30 minutes of waking help regulate cortisol and balance hormones
सकाळी उठल्यानंतर ३० मिनिटांत ३० ग्रॅम प्रथिने खाल्ल्याने कॉर्टिसोलचे नियमन आणि हार्मोन्स संतुलन होईल का? तज्ज्ञांनी केला खुलासा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Rakul Preet Singh Diet
Rakul Preet Singh Diet : सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत; रकुलने सांगितले डाएटचे सीक्रेट, वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
Puneet Superstar eating bread with mud shocking video goes viral
फक्त आणि फक्त व्ह्यूजसाठी हद्द पार केली! बिग बॉसच्या एक्स कंटेस्टंटनं चिखलात ब्रेड बुडवून खाल्ला; VIDEO पाहून झोप उडेल
Cardamom benefit in winter Wonderful Cardamom Benefits You Should Definitely Know About
हिवाळ्यात वेलची खाण्याचे आश्चर्यकारक फायदे; आहारात समावेश करण्याआधी नक्की वाचा
Monitor lizard entered the house while people sleeping video viral on social media
आयुष्यापेक्षा झोप महत्त्वाची! गाढ झोपले होते अन् घोरपड घरात घुसली, पुढे जे झालं ते पाहून काळजाचा ठोका चुकेल, पाहा VIDEO
Fight Winter Cold Cough with lemon and clove water
Fight Winter Cold, Cough : घसा खवखवतोय, सर्दीसुद्धा झाली आहे? मग सकाळच्या कॉफीऐवजी ‘या’ पेयाने करा तुमच्या दिवसाची सुरुवात
Can even 1.5 grams of weight gain increase the risk
१.५ ग्रॅम वजन वाढल्यानेही वाढू शकतो मधुमेहाचा धोका? तज्ज्ञांचे मत काय…

डॉक्टर अमित गंगवानी सांगतात, हृदयविकार प्रामुख्याने रक्तवाहिन्यांभोवती जास्त चरबी आणि कोलेस्ट्रॉल यांसारख्या कारणांमुळे होतात. “हृदयाच्या स्नायूंच्या ऊतींमध्ये सतत रक्त प्रवाह होत नसल्यामुळे पेशींचा मृत्यू होऊ शकतो. मात्र, पोटावर झोपणे आणि हृदयविकाराचा धोका वाढणे याचा थेट संबंध नाही, असे डॉ. गंगवानी यांनी सांगितले. “हृदयविकाराचा झटका ही एक गंभीर स्थिती आहे, जी हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा लक्षणीयरीत्या विस्कळीत किंवा पूर्णपणे बंद झाल्यास उद्भवते,” असे डॉ. गंगवानी म्हणाले.

पोटावर झोपल्याने शरीराच्या इतर भागांवर गंभीर परिणाम

बत्रा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरच्या वरिष्ठ सल्लागार, कार्डिओलॉजी आणि मेडिकल रिसर्च सेंटरच्या डॉ. वर्षा कौल यांनी यावर स्पष्टीकरण देताना, “सध्याच्या संशोधनावर आधारित एखाद्या व्यक्तीची झोपण्याची स्थिती हृदयरोग किंवा इतर हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी समस्यांसाठी जोखीम घटक ठरू शकत नाही असं स्पष्ट केलं आहे. मात्र, पोटावर झोपल्याने शरीराच्या इतर भागांवर गंभीर परिणाम होऊ शकतो, श्वास घेण्यात अडचण येऊ शकते आणि मणक्यावर अतिरिक्त दबावदेखील येतो.”

“पोटावर झोपणाऱ्यांना हृदयविकाराचा त्रास होण्याची अधिक शक्यता असते.”

बेंगळुरूच्या एस्टर व्हाईटफिल्ड हॉस्पिटलमधील इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजी विभाग एचओडी आणि मुख्य सल्लागार डॉ. नवीन चंद्र जी एस यांनी नमूद केले की, झोपेचा आणि हृदयविकाराचा झटका यांच्यातील थेट संबंध निश्चितपणे नसला, तरी “पोटावर झोपणाऱ्यांना हृदयविकाराचा त्रास होण्याची अधिक शक्यता असते.” “जेव्हा तुम्ही पोटावर झोपता तेव्हा छाती आणि पोटावर दबाव येतो, ज्यामुळे रक्त प्रवाह कमी होऊ शकतो, ज्यामुळे तुमचे हृदय अकार्यक्षमतेने काम करू शकते. शिवाय, या स्थितीमुळे पाठीचा कणा आणि मज्जातंतूवरील दाबदेखील वाढू शकतो, ज्यामुळे एकूणच ताण आणि अस्वस्थता होऊ शकते; ज्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो,” असे डॉ. चंद्रा म्हणाले.

हेही वाचा >> तुम्हीही रात्री डोक्याखाली जाड उशी घेऊन झोपता का? त्वचा आणि पाठीच्या कण्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम

दरम्यान, हे जाणून घेणेसुद्धा अत्यावश्यक आहे की, श्वास घेण्यात अडचण हा हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, हार्ट फेल्युअर आणि एनजाइना यांसारख्या हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगांच्या चेतावणी लक्षणांपैकी एक आहे. “झोपण्याची ही पद्धत क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) सारख्या श्वसनाच्या आजारांनी ग्रस्त लोकांसाठी समस्या ठरू शकते,” असे डॉ. गंगवानी म्हणाले. दरम्यान, झोपेत असताना तुमचा पाठीचा कणा तटस्थ राहतो याची खात्री करण्यासाठी, हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी एकतर पाठीवर किंवा बाजूला झोपणे आवश्यक आहे. “याशिवाय नियमित व्यायाम करून, निरोगी जेवण खाऊन चांगली जीवनशैली जगणे हृदयाशी संबंधित समस्यांपासून ग्रस्त होण्याची शक्यता कमी करण्यात खूप मदत करते,” असे डॉ. चंद्रा म्हणाले.