रक्ताची तपासणी केल्यानंतर डॉक्टर ज्याप्रकारे शरीरातील आजार कारण शोधतात, त्याचप्रमाणे लघवीची तपासणी करूनही अनेक आजार ओळखता येतात. यात लघवीचा रंग बदलणे, वास येणे, लघवीतून रक्त येणे, जळजळ होणे अशा अनेक लक्षणांवरून तुमचे शरीर विविध आजारांच्या विळख्यात असल्याचे दिसून येते. आरोग्य तज्ञांच्या मते, लघवी मुख्यत: पाणी असते त्यामुळे ते गंधहीन असावे.

कधीकधी लवघीतून विशिष्ट घाणेरडा वास येतो त्याची कारणे वेगवेगळी असून शकतात. लघवीला वास ही समस्या चांगली नाही. पण जेव्हा लघवीतून रक्त येणे, वारंवर लघवी होणे, लघवी करताना जळजळ होणे यासह इतर लक्षणे दिसतात तेव्हा ते अधिक चिंतेचे कारण ठरते. जर तुमच्या लघवीला अमोनियाचा तीव्र वास येत असेल तर ते UTI चे लक्षण असू शकते.

air pollution in Mumbai news
मुंबईची हवा पुन्हा प्रदूषित; कुलाबा, कांदिवली येथे ‘वाईट’ हवेची नोंद
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
badlapur east gas spread loksatta news
बदलापूर पूर्वेत पसरला रासायनिक वायू; रहिवाशांना डोळे चुरचुरणे, श्वसनाचा त्रास, वायूगळतीचा संशय
curd and coffee for tan removal
Tan Removal Remedy : चमकदार त्वचेसाठी घरच्या घरी करा उपाय! दही व कॉफीचा लावा मास्क; पण डॉक्टरांचे मत काय?
Winter special recipe in marathi Eat sweet and sour tomato chutney with jaggery to stay healthy during winters
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खा गुळ-टोमॅटोची चटणी; रेसिपी आहे एकदम सोपी
Black Plastic Kitchenware May Look Nice But Could Be Harming Your Health: Latest Study Finds
महिलांनो तुम्हीही स्वयंपाकघरात काळी भांडी वापरता? परिणाम वाचून पायाखालची जमीन सरकेल
clean up marshal action against those responsible for littering
क्लीन अप मार्शलकडून अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; पालिकेच्या तिजोरीत आठ महिन्यांत ३ कोटी दंड जमा
how to remove bad smell from bathroom
बाथरूम आणि टॉयलेटमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी वापरा ‘ही’ घरगुती ट्रिक

साखर, गूळ, मध की ब्राउन शुगर; कोणता पदार्थ तुमच्यासाठी योग्य? जाणून घ्या डॉक्टरांचे मत

सिस्टिटिस संसर्गामुळे लघवीला येते दुर्गंधी

सिस्टिटिस हा मूत्राशयाच्या मार्गावर होणार संसर्ग आहे, यामुळे मूत्राशयात जळजळ होते. सामान्यत: मूत्रमार्गात जाणाऱ्या बॅक्टेरियामुळे ही समस्या उद्भवते. लैंगिक संबंध, सार्वजनिक शौचालयाचा वापर, किडणी स्टोन, पुरुषांमध्ये वाढणाऱ्या प्रोस्टेट ग्रंथी, मेनोपॉज, डायबिटीज आणि कमकुवत रोगप्रतिकार शक्तीमुळे हे आजार होऊ शकतात.

सिस्टिटिस संसर्गाची लक्षणे

१) लघवी करताना वेदना आणि जळजळ होणे.
२) नेहमीपेक्षा जास्त वेळा लघवी होणे, तसेच लघवी झाल्यानंतरही पुन्हा होतेय असे वाटणे
३) गडद, सौम्य किंवा तीव्र वास असलेली लघवी होणे.
४) ओटीपोटात वेदना होणे.

लघवीला माशाप्रमाणे वास का येतो?

अनेक महिलांना बॅक्टेरियल योनिओसिसमुळे लघवीतून माशासारखा वास येऊ शकतो. हा वास योनीतून निघणाऱ्या स्रावातून येतो, जो सामान्यत: पिवळसर पांढरा, पातळ आणि पाण्यासारखा असतो, बॅक्टेरियल योनिओसिस ही समस्या सहसा गंभीर नाही, परंतु तुम्ही यावर डॉक्टरांना भेटून वेळीच उपचार करणे गरजेचे आहे.

लघवीतून गोड फळांसारखा वास कशामुळे येतो?

अनेक लघवीतून कुजलेल्या फळांंसारखा गोड वास येतो, हे लघवीत ग्लुकोजचे प्रमाण जास्त असल्याचे लक्षण आहे. आरोग्य तज्ञांच्या मते, हे अनियंत्रित मधुमेहाचे लक्षण आहे. अशावेळी त्वरीत डॉक्टरांकडे जाऊन चेकअप करणे गरजेचे आहे. तसेच तुमचा मधुमेह नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे.

लघवीतून दुर्गंध येण्याची इतर कारणे

डिहायड्रेशनमुळेही अनेकदा लघवीतून दुर्गंध येऊ शकतो. यात लघवीचा रंग बदलतो. लसूण, शतावरी, कॉफी यांसारखे पदार्थ खाल्ल्यानेही लघवीला वास येऊ शकतो, अनेकदा काही खाद्यपदार्थ्यांच्या सेवनामुळेही लघवीला दुर्गंधी येते. पण खाण्या पिण्याच्या सवयींमुळे जर लघवीला वास येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. जर लघवीचा रंग बदलत असेल, दुर्गंधी येत असेल आणि सोबत काही लक्षणे दिसत असतील तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Story img Loader