Obesity Causes In Infants: पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) असलेल्या महिलांच्या मुलांना लठ्ठपणाचा त्रास होण्याची शक्यता तिप्पट असते, असे एका नवीन अभ्यासातून दिसून आले आहे. कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूट, स्वीडनच्या अभ्यासात पीसीओएस-्संबंधित आरोग्य समस्या पिढ्यानपिढ्या कुटुंबातील पुरुषांकडून पुढे पसरण्याचा धोका हायलाइट केला आहे. सेल रिपोर्ट्स मेडिसीन या जर्नलमध्ये हा अभ्यास प्रकाशित झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संशोधनातील विविध टप्पे व निष्कर्ष

रेजिस्ट्री डेटा आणि माऊस मॉडेल्सचा वापर करून, संशोधकांनी हे निर्धारित केले की PCOS सारखी वैशिष्ट्ये आईकडून त्यांच्या मुलांमध्ये कशी पसरली जातात. जुलै २००६ ते डिसेंबर २०१५ दरम्यान स्वीडनमध्ये जन्मलेल्या ४,६०,००० हून अधिक मुलांचा अभ्यासात समावेश करण्यात आला होता. यापैकी, अंदाजे ९००० मुलांच्या आईला पीसीओएस होता. त्यानंतर संशोधकांनी कोणती मुले लठ्ठ आहेत हे ओळखले.

याशिवाय, संशोधनाच्या पुढील टप्प्यात उंदरांवरील अभ्यासाने या निष्कर्षांची पुष्टी केली, संशोधकांनी मादी उंदरांना गर्भधारणेपूर्वी आणि दरम्यान (एका गटाला) मानक आहार व (एका गटाला) चरबी आणि साखरयुक्त आहार दिलेला होता. तसेच यांच्यातील सेक्स हार्मोन डायहाइड्रोटेस्टोस्टेरॉनच्या उच्च पातळीत होता. नंतर या मादींना जन्म दिलेल्या नर उंदरांचा अभ्यास केला असता, समान निष्कर्ष समोर आले होते.

PCOS असलेल्या महिलांच्या मुलांना काय त्रास होऊ शकतो?

संबंधित अभ्यासाचे प्रमुख संशोधक व कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटच्या फिजिओलॉजी आणि फार्माकोलॉजी विभागातील प्राध्यापक एलिसाबेट स्टेनर-व्हिक्टोरिन यांनी सांगितले की “पीसीओएस असलेल्या स्त्रियांच्या मुलांमध्ये लठ्ठपणाचा आणि “खराब” कोलेस्टेरॉलची उच्च पातळी असण्याचा धोका तिप्पट असतो, ज्यामुळे पुढील आयुष्यात इन्सुलिन प्रतिरोधक आणि टाइप-२ मधुमेह होण्याचा धोका वाढतो,”

प्रयोगांनुसार, संशोधकांनी सांगितले की, गर्भधारणेदरम्यान स्त्रीमध्ये लठ्ठपणा आणि पुरुष हार्मोन्सची उच्च पातळी गाठल्याने बाळामध्ये (विशेषतः मुलामध्ये) दीर्घकालीन आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे भविष्यात चरबीच्या ऊतींचे कार्य, चयापचय व प्रजननक्षमता यावर परिणाम होऊ शकतो.

हे ही वाचा<< ढेकर येणे ठरले कोलन कॅन्सरचे लक्षण? डॉक्टरांनी दिला सावधतेचा इशारा, शरीराचे ‘हे’ संकेत आजच ओळखा

स्टेनर-व्हिक्टोरिन यांनी सांगितले की “हे निष्कर्ष भविष्यात प्रजनन आणि चयापचयाशी संबंधित रोग ओळखण्यासाठी, उपचार करण्यासाठी आणि सुरुवातीच्या टप्प्यावर प्रतिबंध करण्यासाठी मार्ग शोधण्यात मदत करू शकतात.”

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Son with these type of mothers has thrice threat of obesity bad cholesterol diabetes and health issues new study revelation svs