अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या प्रेग्नन्सी आणि प्रेग्नन्सीनंतरच्या प्रवासाबद्दल खुलासा केला आहे, परंतु त्या यादीत अभिनेत्री सोनम कपूर आघाडीवर आहे. सोनम मोकळेपणाने आपल्या प्रेग्नन्सीबाबत संवाद साधताना दिसते. २०२२ मध्ये तिचा पहिला मुलगा वायु कपूर आहुजा याला तिने जन्म दिला होता. प्रेग्नन्सीदरम्यान सोनमचे वजन जवळपास ३५ किलोने वाढले होते, यामागील कारण तिने उघड केले. “जेव्हा मी प्रेग्नंट होते, तेव्हा माझे वय ३५ पेक्षा जास्त होते. मी प्रेग्नन्सीच्या पहिल्या तीन महिन्यांत प्रोजेस्टेरॉनचे शॉट्स घेतले होते, त्यामुळे माझे वजन खूप वाढले होते,” असे सोनमने तिच्या YouTube चॅनेलवर मॉम ब्लॉगर तान्याला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
सोनम कपूरने हे देखील शेअर केले की, तिच्या आहारात “खूप पाणी पिणे” आणि “कलिंगड आणि आंबासारखी भरपूर फळे” खाणे समाविष्ट होते. “त्या सर्व गोष्टींचा तिला गर्भधारणेमध्ये फायदा झाला. शरीरातील पाण्याची पातळी वाढवणे आवश्यक आहे,” असे सोनमने सांगितले.
प्रोजेस्टेरॉन शॉट्स शरीरात कसे कार्य करतात?
हेही वाचा – जीवघेणा लव्ह बाईट! Hickey मुळे तुम्हाला स्ट्रोक कसा होऊ शकतो? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…
कोण घेऊ शकते प्रोजेस्टॉन शॉट्स?
३५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांसाठी, गर्भधारणेदरम्यान मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारख्या वाढत्या जोखमीमुळे प्रोजेस्टेरॉन शॉट्सचा वापर काळजीपूर्वक करणे आणि व्यवस्थित प्रसूतीपूर्व निरीक्षण करण्याची आवश्यकता आहे, असे तज्ज्ञांनी नमूद केले.
“प्रोजेस्टेरॉन वापरण्याचा निर्णय व्यक्तीच्या आरोग्याचा इतिहास आणि सद्यस्थिती लक्षात घेऊन तयार केला पाहिजे,” असे डॉ. सुहाग यांनी नमूद केले.
हेही वाचा – रोज अंघोळ न केल्याचा शरीरावर काय होईल परिणाम? डॉक्टर काय सांगतात? वाचाच…
प्रत्येक गर्भवती महिलेला प्रोजेस्टॉनची गरज नसते?
डॉ. सुहाग यांच्या म्हणण्यानुसार सर्व गर्भवती महिलांना प्रोजेस्टेरॉनच्या गोळ्यांची गरज नसते. “या गोळ्या सामान्यत: गर्भपाताचा इतिहास असलेल्यांना, IVF सारखे काही प्रजनन उपचार घेत असलेल्यांना किंवा नऊ महिन्यांपूर्वी बाळाच्या जन्माची (preterm birth) जोखीम कमी करण्यासाठी लहान गर्भाशय असलेल्या महिलांना डॉक्टर हे औषध घेण्याची शिफारस करतात.”
गर्भधारणेदरम्यान प्रोजेस्टेरॉनच्या वापराबाबत माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी वैयक्तिकृत सल्ल्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि संभाव्य दुष्परिणाम याबाबत चर्चा करणे महत्त्वाचे आहे, असे डॉ. सुहाग यांनी स्पष्ट केले.