Rava vs Wheat Flour : भारतीय लोक स्वयंपाकघरांमध्ये अनेक पदार्थ बनवण्यासाठी सर्वात जास्त रवा आणि गव्हाच्या पीठाचा वापर करतात. रवा आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आहे का की गव्हाचे पीठ, असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. याविषयी द इंडियन एक्स्प्रेसनी इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल येथील इंटरनल मेडिसिनचे वरिष्ठ सल्लागार डॉ. राकेश गुप्ता यांच्या हवाल्याने सविस्तर माहिती जाणून घेतली आणि रवा आणि गव्हाच्या पिठाचे फायदे आणि तोटे समजून घेतले.

रवा

रवा हा डुरम गव्हापासून बनवला जातो, ज्याला मॅकरोनी गहूसुद्धा म्हणतात. उपमा, इडली किंवा शिरा यांसारखे पदार्थ बनवण्यासाठी रव्याचा वापर केला जातो. पास्ता बनवण्यासाठीसु्द्धा रवा वापरला जातो.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
What is the Leidenfrost effect
Leidenfrost Effect : जेवण बनवण्यासाठी स्टेनलेस स्टीलचा पॅन वापरताय? मग नक्की जाणून घ्या ‘या’ हॅकबद्दल
Shocking video If you eat roti made dough keeping fridge can make you sick
महिलांनो चपात्या केल्यानंतर उरलेलं पीठ फ्रिजमध्ये ठेवताय?; ‘हा’ VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल
the Indian soldier returned home safely After serving the country for 21 years
२१ वर्ष देशसेवा करून सुखरूप घरी परतला भारतीय जवान, पत्नीचे अश्रु थांबत नव्हते; VIDEO पाहून व्हाल भावुक

हेही वाचा : चंदू चॅम्पियनसाठी कार्तिक आर्यनने भाताऐवजी खाल्ला Cauli Rice? काय आहे हा cauli rice? तुम्ही खाऊ शकता? तज्ज्ञांकडून जाणून घ्या

१०० ग्रॅम रव्यामध्ये ३५०-३६० कॅलरीज असतात, ७२ ग्रॅम कर्बोदके असतात. १२ ग्रॅम प्रोटिन्स आणि एक ग्रॅम फॅट्स असतात. त्यात मध्यम प्रमाणात फायबर (३ ग्रॅम) आणि आवश्यक असे खनिजे असतात; जसे की लोह, मॅग्नेशियम, थायामिन, नियासिन तसेच रव्यामध्ये व्हिटॅमिन बीसुद्धा असते.
रव्यामध्ये कर्बोदकाचे प्रमाण जास्त असल्याने हा ऊर्जेचा एक चांगला स्त्रोत मानला जातो, त्यामुळे व्यायामापूर्वी नाश्त्यामध्ये रव्यापासून बनवलेले पदार्थ खाणे आरोग्यासाठी चांगले आहे. रव्यामध्ये मध्यम ग्लायसेमिक इंडेक्स आहे, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. रव्यामधून मध्यम प्रमाणात प्रोटिन्स मिळतात, जे स्नायूंच्या आरोग्यासाठी आणि वाढीसाठी फायदेशीर आहे. रवा हा पचायला हलका मानला जातो, ज्यामुळे पचनाशी संबंधित समस्या असलेल्या लोकांना रव्यापासून तयार केलेले पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो.

गव्हाचे पीठ

गव्हाचे पीठ आपण सहसा पोळी, रोटी, पराठा, पुरी बनवण्यासाठी वापरतो. १०० ग्रॅम गव्हाच्या पीठामध्ये ३४० ते ३५० ग्रॅम कॅलरीज दिसून येतात. यामध्ये ७१ ग्रॅम कर्बोदके, १२-१३ ग्रॅम प्रोटिन्स आणि दोन ग्रॅम फॅट असते. विशेष म्हणजे गव्हाच्या पिठामध्ये रव्यापेक्षा जास्त फायबर असतात. १०० ग्रॅम गव्हाच्या पिठामध्ये १२ – १३ ग्रॅम फायबर असतात. गव्हामध्ये लोह, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी असते.

आरोग्यासाठी रवा फायदेशीर आहे की गव्हाचे पीठ?

गव्हाच्या पिठामध्ये रव्यापेक्षा जास्त फायबर असतात, ज्यामुळे भूक कमी लागते आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते; तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. रवा आणि गव्हाच्या पिठामध्ये मध्यम ग्लायसेमिक इंडेक्स असतो, तरी गव्हामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने रक्तातील साखरेचे उत्सर्जन कमी होते, जे मधुमेहाच्या लोकांसाठी अधिक फायदेशीर आहे.

हेही वाचा : Standing Desks Not Good For Health : तुम्हीसुद्धा उभं राहून काम करता का? मग थांबा! तुम्हालाही होऊ शकतात या आरोग्य समस्या

पचनक्षमतेचा विचार केला तर रवा हा गव्हाच्या पिठापेक्षा पचायला हलका आहे. जे लोक आजारातून नुकतेच बरे झाले आहेत किंवा ज्यांना पचनाशी संबंधित समस्या असेल त्यांनी रव्याचे सेवन करावे. दीर्घकाळ भूक कमी करण्यासाठी रवा गव्हाच्या पिठाइतका प्रभावी नाही.

गव्हाचे पीठ हा पौष्टिक आहारासाठी एक चांगला पर्याय आहे, पण रवा हा सहज पचण्यायोग्य आहे. रवा आणि गव्हाचे पीठ हे दोन्ही संतुलित आहाराचा भाग आहे. विशेष म्हणजे याचे योग्य प्रमाणात सेवन करणे तसेच इतर धान्ये, प्रोटिनयुक्त पदार्थ आणि भाज्या यांचा आहारात समावेश करणे निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

Story img Loader