हृदयाच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. अलीकडे अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत ज्यात ३०-४० वयोगटातील तरुणांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. हृदयविकार हे मृत्यूचे प्रमुख कारण असल्याने, संशोधक हृदयामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी करण्याचे मार्ग शोधत आहेत. उच्च कोलेस्टेरॉल असणे हे हृदयविकाराचे प्रमुख कारण आहे, त्यामुळे उच्च कोलेस्टेरॉल कमी करण्याचे मार्ग शोधणे महत्त्वाचे आहे.
शास्त्रज्ञांनी एका अभ्यासात खराब कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यासाठी प्रोटीन शोधून काढले आहे ज्याचे परिणाम अँटिऑक्सिडंट्स जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. तज्ज्ञांच्या मते, सोया प्रोटीनचे सेवन कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी खूप प्रभावी ठरते. कोलेस्टेरॉलमुळे हृदयविकाराचा धोका कसा वाढतो आणि सोया प्रोटीन ते नियंत्रित करण्यासाठी कसे प्रभावी ठरते ते जाणून घेऊया.
कोलेस्ट्रॉल आणि हृदयरोग यांच्यातील संबंध
मेडलाइनप्लसच्या मते, कोलेस्ट्रॉल हा चरबीसारखा पदार्थ आहे जो तुमच्या शरीराच्या सर्व पेशींमध्ये आढळतो. लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन (LDL) हा एक प्रकारचा कोलेस्ट्रॉल आहे ज्याला वाईट कोलेस्ट्रॉल म्हणतात. दुसरा उच्च घनता लिपोप्रोटीन कोलेस्ट्रॉल (HDL) आहे, ज्याला चांगले कोलेस्ट्रॉल म्हणतात. मेडिकल न्यूज टुडेच्या मते, जर शरीरात एलडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी खूप जास्त झाली तर ते तुमच्या रक्तवाहिन्यांच्या भिंतींमध्ये जमा होऊ लागते, ज्यामुळे हृदयविकार आणि स्ट्रोक होतात.
( हे ही वाचा; शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यास ‘या’ गोष्टी चुकूनही खाऊ नका; नाहीतर गंभीर समस्या उद्भवू शकते)
कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यासाठी सोया कसे उपयुक्त ठरते
मागील अनेक संशोधनांनुसार, सोया खाल्ल्याने कोलेस्टेरॉलच्या पातळीवर सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. सोयामध्ये सॅच्युरेटेड फॅट कमी असते आणि त्यामुळे सोयाला इतर उत्पादनांपेक्षा चांगले मानले जाते. हे कोलेस्टेरॉलची पातळी चांगल्या प्रकारे नियंत्रित ठेवण्यास मदत करते आणि हृदय निरोगी ठेवते. यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी सॅच्युरेटेड फॅट आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यासाठी दररोज २५ ग्रॅम सोया प्रोटीन वापरण्याची शिफारस करते.
सोयाबीनचे आरोग्य फायदे
सोयाबीनच्या सेवनाने मानसिक संतुलन सुधारते. याचे सेवन केल्याने हृदयविकारांपासून बचाव होतो. सोयाबीनमध्ये आढळणारे अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म कॅन्सरसारख्या आजारांपासून बचाव करण्यास मदत करतात. सोयाबीनचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात.