डॉ. गिरीश ब. महाजन
आज आपण वाचणार आहोत एका खास शैवाला विषयी, हे आहे बहुगुणी नील हरित शैवाल, अर्थात Blue Green Algae, पृथ्वीवरील एक आश्चर्य! कर्बोदके, मेद आणि प्रथिने ही तीन महत्वाची आणि मूलभूत पोषक द्रव्ये होत. या व्यतिरिक्त जीवनसत्वे, वृद्धीकरक संप्रेरके, अमिनो आम्ले, क्षार आणि पाणी इत्यादी अत्यावश्यक पोषक घटक असतात. आपण हे जाणतो की, प्रथिने निरोगी आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आणखी वाचा: Health Special: Atopic Dermatitis अतिसंवेदनशील त्वचेचा आजार
प्रथिनांचे रेणू हे ‘अमिनो आम्ल’ तुलनेने लहान रेणूभार असलेल्या रासायनिक ‘रचनात्मक एककां’ पासून तयार होतात नैसर्गिकरित्या आढळणारी सुमारे २० भिन्न अमिनो आम्ल आहेत जी वेगवेगळ्या संयोजनात आणि प्रमाणात एकमेकांशी बद्ध होतात आणि लाखो प्रकारची प्रथिने आणि पेप्टाइड संश्लेषित अथवा उत्पादित केली जातात. प्रथिने संपूर्ण शरीरात आढळतात स्नायू, हाडे, त्वचा, केस आणि अक्षरशः शरीराच्या इतर प्रत्येक भागामध्ये किंवा ऊतींमध्ये. आपले शरीर या भागांच्या निर्मितीसाठी ते दुरुस्त करण्यासाठी, सर्वप्रकारची संप्रेरके, प्राणवायूवाहक हिमोग्लोबिन व जैवप्रक्रिया नियंत्रक विकरांच्या संश्लेषणासाठी प्रथिने वापरते. ती ऊर्जास्त्रोत म्हणूनदेखील वापरले जाऊ शकतात. अमेरिकेच्या नॅशनल अकॅडमी ऑफ मेडिसिनने शिफारस केली आहे की, प्रौढांना दररोज प्रत्येक किलोग्रॅम शरीराच्या वजनासाठी किमान ०.८ ग्रॅम प्रथिने गरजेची असतात. उदा. ५० किलोग्रॅम वजन असलेल्या व्यक्तीने साधारण दररोज ४० ग्रॅम प्रथिने खाणे गरजेचे असते.
आणखी वाचा: Health Special: अल्कलीयुक्त पाणी घरच्या घरी कसे कराल?
वीस पैकी नऊ अमिनो आम्ले – हिस्टिडीन, आयसोल्युसीन, ल्युसीन, लाइसिन, मेथिओनाइन, फेनिलअॅलानिन, थ्रेओनाइन, ट्रिप्टोफॅन आणि व्हॅलाइन ही अत्यावश्यक अमिनो आम्ले म्हणून ओळखली जातात, कारण सर्वसामान्यपणे यांची निर्मिती शरीरपेशी करू शकत नाहीत. ती अन्नातून आली पाहिजेत, याचा अर्थ असा की जर या पैकी काही अमिनो आम्लांचा आपण खालेल्या अन्नाद्वारे शरीराला पुरेसा पुरवठा झाला नाही तर ती अमिनो आम्ले ज्या प्रथिनांचे रचनात्मक घटक आहेत, त्या प्रथिनांची निर्मिती थांबेल. ती प्रथिने ज्या संप्रेरके, विकरे, स्नायू व हाडे यांचे रचनात्मक आणि कार्यकारी घटक असतील त्या रचना आणि कार्ये ठप्प होतील. आणि शरीरात हळू हळू कुपोषणाची अथवा अनारोग्याची लक्षणे दिसू लागतील. म्हणजे आहारात ‘कोणत्याही’ उपलब्ध प्रथिनांचे अंतर्ग्रहण करणे फायदेशीर ठरेलच असे नाही. अर्थातच अंतर्ग्रहण केलेल्या प्रथिनांमधून वरील नऊ पैकी जास्तीतजास्त अमिनो आम्ले योग्य मात्रेत आहारातून मिळावीत. म्हणजेच शरीराचा नत्राचा आणि अमिनो आम्लांचा समतोल राहील. याचा आणि स्पिरुलिना
शैवालाचा काय संबंध ही उत्सुकता आपणास लागली असेलच.
आणखी वाचा: Health Special: भिडस्तपणा हा मनोविकार आहे का?
स्पिरुलिनाची ओळख:
स्पिरुलिना जे आर्थ्रोस्पिरा या नावाने देखील ओळखले जाते, हे एक नील हरित आहे. हे शैवाल एक जिवाणू आहे, जो जलाशयांमध्ये सूक्ष्म तंतू स्वरूपात वाढतो आणि प्रकाशसंश्लेषण क्रियेद्वारे आपल्या अन्नाची आणि ऊर्जेची गरज भागवतो. याच्या दोन प्रजाती ज्या खूप मोठ्या प्रमाणात मानवाकडून वापरल्या जातात त्या म्हणजे आर्थ्रोस्पिरा मॅक्सिमा आणि आर्थ्रोस्पिरा प्लॅटेन्सिस. या शैवालाची एक खासियत म्हणजे त्याची अतिशय सुंदर सर्पिलाकार आणि वलयांकित रचना. निळसर हिरव्या रंगामुळे सूक्ष्मदर्शिकेमधून हिरव्यागार बांगड्यांच्या समुहासारखी रचना दिसते. ज्या जलाशयात पाण्याचा सामू ८ पेक्षा अधिक असतो अशा ठिकाणी स्पिरुलिना हमखास आढळतो. जगातील बऱ्याच अल्कलीयुक्त सरोवरांमध्ये स्पिरूलिना शैवाल आढळते.
महाराष्ट्रात बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराच्या पाण्याचा सामू १० ते १२.५ दरम्यान असतो. तेथे आर्थ्रोस्पिराच्या प्रजाती विपुलतेने वाढतात. मेक्सिकोमधील टेक्सकोको सरोवर आणि चाड या आफ्रिकन राष्ट्रातील चाड सरोवर येथील इतिहास असे सांगतो की, १५ व्या आणि १६ व्या शतकात त्या सरोवरांमध्ये वाढणाऱ्या शैवालाचा नकळतपणे गरज म्हणून त्याच्या सुकलेल्या केकच्या स्वरूपात ऍन म्हणून वापर केला जात होता. तेंव्हा फक्त त्या जमातींना एव्हढेच माहीत होते की, हे एक चिकट, चीजचा गंध असणारे आणि खारट चवीचे खाद्य आहे. पण त्यामुळे आरोग्य चांगले राहायचे. १९६४ ते १९६५ दरम्यान याचा उलगडा झाला की ते आरोग्यवान अन्न म्हणजे स्पिरुलिना हे शैवाल होते. असे काय आहे या शैवालात ?
स्पिरुलिना इतके संतुलित आहार कसे ?
स्पिरुलिना, ही एक संपूर्ण वनस्पती-आधारित प्रथिने स्त्रोत आहे जी सहज पचते आणि त्यामुळे मानवी लघुआंत्रात
महत्तम शोषिली जाते. आपल्यापैकी अनेकांना प्रथिने पुरेशी मिळत नाहीत. आहारातील निर्बंधांमुळे असो, जसे की निव्वळ वनस्पती-आधारित आहार खाणे आणि मांसाहार पर्यायने त्यातून येणारी प्रथिने वगळणे. तसेच जसे जसे आपण मोठे होतो तसे आपले स्नायू प्रथिनांना कमी प्रतिसाद देतात आणि त्याची गरज वाढू लागते. अतिरिक्त स्रोतामार्फत पूरक प्रथिने आहार घेणे नेहमीच आरोग्यदायी असते. प्रथिनांचा अतिरिक्त स्रोत म्हणून, स्पिरुलिना हा एक चांगला पर्याय आहे.स्पिरुलिना संपूर्ण प्रथिने आहार मानले जाते. याचा अर्थ त्यामध्ये वर नमूद केलेली सर्व नऊ अत्यावश्यक अॅमिनो आम्ले असतात ज्यांची निर्मित शरीर स्वतः करू शकत नाही.
ही किमया असणारी फार वनस्पती-आधारित प्रथिने नाहीत. १ चमचा (~ ७ ग्राम) स्पिरुलिनाच्या भुकटी मध्ये सुमारे ४ ग्राम प्रथिने असतात. या ४ ग्राम मध्ये अत्यावश्यक अमिनो आम्लांचे प्रमाण पुढील प्रमाणे असते- हिस्टिडीन (७६ mg) , आयसोल्युसीन (२२५ mg) , ल्युसीन (३४६ mg) , लायसिन (२१२ mg) , मेथिओनाइन (८० mg) , फेनिलअॅलानिन (१९४ mg) , थ्रेओनाइन (२०८ mg) , ट्रिप्टोफॅन (६५ mg) आणि व्हॅलाइन (२४६ mg). यांचे ‘शिफारस केलेले आहाराचे सेवन’ प्रमाण (Recommended Dietary Intake, RDI) १०% ते २३% दरम्यान आहे. स्पिरुलिनामध्ये लायसिन, हिस्टिडीन आणि मेथिओनाइनची पातळी कमी असली तरी, मानवी पोषणासाठी हे संतुलित अमिनो आम्लांचे संयोजन असते. स्पिरुलिनाला प्रथिने पचनक्षमतेसाठी अतिशय उत्तम आहेत. ‘अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन’ या आंतरराष्ट्रीय शोधनिबंधात नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, स्पिरुलिनाच्या प्रथिनांमध्ये आवश्यक अमिनो आम्लांची सरासरी पचनक्षमता ८५.२% होती. जी इतर उपलब्ध प्रथिने साधनांच्या जवळपास आहे.
जैविक मूल्य (Biological Value, BV) या एककाच्या साहाय्याने शरीरातील प्रथिने वापरण्यासाठी अन्नातील किती प्रथिने शोषली जातात ते मोजले जाते. स्पिरुलिना या जीवाणूंचे बाह्य पटल मानवी आतड्यातील आम्लाद्वारे सहजपणे विरघळले जाऊ शकते आणि त्यामुळे त्यातील प्रथिने सहज शोषली जाऊ शकतात. म्हणून स्पिरुलीनाचा बीव्ही (BV) स्कोअर ८६% आहे. हेदेखील या प्रथिनांचे एक अतिशय उपयुक्त लक्षण. स्पिरुलिनाच्या प्रथिनांमध्ये जर काही मूल्ये कमी वाटली तर ती उणीव भरून निघते ती त्यातील जीवनसत्वे, क्षार आणि मेदाम्ले यांच्या संयोजनामुळे आणि त्यांच्या प्रमाणामुळे. हे सूक्ष्म शैवाल जीवनसत्व ब-१ (थायामिन), जीवनसत्व ब-२ (रिबोफ्लेविन), जीवनसत्व ब-३ (नियासिन), जीवनसत्व ब-५ (पॅन्टोथेनिक आम्ल), आणि जीवनसत्व ब-९ (फॉलीक आम्ल) तसेच लोह, तांबे, मॅग्नेशियमसह पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅंगनीज या खनिजांचा देखील चांगला स्रोत आहे. जीवनसत्व अ, ड, ई आणि के देखील स्पिरुलिनामध्ये असतात असे बऱ्याच संशोधन नियतकालिकांमध्ये वर्तविलेले आहे. तसेच स्पिरुलिनामध्ये ओमेगा-६ आणि ओमेगा-३ प्रकारची मेदाम्ले योग्य प्रमाणात असतात. हे अत्यावश्यक मेदाम्ल गॅमा लिनोलेनिक आम्ल (जी.एल.ए.) एक संपन्न साधन आहे. हे आम्ल शरीरातील सूज कमी करण्यासाठी दाहक-विरोधी म्हणून कार्य करते आणि मेंदू, त्वचा व चयापचय आरोग्यासाठी योगदान आहे. गॅमा लिनोलेनिक आम्लाची खूप कमी संसाधने आहेत. स्पिरुलिना पावडर त्याच्या कॅरोटीनॉइड सामग्रीमुळे अँटिऑक्सिडंट म्हणून देखील भूमिका बजावते आणि त्यातील विशेष मेद संयोजनामुळे हृदयाच्या आरोग्यास पोषक ठरते.
दीर्घ कालावधीच्या अंतराळ मोहिमेवर जाणाऱ्या अंतराळवीरांसाठी, NASA (नासा) ला आढळले की स्पिरुलिना हा त्यांची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करण्यासाठी आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्वात शक्तिशाली पर्यायी अन्नांपैकी एक आहे. अंतराळवीरांना आवश्यक असलेली पोषकतत्वे यशस्वीरित्या पुरवण्याव्यतिरिक्त, नासाने लाइफ सपोर्ट आणि बायोफ्युएल प्रणाली मधील मूलगामी उपयोगांसाठी स्पिरुलिना आणि सूक्ष्म शैवालांमध्ये आणखी सखोल संशोधनास सुरुवात केली आहे. स्पिरुलिना उत्पादनाचे तंत्रज्ञान गेल्या काही दशकात मोठ्या प्रमाणात विकसित झाले आहे. चीन, इंडोनेशिया आणि भारत हे देश स्पिरुलिना निर्मितीत अग्रस्थानी आहेत. स्पिरुलिनाची चिक्की, गोळ्या, कॅप्सूल, पावडर, सिरप असे बरेचसे फॉर्म्युलेशन बाजारात उपलब्ध आहेत. भारतात बरेच विक्रेते/ कंपन्या स्पिरुलिनायुक्त फॉर्म्युलेशनची विक्री करतात. विश्वसनीय स्त्रोताकडून स्पिरुलिना खरेदी करणे महत्त्वाचे आहे. स्पिरुलिनाची लागवड हा एक चांगला व्यवसाय म्हणून पुढे येऊ पाहत आहे.