Health Special वसंत ऋतुमध्ये निसर्ग बहराला येतो आणि म्हणूनच ऋतुराज म्हणून ओळखला जातो. कवी कालिदासापासून ते विदुषी दुर्गा भागवतांपर्यंत अनेकानेक कवी आणि लेखक या ऋतुराज वसंताचे वर्णन अशा काही अलौकिक शब्दांमध्ये करतात की, ते वाचकांनी मुळातूनच वाचायला हवे. अशा हा निसर्गामध्ये रंगांची उधळण करणारा वसंत मानवी आरोग्याला मात्र काही फारसा पोषक नसतो. आचार्य सुश्रुतसुद्धा सांगतात की, वसंत हा असा ऋतू आहे जेव्हा विविध प्रकारचे रोग बळावतात. वसंतामध्ये निसर्गसौंदर्याची भरती असली तरी आरोग्याला ओहोटी लागते. असे का, तेसुद्धा समजून घेऊ.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कफाचा विकार बळावतो
हिवाळ्यानंतर येणारा वसंत ऋतुमधला उन्हाळा हा सुरुवातीला शरीराला ऊब देणारा व म्हणून प्रिय वाटला तरी तो आरोग्याला काही फारसा पोषक होत नसतो, किंबहुना त्रासदायकच ठरतो. वसंतात कफाचे आजार बळावतात. वसंत ऋतुच्या दिवसांमध्ये तुम्ही ज्याला भेटाल त्याला सर्दी-कफाचा त्रास झाल्याचे लक्षात येते. या दिवसांमध्ये थंडीतापाने घराघरातून लोक ग्रस्त असतात, ज्याा आधुनिक वैद्यक-भाषेमध्ये ‘व्हायरल फीवर’ म्हटले जाते. सर्दी म्हणजे वाहाणारे नाक व शिंका हा त्रास एकीकडे होतो तर दुसरीकडे नाक-घशातून श्लेष्मल, चिकट, पिवळ्या रंगाचा स्राव येण्याचा हा त्रास असतो.
हेही वाचा : Papaya Benefits : सकाळी उपाशी पोटी खा पपई , ॲसिडिटीचा त्रास होईल दूर; जाणून घ्या, आहारतज्ज्ञ काय सांगतात..
काही जणांना स्राव सहजगत्या नाकावाटे बाहेर न पडल्यामुळे, सायनस कफाने चोंदल्यामुळे नाक चोंदणे, डोकं जड होणे, डोकं दुखणे असा त्रासही होतो. फोनवर बोलताना बहुतेकजण सानुनासिक स्वरामध्ये(नाकातून) बोलताना दिसतात. वातावरणातील थंडी अचानक गायब होऊन उन्हाळा सुरु झाल्यामुळे असे होते. शिशिर ऋतुनंतर येणाऱ्या वसंत ऋतुमध्ये उन्हाची किरणे तीव्र झाल्यामुळे कफाचे आजार बळावतात, असे स्पष्टपणे प्राचीन ग्रंथांमध्ये म्हटले आहे. सुमारे पाचहजार वर्षांपूर्वी लिहिलेल्या सुश्रुतसंहितेमधील विधानांची आज २१ व्या शतकामध्येही आपल्याला प्रचीती यावी, हे आयुर्वेदाची यथार्थता पटवणारे उदाहरण आहे.
साहजिकच मनात प्रश्न येतो की, वसंतामध्ये कफाचा प्रकोप का होतो? तर या प्रश्नाचे उत्तरसुद्धा समजून घेऊ. वसंत ऋतुमधला कफप्रकोप आयुर्वेदानुसार विचार करता या आधीच्या शिशिर ऋतुमधल्या कडक थंडीमुळे,त्या दिवसांमध्ये पाणी व वनस्पतींमध्ये मधुरत्व (गोडवा), स्निग्धत्व (चिकटपणा) आणि शीतत्व (थंडावा) वाढल्यामुळे शरीरामध्ये कफसंचय झालेला असतो (कफ जमलेला असतो). तो कफ वसंत ऋतुमध्ये तीव्र ऊन पडू लागले की पातळ होऊ लागतो व शरीरभर पसरून विविध कफविकारांना कारणीभूत होतो. एकंदर पाहता कफप्रकोप ही वसंत ऋतुमधली सर्वात महत्त्वाची विकृती होय.
हेही वाचा : Health Special: त्वचाविकार आणि मधुमेह नेमका काय संबंध?
वसंत ऋतुमध्ये कफप्रकोप का होतो?
वसंताआधीचे शिशिर ऋतुमधील थंड वातावरण व मधुर व स्निग्ध (गोड व तेलकट- तूपकट) आहार यामुळे शरीरामध्ये कफ जमतो. शिशिरातले शीत वातावरण व मधुर आणि स्निग्ध आहार हा कफ वाढवणारा असुनही शिशिर ऋतुमध्ये कफाचा प्रकोप होत नाही, कारण त्याला शीत-स्निग्ध गुणाची जोड मिळते. शिशिर ऋतुमध्ये पाणी व वनस्पतींमध्ये शीत व स्निग्ध गुण वाढलेला असतो. शीत व स्निग्ध गुणांचे पाणी प्यायल्याने व वनस्पतींच्या सेवनामुळे शरीरात ते गुण वाढतात आणि त्याच गुणांच्या कफाला सुद्धा वाढवतात. त्यामुळे कफ घट्ट स्वरुपात जमत जातो, ज्याला ‘संचय’ म्हटले. संचय अवस्थेमध्ये कफ त्याच्या स्वतःच्या स्थानांमध्येच जमतो, शरीरामध्ये इतरत्र पसरत नाही. थंडीनंतरच्या वसंत ऋतुतली उष्णता त्या कफाला द्रवीभूत (पातळ) करुन शरीरात उसळवते- पसरवते, ज्याला ‘प्रकोप’ म्हटले. यापुढच्या ग्रीष्म ऋतुमध्ये उष्णतेबरोबरच जशी रुक्षता (कोरडेपणा) वाढत जातो, त्या उष्ण व रुक्ष गुणांमुळे कफाचे स्वाभाविकरित्या शमन होते.
हेही वाचा : गुढीपाडव्याला कडुलिंब आणि गुळाचे सेवन का करतात? काय आहे कारण, तज्ज्ञांकडून जाणून घ्या….
वसंतात कफप्रकोप- ‘स्तब्ध’ शरीरांमध्ये!
वसंतात निसर्गतःच कफप्रकोप होतो हे जरी खरं असलं तरी सुश्रुतसंहितेचे भाष्यकार डल्हण यांनी या विषयी एक विशेष मत व्यक्त केले आहे. डल्हणांच्या मतानुसार ज्या व्यक्ती स्तब्ध असतात त्यांच्या शरीरामध्ये कफप्रकोप होतो. स्तब्ध याचा अर्थ स्थिर. एकाच जागी स्थिर राहणारे म्हणजेच हालचाली न करणारे असे लोक. त्यांच्या शरीरामध्ये वसंत ऋतुमध्ये कफप्रकोप होण्याची शक्यता अधिक असते. हा मुद्दा कदाचित त्या प्राचीन काळाला तितक्या प्रकर्षाने लागू होणार नाही, जितका तो आजच्या २१व्या शतकातील मानवाला लागू होईल. कारण प्राचीन काळामध्ये अगदी आळशी समजल्या जाणार्या माणसाला सुद्धा नित्य व्यवहारांसाठी तरी दिवसातून काही ना काही श्रम करावे लागायचे. आजच्या आधुनिक माणसाचं मात्र तसं नाही. घर, प्रवास, कामाच्या ठिकाणी सर्वत्र बसण्याचे प्रमाण अधिक असते. घरी परतल्यावर सुद्धा तुम्ही बसूनच राहणार असाल तर असा अवस्थेत शरीरामध्ये कफप्रकोप अधिक संभवतो आणि साहजिकच कफप्रकोपामुळे होऊ शकणारे विविध रोग सुद्धा होण्याची शक्यता अधिक असते. वसंत ऋतुच्या आगमनानंतर मार्च- एप्रिलच्या आसपास समाजात विषाणूजन्य श्वसनविकार का बळावतात याचे एक स्पष्टीकरण आपल्याला मिळते आणि अर्थातच त्यावरचा प्रतिबंधक उपाय सुद्धा, तो म्हणजे अंगमेहनत किंवा व्यायाम!