“तुम्ही कधी अंकुरलेले नारळ ऐकले किंवा पाहिले आहे का? अंकुरलेले नारळाला कोकोनट स्प्राउट्स(coconut sprouts ) किंवा कोकोनट अॅपल (coconut apples) म्हणून ओळखले जाते. नेहमीच्या नारळामध्ये नारळाचे पाणी आणि एक पांढरे खोबरे असते या उलट परिपक्व नारळामुळे कोंब आल्यानंतर अंकुरलेले नारळ तयार होते. “वाढत्या कोंबाचे पोषण करण्यासाठी नारळातील पाणी शोषले जात असल्याने, ते कवचाच्या आत मऊ, स्पंजयुक्त वस्तुमानात रूपांतरित होते, ज्याला ‘सफरचंद’ (अॅपल) म्हणून ओळखले जाते. नारळाच्या आत मऊसर पोत असते ज्याची चव नेहमीच्या नारळापेक्षा वेगळी असते.) असे एकांता सर्वांगीण आरोग्य आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय प्रमुख आणि MPH, RD मानवी लोहिया यांनी दी इंडियन एक्सप्रेसला माहिती देताना सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
याबाबत मुंबईच्या झिनोव्हा शाल्बी हॉस्पिटल, आहारतज्ज्ञ जिनल पटेल दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले की,”ते बहुतेक पूर्ण वाढलेल्या नारळाच्या लहान आवृत्ती आहेत. नारळाच्या तळाशी तीन छिद्रांमधून अंकुर किंवा कोंब उगवलेला दिसतो. जेव्हा नारळाचा ओलावा किंवा उबदार वातावरणाच्या संपर्कात येतात तेव्हा असे होते, ज्यामुळे बिया आतून वाढतात.”
पौष्टिकतेच्या बाबतीत अंकुरलेले नारळ हे नेहमीच्या नारळापेक्षा बरेच वेगळे असतात, असे लोहिया यांनी सांगितले. “परिपक्व नारळ प्रामुख्याने त्यांच्या उच्च फॅट्सयुक्त घटकांसाठी ओळखले जातात, विशेषत: मिडियम-चेन ट्रायग्लिसराइड्स (MCT), जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात आणि जलद ऊर्जा प्रदान करतात पण अंकुरलेल्या नारळांमध्ये फॅट्सचे प्रमाण कमी असते. अंकुरण्याच्या प्रक्रियेदरम्यान, नारळातील काही फॅट्स कर्बोदकांमधे रूपांतरित होतात, ज्यामुळे अंकुर वाढण्यासाठी आवश्यक ऊर्जा मिळते. यामुळे अंकुरलेल्या नारळामध्ये नैसर्गिकरित्या साखरेचे प्रमाण जास्त तयार होते, जे त्यांच्या गोड चवीमध्ये योगदान देते. याव्यतिरिक्त, त्यामध्ये फायबर आणि पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम सारखी आवश्यक खनिजे असतात, ज्यामुळे ते पोषक-दाट नाश्ता बनतात,” असे लोहिया यांनी सांगितले.
हेही वाचा – तणावग्रस्त आहात मग कोकोचे सेवन करा, संशोधनातून समोर आले फायदे! वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…
डॉ अर्चना बत्रा, आहारतज्ञ, आणि प्रमाणित मधुमेह शिक्षक यांनी फरक खालीलप्रमाणे सांगितला आहे
(Dr Archana Batra, dietician, and certified diabetes educator listed the differences as)
पोत | पोष्टिक घटक | चव | |
सामान्य नारळ | बाहेरून कडक आवरण असलेल्या नारळामध्ये पाणी असते आणि आतील खोबरे घट्ट असते. | यामध्ये निरोगी चरबी, प्रथिने, फायबर आणि विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे (पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह) जास्त असते | या नाराळातील पाणी ताजेतवाने आणि थोडेसे गोड असते, तर खोबरे पोषक तत्वांनी समृद्ध आणि किंचित दाण्यांसारखी चव असते. |
अंकुरलेले नारळ | पाणी जवळजवळ पूर्णपणे शोषले जाते आणि खोबऱ्याऐवजी, तुम्हाला एक मऊ, स्पंजसारखा कोंब आढळेल ज्याने आतील बहुतेक भाग व्यापला आहे. कवच बाहेरून सारखेच राहते. पौष्टिक असूनही, अंकुरित नाराळात फॅट्स कमी आणि फायबर जास्त असते. | अंकुर येण्याच्या प्रक्रियेमुळे बियाण्याच्या वाढीसाठी ऊर्जेवर अधिक लक्ष केंद्रित केल्यामुळे त्यात भिन्न पोषक प्रोफाइल आहे. | हा कोंब मऊ, थोडासा गोड आणि एक अद्वितीय पोत आहे, तर उर्वरित खोबरे पातळ असते आणि अनेकदा कमी गोड असते |
हेही वाचा – प्लास्टिक-लेपित पेपर कपमध्ये चहा -कॉपी पिताय! थांबा, संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…
ते खाण्यासाठी सुरक्षित आहेत का?
सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून, अंकुरलेले नारळ ताजे असेपर्यंत खाण्यास पूर्णपणे सुरक्षित असतात.
“अनेक उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये, अंकुरलेले नारळ हे एक स्वादिष्ट पदार्थ मानले जाते आणि सामान्यतः त्यांच्या अद्वितीय चव आणि पौष्टिक फायद्यांसाठी वापरले जाते. पण कोणत्याही नाशवंत अन्नाप्रमाणे, नारळ खराब स्थितीत आढळल्यास किंवा खूप जुने असल्यास, जे खराब होऊ शकते याची तपासणी करणे महत्वाचे आहे,” लोहिया म्हणाले.
विशेष म्हणजे, ते सहसा बाजारात उपलब्ध नसतात, कारण बहुतेक नारळाला कोंब फुटण्याआधीच काढले जाते, डॉ बत्रा यांनी सांगितले.