Standing Desks Not Good For Health : कोविड-१९ महामारीच्या काळात अनेक जण घरून काम करत होते. त्यादरम्यान उभं राहून काम करणे (Standing Desks) ही पद्धत खूप लोकप्रिय झाली. उभं राहून काम करणे ही पद्धत सतत बसण्यामुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवता येते असे मानले जाते, त्यामुळे ही पद्धत अनेकदा ऑफिसमध्येही आता वापरली जाऊ लागली आहे. पण नवीन अभ्यास असं सांगतो की, दीर्घकाळ उभे राहिल्याने संपूर्ण आरोग्य सुधारण्यास मदत होत नाही.

सिडनी युनिव्हर्सिटीच्या अलीकडील अभ्यासात असे आढळून आले आहे की, दिवसातून दोन तासांहून अधिक वेळ उभे राहिल्याने (Standing Desks Not Good For Health) डीप व्हेन थ्रोम्बोसिस (DVT) आणि व्हेरिकोज व्हेन्ससारख्या आरोग्य समस्या विकसित होण्याचा धोका वाढू शकतो. तर इंटरनॅशनल जर्नल ऑफ एपिडेमियोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात यूके बायो बँकमधील ८३ हजारांहून अधिक प्रौढांच्या डेटाचे परीक्षण केले गेले. तर यावरून असा निष्कर्ष काढला गेला की, एकटे उभे राहण्याने स्ट्रोक, हार्ट फेल यांसारख्या हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगांचा धोका कमी होत नाही. तर यासंबंधित अधिक जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांशी संवाद साधला.

FIITJEE Chairman DK Goel abused employee during an online meeting video viral on social media
“कोर्टात जा आणि तक्रार कर…”, नामांकित कोचिंग इन्स्टिट्यूटच्या चेअरमनने केली शिवीगाळ, मीटिंगमध्ये कर्मचाऱ्याला ओरडला अन्…, पाहा VIDEO
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Mother strangled her child shocking video viral on social media
आई की वैरीण? चिमुकल्या मुलाला जमिनीवर झोपवलं, गळा आवळला अन्… VIDEO पाहून होईल काळजाचं पाणी पाणी
Man beaten Young woman on stage who was performing shocking video viral on social media
कोणाच्या परिस्थितीचा असा फायदा घेऊ नका! त्याने भरस्टेजवरच तरुणीबरोबर ‘असं’ काही केलं की…, VIDEO पाहून येईल संताप
Yes Madam Fires Over 100 Employees for Feeling Stressed at Work Viral Email Claims
“ही तर चिटींग आहे!” आधी ऑफिसमध्ये कामाचा ताण येतो का विचारले अन् ज्यांनी होकार दिला त्यांनाच कामावरून काढून टाकले
Shocking video Bat Spotted Eating Chikoo In Pune Market; Video Raises Health Concerns
पुणेकरांनो तुम्हीही बाजारातून फळं घेताय का? थांबा! ‘हा’ प्रकार पाहून पायाखालची जमीन सरकेल; VIDEO एकदा पाहाच
brain rot disease loksatta news
विश्लेषण : ‘ब्रेन रॉट’ यंदाचा ऑक्सफर्ड शब्द मानकरी! पण ही अवस्था नक्की काय असते? हा चिंताजनक विकार का?
Moong dal health benefits
दररोज भिजवलेले मूग खाणं आरोग्यासाठी घातक? मग तज्ज्ञ काय सांगतात…

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचे सल्लागार आणि हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टर प्रवीण कहाळे यांनी सगळ्या गोष्टींवर विचार केला. बसण्यापेक्षा उभं राहून काम करणं चांगलं असलं तरीही त्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्यामध्ये लक्षणीय सुधारणा होत नाही (Standing Desks Not Good For Health), त्यामुळे काम करताना आपल्या सगळ्यांना अधिक हालचाल करणे आवश्यक आहे. कारण उभं राहिल्यामुळे आरोग्यास कोणतेही अतिरिक्त फायदे होत नाही.

हेही वाचा…Protein Powerhouse Sattu : सातू प्रोटीनचं पावरहाऊस आहे का? शाकाहारी खाणाऱ्यांना मिळतील भरपूर प्रथिने; वाचा आहारतज्ज्ञांचे मत

डॉक्टर प्रवीण कहाळे यांनी दीर्घकाळ उभे राहण्याचे कोणते आरोग्य धोके आहेत हे स्पष्ट केलं आहे (Standing Desks Not Good For Health) :

डीप वेन थ्रोम्बोसिस (DVT) :

रक्ताभिसरण कमी झाल्यामुळे नसांमध्ये, सहसा पायांमध्ये रक्ताच्या गुठळ्या (गाठ) तयार होतात. तेव्हा DVT होतो. दीर्घकाळ उभे राहिल्याने रक्तप्रवाह थांबतो आणि रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताची गाठ तयार होते.

व्हेरिकोज व्हेन्स (Varicose Veins) :

व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे अशुद्ध रक्तवाहिन्या फुगून झालेल्या गाठी. जास्त काळ उभे राहिल्याने पायांच्या नसांवर दबाव वाढतो, ज्यामुळे व्हॉल्व्ह सुजतात आणि खराब होतात. म्हणजे यादरम्यान होतं असं की, रक्त आपल्या हृदयाकडे जाण्याऐवजी शिरांमध्ये जमा होते, मग शिरा फुगतात आणि परिणामी व्हेरिकोज व्हेन्स होऊ शकतो; ज्यामुळे पायावर सूज, वेदना, अल्सरदेखील होऊ शकतो.

वेनस इन्सफिशियन्सी (Venous Insufficiency) :

वेनस इन्सफिशियन्सी म्हणजे शिरांच्या कार्यामध्ये समस्या निर्माण होणे. डॉक्टर प्रवीण कहाळे सांगतात की, जास्त वेळ उभे राहिल्यास पायांच्या शिरा पसरतात आणि व्हॉल्व्ह काम करत नाहीत. हे विशेषतः त्यांच्यासाठी आहे, ज्यांना उभं राहून काम करणे आवश्यक आहे. जसे की बस वाहक, कारखान्याचे कामगार. पण, ही समस्या हृदयाच्या समस्यांवर परिणाम करत नसली तरीही यामुळे पायांमध्ये मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणजेच, वेळोवेळी याचा परिणाम पायांच्या आरोग्यावर होतो.

या समस्यांवर उपचार न केल्यास अशुद्ध रक्तवाहिन्या फुगून गाठ होते आणि अधिक गंभीर समस्या उद्भवू शकतात. जसे की, अल्सर. मग या सर्व समस्यांसाठी शस्त्रक्रिया किंवा रेडिओफ्रिक्वेंसी उपचारांची आवश्यकता असू शकते. या परिस्थितींचा थेट हृदयविकाराशी संबंध नाही, पण यामुळे पायांमधील रक्ताभिसरण प्रणालीची गुणवत्ता खराब होऊ शकते.

या समस्यांवर वेळीच उपचार केले नाहीत तर व्हेरिकोज वेन्स (varicose veins), वेनस इन्सफिशियन्सी (Venous Insufficiency) आदी गंभीर समस्या जसे की पायांवर अल्सर (ulcers) जो लवकर बरा होत नाही, निर्माण होतात. या समस्यांवर उपचार करण्यासाठी शस्त्रक्रिया किंवा रेडियोफ्रीक्वेन्सी उपचार घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या समस्या थेट हृदयाच्या आजारांशी संबंधित नाहीत. पण, पायांच्या रक्ताभिसरण प्रणालीतील दीर्घकालीन नुकसान तुमच्या आयुष्यात मोठा धोका आणू शकते. त्यामुळे वेळेत उपचार घेतल्याने या समस्यांपासून तुम्ही दूर राहू शकता.

डॉक्टर प्रवीण कहाळे यांनी सांगितले की, काम करताना काही काळ उभे राहणे फायदेशीर ठरू शकते. पण, दीर्घकाळ उभे राहणे हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी पुरेसे नाही. जर तुम्ही दोन तास बसणे आणि दोन तास उभे राहणे यांची तुलना केली, तर हृदयाच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून फरक कमी आहे. खरे फायदे चालणे, धावणे किंवा जॉगिंग यांसारख्या हालचालीतून मिळतात.

कामाच्या ठिकाणी हालचाल करा :

केवळ उभं राहून काम करण्याच्या हालचालीवर अवलंबून राहण्याऐवजी (Standing Desks Not Good For Health) , तुमच्या दैनंदिन दिनचर्येत नियमित हालचालींचा समावेश करणे हे शारीरिक, हृदय व रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी महत्त्वाचे आहे. कामाच्या दरम्यान थोडे चालणे, स्ट्रेचिंग किंवा सिट-स्टँड सायकल वापरणेदेखील मदत करू शकते. कारण कामादरम्यान हालचाल केली की, रक्ताभिसरण सुधारते आणि मानसिक लक्ष, ऊर्जा वाढवण्यास मदत होते. त्यामुळे जास्त वेळ बसणे किंवा उभे राहणे याचे हानिकारक परिणाम कमी होतात. यामुळे तुम्हाला काम करताना अधिक ताजेतवाने तर लक्ष केंद्रित करण्याससुद्धा मदत होते.

Story img Loader