कोलेस्ट्रॉल अनेक कारणांसाठी माणसाच्या शरीरासाठी आवश्यक असतं. परंतु शरीरात कोलेस्ट्रॉलच्या वाढत्या प्रमाणामुळे आपल्याला हृदयासंबंधी अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिक झाल्यास ते रक्तवाहिन्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात होते. त्यामुळे मोठी समस्या निर्माण होते. यामुळे हृदय विकाराचा धोकाही निर्माण होतो.

अधिक तेलयुक्त आहार घेतल्याने तसंच सिगरेट पिणाऱ्या लोकांमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढण्याचा धोका असतो. कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे हृदयरोग, उच्च रक्तदाब, किडनीचे आजार, थायरॉइड, ब्रेन स्ट्रोक, यासारखे आजार होण्याचा मोठा धोका असतो. परंतु यावर वेळीच उपचार केल्यास, खाण्यापिण्यात काही बदल केल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणण्यास मदत होते.

Can 30 grams of protein within 30 minutes of waking help regulate cortisol and balance hormones
सकाळी उठल्यानंतर ३० मिनिटांत ३० ग्रॅम प्रथिने खाल्ल्याने कॉर्टिसोलचे नियमन आणि हार्मोन्स संतुलन होईल का? तज्ज्ञांनी केला खुलासा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Rakul Preet Singh Diet
Rakul Preet Singh Diet : सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत; रकुलने सांगितले डाएटचे सीक्रेट, वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
diet of small babies, Health Special, Health tips,
Health Special: लहान बाळांचा आहार कसा असावा?
Ginger benefits in winter This winter superfood will help keep the body warm and healthy
आला हिवाळा…तब्येत सांभाळा! थंडीत आलं खाणं चांगलं, पण किती प्रमाणात खावं? जाणून घ्या
Can even 1.5 grams of weight gain increase the risk
१.५ ग्रॅम वजन वाढल्यानेही वाढू शकतो मधुमेहाचा धोका? तज्ज्ञांचे मत काय…
Sweet or savoury breakfast
सकाळच्या नाश्त्यामध्ये गोड पदार्थ खावे का? त्याचा आरोग्यावर काय होतो परिणाम? तज्ज्ञांकडून घ्या जाणून…
fruits pack the most nutritional punch
Nutrient Rich Fruits : कोणती फळं सर्वात जास्त पोषण देतात तुम्हाला माहिती आहे का? मग आहारतज्ज्ञांनी दिलेली ‘ही’ यादी वाचा

‘या’ पदार्थांचा आहारात करा समावेश

कांदे

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनला सादर केलेल्या २०१७ च्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, कांद्यामध्ये आढळणारे क्वेर्सेटिन हे महत्त्वाचे संयुग उंदीरांमधील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. कांदे रक्तवाहिन्यांना जळजळ आणि कडक होण्यास प्रतिबंध करण्यास मदत करतात. तुम्ही कांदे कोशिंबिरीत टाकून कच्चे खाण्याचा विचार करू शकता किंवा तुम्ही ते तुमच्या स्प्राउट चाट आणि ऑम्लेटमध्येही घालू शकता. कांद्याचा रस केवळ कोलेस्ट्रॉलचा धोका कमी करत नाही तर रक्त शुद्ध करुन हृदयाचं आरोग्यही चांगलं ठेवतं.

अक्रोड

अक्रोडमध्ये ऑलिक अ‍ॅसिड सारखे पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड असते, तसेच अल्फा-लिनोलेनिक अ‍ॅसिड सारख्या ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिडचा भरपूर स्रोत असतो. हे हेल्दी फॅट नैसर्गिकरित्या कोलेस्ट्रॉल कमी करतात. तसेच याचे दररोज सेवन केल्यास हृदयविकाराचा धोका कमी होतो.

लसूण
रक्तातील नसांमध्ये जमा झालेले वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तुम्ही दररोज लसणाचे सेवन केले पाहिजे. लसणाची अर्धी पाकळी रोज खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी १० टक्के कमी होऊ शकते.

( आणखी वाचा : Winter Diet For Pregnant Women: गर्भावस्थेत हिवाळ्यात करा ‘या’ पदार्थांचं सेवन; आईच्या व बाळाच्या आरोग्यासाठी ठरतील फायदेशीर )

फॅटी मासे

ओमेगा ३ चांगले कोलेस्टेरॉल पातळी वाढवण्यासाठी ओळखले जाते. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य अभ्यास या शीर्षकाच्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, वृद्ध व्यक्तींनी आठवड्यातून एकदा भाजलेले मासे खाल्ल्याने स्ट्रोकचा धोका २७ टक्क्यांनी कमी होतो.

फळे

संतुलित आहारासाठी फळांचाही समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक फळे हृदयासाठी निरोगी असतात आणि त्यात विरघळणारे फायबर असतात जे एलडीएल पातळी कमी करण्यास मदत करतात.