Sticking Up Garlic In Nose: यंदाच्या थंडीच्या महिन्यांच्या सुरुवातीला, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, एक हेल्थ आरोग्य ट्रेंड तुफान व्हायरल झाला होता, ज्यानुसार तुम्ही कच्च्या लसणाची पाकळी सोलून नाकपुड्यांमध्ये ठेवल्याने होणाऱ्या चमत्कारिक फायद्यांची माहिती देण्यात आली होती. किमान २० मिनिटे अशाप्रकारे लसणाची पाकळी नाकपुडीमध्ये घालू ठेवल्यास कंजेशन म्हणजे रक्त साचणे, गुठळ्या होणे, विशेषतः नाकामध्ये सूज येणे असे त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते असे या व्हिडीओजमध्ये सांगण्यात येत होते. अनेकांनी असे प्रात्यक्षिक सुद्धा करून दाखवले होते. मात्र यामध्ये काही टक्के तरी तथ्य आहे का? असे केल्यास नुकसान होऊ शकते का आणि खरोखर असे त्रास होत असल्यास त्यावर नेमके काय उपाय करणे आवश्यक आहे याविषयी आज आपण तज्ज्ञांकडून माहिती जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डॉ राकेश गुप्ता, वरिष्ठ सल्लागार आणि शैक्षणिक सल्लागार, इंटरनल मेडिसिन, इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल, यांनी इंडियन एक्सस्प्रेसला दिलेल्या माहितीत या व्हायरल दाव्याची शहानिशा केली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये जेव्हा आपण लसूण नाकपुडीत घालतो तेव्हा ती बाहेर काढल्यावर श्लेष्मा बाहेर पडत असल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र डॉ. गुप्तता सांगतात की चोंदलेल्या नाकात असे काहीही प्रयोग केल्याने नुकसान होऊ शकते. लसणाचा उग्र वाद नाजूक नाकपुडीचे नुकसान करून श्लेष्माचे उत्पादन वाढवू शकतो. यामुळे रक्तसंचय कमी होण्याऐवजी उलटाच परिणाम होण्याची सुद्धा भीती असते. आहाराचा भाग म्हणून शरीरात प्रवेश करणारा लसूण अँटी बॅक्टेरियल असला तरी त्याचा थेट उतींशी येणारा संपर्क नाकातील जिवाणूंची संख्या वाढवू शकतो. यामुळे काही चिंताजनक लक्षणांसह संसर्ग होऊ शकतो.

नाकात लसूण किंवा लसणाचे तेल घातल्यास काय त्रास होऊ शकतो?

नाकात लसणाची पाकळी घातल्याने अनेक धोके निर्माण होतात, सर्वात मोठी जोखीम म्हणजे नाकामध्ये लसणाची पाकळी नाकात अडकून बसू शकते ज्यामुळे श्वसनाला अडथळा निर्माण होतो.

लसणाचे तुकडे झाल्यास ते श्वसन नलिकेतून फुफ्फुसात जाऊ शकतात, ज्यामुळे वातनलिकेत जखमा होतात किंवा गुदमरल्यासारखे होऊ शकते. अशा स्थिती हाताळण्यासाठी वेगळ्या प्रतिजैविकांची देखील गरज भासू शकते.

समजा आपण लसूण घातलेले तेल नाकात सोडण्याचा विचार करत असाल तरी काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, अशा तेलामुळे त्वचेची जळजळ, पुरळ आणि गंभीर ऍलर्जीक प्रतिक्रिया होण्याची शक्यता असते.

नाक चोंदलेले असल्यास/ बंद झाल्यास अन्य पर्याय कोणते?

नाक चोंदलेले असल्यास त्यावर उपचारांसाठी अन्य अनेक पर्याय आहेत. अनेक स्प्रे, इनहेलर्स नाकपुड्यांमधील संसर्ग कमी करण्यास मदत करू शकतात. शिवाय ज्यांना नेती पॉट वापरण्याची सवय असेल त्यांनी किंचित क्षार युक्त खारट पाणी वापरून पाहायला हवे यामुळे अगदी रक्तसंचय पूर्णपणे बरा होत नसला तरी सुजलेल्या सायनसचा त्रास कमी होऊ शकतो. त्याशिवाय डॉक्टर असे सुचवतात की, शरीर सर्दी किंवा व्हायरलपासून ठराविक कालावधीपर्यंत स्वतःला बरे करू शकते व एकदा सर्दी बरी झाली की नाक चोंदले जाण्याचा त्रास कमी होऊ शकतो.

हे ही वाचा<<१०० ग्रॅम बीटरूटच्या पोटात दडलंय काय? खाल्ल्याने कॅन्सर बरा होतो का? मधुमेह असल्यास खावं का? प्रश्न सोडवुया..

डॉ. गुप्ता सांगतात की, यातून आणखी एक बाब लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे सोशल मीडियावर फिरणाऱ्या ट्रेंडवर अवलंबून न राहता आरोग्यविषयक समस्यांसाठी पुराव्यावर आधारित आणि वैद्यकीयदृष्ट्या मान्यताप्राप्त उपायांना प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे.यासाठी निदान तुमच्या डॉक्टरांशी बोला.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sticking garlic clove up your nose for 20 minutes can help to get rid of cold flu congestion doctor gupta suggest to open up nose svs