Periods Tips: मासिक पाळीदरम्यान पोट, ओटीपोट आणि कंबरदुखीच्या त्रासाचा सामना प्रत्येक महिलेला करावा लागतो. पीरियड्समध्ये प्रत्येक महिला कित्येक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक समस्यांमुळे त्रस्त असते. पण यापैकी सर्वात सामान्य समस्या म्हणजे ओटीपोटामध्ये असह्य अशा वेदना होणे. मासिक पाळीचा त्रास कमी करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेतल्यास त्रास कमी होतो. मासिक पाळीदरम्यान खाण्याबाबत खबरदारी घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला येथे काही उत्तम पदार्थांबद्दल सांगणार आहोत, जे तुम्हाला मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदना कमी करण्यात मदत करू शकतात.
भरपूर पाणी प्या
मासिक पाळीत पाणी जास्त प्या. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि शरीर हायड्रेट राहते. पण, थंड पाणी पिणे टाळा, कोमट पाणी पिण्याला प्राधान्य द्या. कोमट पाणी प्यायल्याने पोटदुखीचा त्रास कमी होतो. नियमित २ ते ३ लीटर पाणी पिणं अत्यंत आवश्यक असतं.
पाणीयुक्त फळे
मासिक पाळीमध्ये शरीरात पाणी कमी झाल्यामुळे डिहायड्रेशन आणि डोकेदुखीचा त्रासही होतो. अशा परिस्थितीत, मासिक पाळीत काकडी, नारळ पाणी, टरबूज यांसारखे पाणीयुक्त फळे खाणे आवश्यक आहे. यामुळे तुमचे शरीर हायड्रेट होईल आणि तुम्हाला निरोगी वाटेल.
दही ठरते प्रभावी
दही हे प्रोबायोटिक्सने समृद्ध असलेले आहे आणि ते शरीराचे पोषण करण्यासाठी आणि तुमच्या योनीला तुमच्या मासिक पाळीत होणाऱ्या संसर्गापासून संरक्षण करण्यासाठी ओळखले जाते.
डार्क चॉकलेट
मूड सुधारण्यासाठी किंवा चिंता कमी करण्याव्यतिरिक्त, डार्क चॉकलेट मासिक वेदना कमी करण्यासाठी देखील खूप प्रभावी आहे. या सुपरफूडमध्ये लोह आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. यामध्ये असलेले मॅग्नेशियम सेरोटोनिन हार्मोनची पातळी वाढवते, ज्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते.
(आणखी वाचा : Skin Care Tips: हिवाळ्यात त्वचेला मॉइश्चरायझर लावणे का सोडू नये? जाणून घ्या ‘ही’ महत्त्वाची कारणे )
मांसाहार
मासिक पाळीच्या काळात महिलांनी प्रथिनेयुक्त आहारही घ्यावा. दही, दूध, मांसाहार, अंडी, मासे, अंकुरलेले धान्य इत्यादींचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरते.
दुग्धजन्य पदार्थ
शरीरात कॅल्शियम खूप आवश्यक असते. जर शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण झाली तर विविध समस्या होतात. विशेष करून मासिक पाळीच्या काळात शरीरात कॅल्शियमची कमतरता भासू देऊ नका. टोफू, ब्रोकोली, दुग्धजन्य पदार्थ, नट्स, डेअरी हाड असणारे मासे खावेत. यामुळे शरीरात भरपूर कॅल्शियम राहते. नाहीतर वेळेपूर्वी सांधेदुखीचा त्रास होऊ लागतो.