Stop Rubbing Your Eyes: आपल्यापैकी अनेकांना वारंवार डोळे चोळण्याची सवय असते. हे जरी धोकादायक वाटत नसले तरी फिजिकल थेरपिस्ट डॉ. आकिब जमालसारखे तज्ज्ञ याची शिफारस करत नाहीत. त्यांच्या मते, डोळ्यांच्या आजूबाजूला जोरजोरात चोळण्यापेक्षा थोड्या प्रमाणात हलक्या दबावाने चोळणे चांगले. पण असे का?

डॉ. मनेंद्र, सल्लागार आणि एचओडी क्रिटिकल केअर विभाग, ग्लेनेगल हॉस्पिटल्स, हैदराबाद म्हणाले की, तुमचे डोळे चोळणे तुम्हाला धोकादायक वाटत नसले तरी त्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात.

Suresh Dhas On Santosh Deshmukh
Suresh Dhas : “आका हा सोपा आका नाही, ठराविक लोकांना प्रत्येक महिन्याला…”, आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Babasaheb Ambedkar , RSS , RSS Karad branch,
संघाविषयी आंबेडकरांच्या ‘आपुलकी’चे सर्व दावे संशयास्पद! 
Where skeleton flowers grow best
‘ही’ दुर्मिळ फुले पावसाच्या पाण्यात दिसतात आरशाप्रमाणे पारदर्शी; असे का? जाणून घ्या…
Zebra vs Crocodile fight video zebra escaped from crocodiles jaws netizens were shocked video goes viral
“नशीब नाही प्रयत्नांचा खेळ” मगरीच्या जबड्यातून असा निसटला झेब्रा; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
nylon manja news in marathi
अकोल्यात नायलॉन मांजामुळे डोळाच धोक्यात… प्रशासनाच्या नाकावर टिच्चून…
Yavatmal Bhumika Sujeet Rai, Bhumika Sujeet Rai,
दृष्टिहीन ‘भूमिका’ची वाचनाप्रती डोळस भूमिका! सलग १२ तास ब्रेल लिपीतील…
रात्री झोपण्यापूर्वी मोबाईलवर रील्स पाहताय? आरोग्यावर होऊ शकतात गंभीर परिणाम (फोटो सौजन्य @ Freepik)
रात्री झोपण्यापूर्वी मोबाइवर रील्स पाहताय? आरोग्यावर होऊ शकतात गंभीर परिणाम

हेही वाचा… “मला जिराफ म्हटलं जायचं”, सोनाली बेंद्रेवर एकेकाळी व्हायची टीका, बॉडिशेमिंगचा आरोग्यावर कसा होतो परिणाम, तज्ज्ञांनी केला खुलासा

“खूप जोरात घासल्यामुळे नाजूक ऊतींना इजा होऊ शकते, ज्यामुळे कॉर्नियाचे ओरखडे होतात किंवा केराटोकॉणससारखी कंडिशन होऊ शकते ज्यात कॉर्निया पातळ होतो. या सवयीमुळे सूक्ष्म रक्तवाहिन्या फाटून लालसरपणा किंवा जळजळ होऊ शकते,” असे डॉ. मनेंद्र म्हणाले.

तज्ज्ञांनी सांगितले की, जेव्हा आपण डोळे चोळतो, विशेषतः अस्वच्छ हातांनी, तेव्हा बॅक्टेरिया आणि घाण डोळ्यात जाऊ शकते, ज्यामुळे conjunctivitis (डोळ्यांचा संसर्ग) होऊ शकतो. “आपल्या डोळ्यांना स्पर्श करण्याचा योग्य मार्ग म्हणजे आपल्या हातांना स्वच्छ ठेवणे. अस्वच्छ हातांनी थेट डोळा चोळू नका. जर त्यांना खाज सुटली असेल किंवा तुम्हाला त्रासदायक वाटत असेल, तर कोल्ड कॉम्प्रेस थेरपीचा वापर करा,” असे डॉ. मनेंद्र यांनी सांगितले.

हेही वाचा… Fabulous Lives vs Bollywood Wives फेम शालिनी पासीने सांगितली डाएटमधली ‘ही’ सीक्रेट गोष्ट, घरोघरी असणाऱ्या या गोष्टीचा होतो आरोग्याला फायदा, तज्ज्ञ सांगतात…

“कोरडेपणासाठी किंवा अस्वस्थ वाटत असेल तर डोळे चोळण्यापेक्षा त्यात लुब्रिकेटिंग ड्रॉप्स घालणे सुरक्षित आहे,” असे डॉ. मनेंद्र यांनी नमूद केले.

“डोळ्यांना बाजूने मसाज करण्याची सामान्यतः शिफारस केली जात नाही, कारण जास्त दाबामुळे डोळ्यांच्या रचनेला इजा होऊ शकते. डोळ्याच्या आजूबाजूच्या भागाला नेहमी सौम्य वागणूक द्या आणि जर त्रास कायम राहिला तर डोळ्यांच्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या,” असे डॉ. मनेंद्र यांनी सांगितले.

हेही वाचा… Belly Fats: पोटाची चरबी वाढतेय? तज्ज्ञांनी सांगितलेली ‘ही’ पद्धत एकदा वापरून पाहा

(टीप : हा लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे. आपल्या दिनचर्येत कोणताही बदल करण्यापूर्वी नेहमी आपल्या आरोग्य चिकित्सकाचा सल्ला घ्या.)

Story img Loader