Do You Know Stop Throwing Out Banana Strings : फळे पोषक घटकांनी भरलेली असतात आणि एक आरोग्यदायी बाब म्हणून आहारात महत्त्वाची भूमिका बजावतात. पण, तुम्ही फळे खाण्याच्या वेळेस मनापासून विचार करता का? उदाहरणार्थ, केळी खाणार असाल; ज्यात पोटॅशियम भरपूर आहे, तर ते केळे तुम्ही संपूर्णपणे खाता का? अनेक जण केळीच्या कडांमध्ये असलेल्या स्ट्रिंग्स (फ्लोएम) काढून (Stop Throwing Out Banana Strings) टाकतात. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास केळ्याच्या आतील पांढरी तार (banana strings) तुम्हाला माहीत आहे का, तीही आरोग्यासाठी चांगली असते. त्यामुळे पुढच्या वेळी केळी खाल्ल्यावर ते संपूर्ण फळ म्हणजे त्यातल्या फायबरसकट खा.

तर याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने उजाला सिग्नस ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या आहारतज्ज्ञ डॉ. एकता सिंघवाल यांच्याशी संवाद साधला. केळी या फळावरील कमी महत्त्वाच्या वाटणाऱ्या स्ट्रिंग्स (strings) आरोग्यासाठी खऱ्या तर खूप महत्त्वाच्या आहेत. कारण- केळ्याबरोबर स्ट्रिंग्स (strings) खाल्ल्याने, तुम्ही तुमच्या दैनंदिन फायबरची मात्रा वाढवू शकता. फायबरमुळे पाचन आरोग्य, आतड्याची नियमितता राखण्यास मदत मिळते. त्यामुळे आतड्याच्या आरोग्यास समर्थन मिळते आणि ही बाब वजन व्यवस्थापित होण्यास साह्यत ठरते . स्ट्रिंग्ससह संपूर्ण केळी खाल्ल्याने (Stop Throwing Out Banana Strings) तुम्ही अतिरिक्त सप्लिमेंट्स किंवा खाद्यपदार्थांशिवाय तुमचे दैनंदिन फायबरचे सेवन वाढवू शकता.

हेही वाचा…Monk Fruit : साखरेपेक्षाही गोड असतं ‘हे’ फळ! अतिसेवनानं वाढतील हृदयाच्या समस्या; वाचा तज्ज्ञ काय म्हणतात…

चव व टेक्श्चरमध्ये योगदान…

ही स्ट्रिंग्स सूक्ष्म असली तरी केळीच्या एकूण चव व टेक्श्चरमध्ये त्यांचे योगदान असते. जेव्हा तुम्ही या स्ट्रिंग्स स्मूदीमध्ये मिक्स करता किंवा बेक केलेल्या पदार्थांमध्ये घालता, तेव्हा त्या पदार्थाला अनोखी चव व टेक्श्चर मिळते. त्यामुळे खाण्याचा अनुभव अधिक चांगला होतो, असे डॉक्टर सिंगवाल यांनी सांगितले. अखेर, ही स्ट्रिंग्स केळीच्या नैसर्गिक संरचनेचा एक महत्त्वाचा भाग आहेत. या उपयुक्त स्ट्रिंग्सना वाया न घालता, आपण केळीच्या संपूर्ण पोषणाचा लाभ घेऊ शकतो. म्हणजेच केळी खाताना संपूर्ण फायदा घेण्यासाठी या स्ट्रिंग्सचा समावेश करणे महत्त्वाचे आहे, असे डॉक्टर सिंगवाल यांनी सांगितले.

तर, पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही केळी खाता किंवा कापता, तेव्हा त्या स्ट्रिंग्सना लक्षात ठेवा (Stop Throwing Out Banana Strings). ही स्ट्रिंग्स तुमचे आरोग्य सुधारण्यास, तुमच्या खाद्यपदार्थांची चव वाढवण्यास मदत करतात. त्याशिवाय त्यामुळे तुम्हाला चांगले आयुष्य जगण्यासाठी योगदान देण्यातही त्यांची मदत मिळू शकते, असे डॉक्टर सिंगवाल म्हणाल्या आहेत. म्हणजेच या स्ट्रिंग्सचा समावेश करून तुम्ही तुमचे आरोग्य, पर्यावरण अशा दोन्ही गोष्टी साधू शकता.