Strawberry For Knee Pain: भारतात आता हळूहळू थंडीची लाट पसरण्यास सुरुवात झाली आहे. थंडी म्हटली की काही मोसमी फळे पहिली डोळ्यासमोर येतात त्यातीलच एक म्हणजे लालबुंद रसाळ स्ट्रॉबेरी. पोषक आणि अँटिऑक्सिडंट सत्वांचा मुबलक साठा असलेली स्ट्रॉबेरी ही गुडघेदुखीपासून मुक्त होण्यासाठी मदत करू शकते असा सेवा अलीकडेच रसायनशास्त्रज्ञ डॅन गुब्‍लर यांनी इंस्‍टाग्राम रीलमध्‍ये केला होता. “दररोज एक चतुर्थांश कप स्ट्रॉबेरीचे सेवन केल्याने गुडघ्यांमध्ये दाह होण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होते असे गुब्लर म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याच व्हायरल दाव्यानुसार, स्ट्रॉबेरी खरोखरच मदत करू शकते का याविषयी जाणून घेण्यासाठी इंडियन एक्सस्प्रेसने डॉ अर्चना बत्रा, पोषणतज्ज्ञ , फिजिओथेरपिस्ट आणि प्रमाणित मधुमेह संबंधित मार्गदर्शक यांच्याशी संवाद साधला. डॉ. बत्रा यांनी सांगितले की स्ट्रॉबेरी हा गुडघेदुखीवर थेट उपचार नसला तरी त्यातील पोषक सत्व हे स्वस्थ राहण्यासाठी मदत करू शकतात.

डॉ बत्रा यांनी indianexpress.com ला सांगितले की, “स्ट्रॉबेरीमधील एक महत्त्वाचा घटक म्हणजे उच्च व्हिटॅमिन सी, यामुळे कोलेजन निर्मितीस मदत होते देते. कोलेजन हा उतींचा एक महत्त्वाचा घटक आहे, जो सांध्यांना उशीसारखे संरक्षण देतो. म्हणून, स्ट्रॉबेरी सारख्या व्हिटॅमिन सी समृद्ध पदार्थांचे सेवन केल्याने सांधे सुदृढ राहण्यास मदत होते आणि गुडघेदुखी कमी होऊ शकते. शिवाय, स्ट्रॉबेरीमध्ये अँथोसायनिन्स, (ज्यामुळे स्ट्रॉबेरीला नैसर्गिक लाल रंग प्राप्त होतो) मुबलक असते ज्यात दाहक-विरोधी गुणधर्म असतात. “सांध्यांमधील जळजळ अनेकदा गुडघेदुखीशी संबंधित असते आणि दाहक-विरोधी घटक असलेले अन्न ही अस्वस्थता कमी करण्यास मदत करू शकते.”

डॉ मुदित खन्ना, ऑर्थोपेडिक आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन, वोक्हार्ट हॉस्पिटल्स मुंबई सेंट्रल यांनी सांगितले की, गुडघेदुखीसाठी कारणीभूत असलेल्या TNF-α, (दाह वाढवणारा घटक) आणि लिपिड पेरोक्सिडेशनचे उत्पादने कमी होण्यास स्ट्रॉबेरीमुळे मदत होऊ शकते. यामुळे वेदना आणि जळजळ कमी होऊ शकते, ज्यामुळे स्ट्रॉबेरी ऑस्टियोआर्थरायटिस असलेल्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. याव्यतिरिक्त, स्ट्रॉबेरीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स ऑक्सिडेटिव्ह तणावाचा सामना करण्यास मदत करू शकतात, ज्यामुळे सांध्यांच्या वेदना कमी होण्यास मदत होऊ शकते.

हे ही वाचा<< ग्लूटेन खायचंच नाही म्हणून ब्रेड, पीठं टाळताय? तुमच्या शरीरासाठी ‘हे’ ठरू शकतं घातक, डॉक्टरांनी सांगितलं कारण

दरम्यान ,डॉ. बत्रा यांनी हे ही नमूद केले की, स्ट्रॉबेरीमुळे गुडघेदुखी कमी होत असल्याचे वैज्ञानिक पुरावे नाहीत. मात्र यामुळे वेदना कमी होऊन सांधेदुखी नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते. मात्र केवळ स्ट्रॉबेरीवर उपचार म्हणून अवलंबून राहणे योग्य ठरणार नाही. यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, संतुलित वजन राखणे आणि गरज असताना वैद्यकीय सल्ला आवर्जून घेणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Strawberry for knee pain eat winter special fruits to reduce burning doctor tells real benefits of berries for pain in joints svs
Show comments