How To Feel Relaxed : दिवसेंदिवस बदलणाऱ्या जीवनपद्धती आणि प्रत्येक क्षेत्रातील स्पर्धेमुळे वाढत जाणारा ताण यांमुळे आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. विशेषत: मोठ्या शहरात राहणाऱ्या नोकरदारांमध्ये कंबरदुखी, पाठदुखी व डोकेदुखीची समस्या वाढत आहे. त्यावर उपाय म्हणून आपण वेदनाशामक बाम, स्प्रे आदी अनेक गोष्टींचा उपयोग करतो. पण तुम्हाला माहीत आहे का की, तुम्ही तुमचा तणाव झटकून टाकू शकता (Stress Reliever)…

क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ डॉक्टर सलीहा आफ्रिदी यांनी, फिरणे आणि हलणे (हालचाल करणे) यांमुळे शरीराला तणावमुक्त होण्यास मदत मिळू शकते (Stress Reliever), असा दावा केला आहे. ‘द मेंटल हेल्थ ॲक्टिविस्ट’ यांनी शेअर केले की, तुम्ही तुमच्या शरीराच्या अवयवांची हालचाल जरी केली (shaking your body parts) तरी तणावापासून मुक्त होण्यास मदत करू शकते. कारण- आपल्या शरीरात खूप ताण आणि तणाव असतो. पण, आपल्याला हे माहीत नसते. उदाहरणार्थ- जेव्हा तुम्ही एखादा प्राणी बघता तेव्हा घाबरता किंवा तुमचे शरीर थरथर कापते. त्यामुळे तर या सगळ्यावर उपाय म्हणून तुमचा दिवसाची सुरुवात शरीराच्या अवयवांची हालचाल करून करा, असे तुम्ही तीन मिनिटे करू शकता. शरीर झटकून टाकल्यामुळे तुम्हाला खूप आराम मिळेल, असे डॉक्टर आफ्रिदी यांनी ‘द बॅलन्स थिअरी पॉडकास्ट’वरील संभाषणात सांगितले आहे.

Masaba Gupta's Winter Breakfast
मसाबा गुप्ता हिवाळ्यात नाश्त्यामध्ये खाते बाजरीचे धिरडे; जाणून घ्या तज्ज्ञांकडून याचे फायदे
Daily zodiac sign horoscope For 17 December 2024
१७ डिसेंबर पंचांग: १२ पैकी ‘या’ राशींचे प्रगतीच्या…
pm narendra modi on amit shah dr babasaheb ambedkar congress
अमित शाहांवरील टीकेला पंतप्रधान मोदींनी दिलं प्रत्युत्तर; डॉ. आंबेडकरांविषयीच्या विधानावरून विरोधकांवर हल्लाबोल!
Shaina NC Arvind Sawant
Shaina NC : अरविंद सावंत यांची जीभ घसरली; अपशब्द वापरल्याने शायना एन. सी. संतापल्या, म्हणाल्या, “महिलेला…”
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar : बाबासाहेबांचा दोनदा निवडणुकीत पराभव होण्यावर प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान
Mumbai passenger boat sank in Elephanta area on Wednesday evening
एलिफंटाजवळ प्रवासी बोट बुडाली, एक जण ठार
Amit Shah on Ambedkar
अमित शाह यांनी आंबेडकरांवर केलेली टिप्पणी वादात? काँग्रेसकडून टीका, माफी मागण्याची मागणी

हा उपाय काम करेल का? (Stress Reliever)

तर याबद्दल जाणून घेण्यासाठी, दी इंडियन एक्स्प्रेसने, हैदराबाद येथील अपोलो हॉस्पिटल्सच्या सल्लागार न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर सुधीर कुमार यांच्याशी चर्चा केली. तेव्हा त्यांनी सांगितले की, ‘शेक इट ऑफ’ ही थिअरी ताण आणि टेन्शन दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे. दैनंदिन हालचालींमध्ये दीर्घकाळ बसणे आणि शारीरिक इनॲक्टिव्हिटी यांचा समावेश होतो. कॉम्प्युटरवर काम केल्याने जास्त वेळ मानेच्या आणि पाठीच्या खालच्या स्नायूंवर ताण येतो. परिणामी, जेव्हा दिवस संपतो तेव्हा स्नायू ताठ, तणावग्रस्त होतात. म्हणून शरीराचे वेगवेगळे अवयव कमी कालावधीसाठी (तीन ते पाच मिनिटे) हलवल्याने स्नायूंना आराम मिळतो आणि तणाव कमी होतो, असे डॉक्टर कुमार यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा…आले-लिंबाचे पाणी खरंच यकृताच्या आरोग्यासाठी योग्य आहे का? शरीरावर कसा होतो परिणाम?

फरिदाबाद येथील फोर्टिस हॉस्पिटलच्या डायरेक्टर, न्यूरोलॉजी, डॉक्टर विनीत बंगा यांनी, ‘शरीराच्या अवयवांची हालचाल करणे’ तणाव दूर करण्यासाठी आणि मज्जासंस्था रीसेट करण्यासाठी ‘एक प्रभावी आणि गैरआक्रमक मार्ग’ असू शकतो. तेव्हा तणाव व्यवस्थापनासाठी एक नैसर्गिक उपाय आहे.

जेव्हा ताण येतो तेव्हा शरीर फाईट किंवा फ्लाइट मोडमध्ये प्रवेश करते, ज्यामुळे स्नायूंवर ताण येतो. शरीराचे अवयव हलणे किंवा हलवणे हे पॅरासिम्पेथेटिक मज्जासंस्था सक्रिय करते. त्यामुळे शरीराला आराम मिळेल किंवा शरीराला पुनर्प्राप्तीसही मदत मिळू शकते (Stress Reliever). ही पद्धत पेन्ट-अप एनर्जी (pent-up energy), रक्ताभिसरण सुधारण्यास आणि कॉर्टिसोल यांसारखे तणाव संप्रेरक कमी करण्यास मदत करू शकते. कालांतराने हा सराव अधिक संतुलित मज्जासंस्थेला समर्थन देऊ शकते; ज्यामुळे चांगले इमोशनल रेग्युलेशन (emotional regulation) होऊन चिंता करण्याची पातळी कमी होते, असे डॉक्टर विनीत बंगा म्हणाले आहेत.

डॉक्टर कुमार यांच्या मते, ‘शेक इट ऑफ’ ही थिअरी (Stress Reliever) ॲक्टिवेट्स पॅरासिम्पेथेटिक मज्जासंस्था सक्रिय करते आणि मेंदूला शांत होण्यासाठी, आराम देण्यास आणि काही गोष्टी सोडून देण्याचे संकेत देते.

शरीराच्या अवयवांच्या हालचाली मूड सुधारू शकतात आणि तुमच्यातील सकारात्मकता वाढवू शकतात. शरीराच्या अवयवांच्या हालचाली किंवा कंपनांमुळे स्नायुूचा ताण सुटण्यास, अतिरिक्त ॲड्रेनालाईन जळण्यास आणि मज्जासंस्थेला शांत करण्यास मदत करतात, ज्यामुळे शरीरातील तणावाची पातळी नियंत्रित होते. शेकिंग थेरपी बसून किंवा उभे राहून केली जाऊ शकते. फक्त शरीराच्या विशिष्ट भागांवर लक्ष केंद्रित करा आणि शरीराच्या अवयवांना हलवण्याचा प्रयत्न करा, असे डॉक्टर कुमार म्हणाले. या सगळ्या गोष्टींसाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

Story img Loader