Heart Attack: हृदयविकार ही एक गंभीर समस्या आहे. त्याचा परिणाम आज अनेक लोकांमध्ये दिसून येतो. हा आजार खराब जीवनशैली, तणाव, चिंता आणि इतर कारणांमुळे होतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, हृदयविकार देखील जगभरातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. जर तुमचा रक्तगट नॉन-ओ असेल तर तुम्हाला अधिक काळजी घेण्याची गरज आहे. तुम्हाला हृदयविकाराचा धोका आहे की नाही हे जाणून घ्यायचे असेल, तर संशोधन काय सांगते ते जाणून घ्या…

अभ्यास काय सांगतो?

एका अभ्यासानुसार नॉन ओ रक्तगट असलेल्या लोकांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो. रक्तगटामुळे हृदयविकाराचा धोका कसा वाढू शकतो हे संशोधकांनी शोधून काढले आहे. अभ्यासाचे निष्कर्ष आर्टिरिओस्क्लेरोसिस, थ्रोम्बोसिस, व्हॅस्क्युलर बायोलॉजी आणि अमेरिकन हार्ट असोसिएशन (एएचए) मध्ये प्रकाशित झाले आहेत. ४००,००० हून अधिक लोकांवर केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की A किंवा B रक्तगट असलेल्या लोकांना O रक्तगट असलेल्या लोकांपेक्षा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका ८ टक्के जास्त असतो.

attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!
Vidhan Sabha election, Pune blood shortage, Pune,
विधानसभा निवडणुकीमुळे पुण्यावर रक्तटंचाईचे सावट! रक्तपेढ्यांमध्ये पाच दिवसांचाच रक्ताचा साठा शिल्लक
Dengue, chikungunya fever, Dengue Pune,
दिवाळीनंतर पुण्यात डेंग्यू, चिकुनगुन्याचा ताप अचानक कमी! जाणून घ्या कारणे
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
Fear Avoidant Personality Disorder Personality relationship Personality Loksatta Chaturang
स्वभाव, विभाव: भीती आणि न्यूनगंडाचा फास
Robotic Bariatric Surgery, Obesity, Robotic Bariatric,
‘रोबोटिक बॅरिएट्रिक’ शस्त्रक्रियेद्वारे लठ्ठपणाला कात्री! अधिक अचूकपणे, कमी वेळेत होणाऱ्या प्रक्रियेविषयी जाणून घ्या…

( हे ही वाचा: हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिना आधी शरीरात दिसून येतात ‘हे’ बदल; वेळीच सावध व्हा)

युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीने २०१७ मध्ये केलेल्या आणखी एका अभ्यासात १.३६ दशलक्षाहून अधिक लोकांचा समावेश होता. ओ रक्तगट वगळता इतर सर्व रक्तगटांमध्ये कोरोनरी आणि हृदयाशी संबंधित समस्या होण्याचा धोका ९ टक्क्यांनी जास्त असल्याचेही या अभ्यासात आढळून आले आहे.

कोणाला नक्की धोका आहे?

संशोधकांनी रक्तगट Aआणि ब्लड ग्रुप B या दोन्हींची तुलना केली आणि त्यांना आढळून आले की B रक्तगट असलेल्या लोकांना हृदयविकाराचा धोका सर्वाधिक असतो. अभ्यासानुसार, B रक्तगट असलेल्या लोकांना O रक्तगट असलेल्या लोकांपेक्षा मायोकार्डियल इन्फेक्शन (हृदयविकाराचा झटका) जास्त धोका असतो. रक्तगट A असलेल्या लोकांमध्ये O रक्तगट असलेल्या लोकांपेक्षा हार्ट फेलियरचा धोका ११ टक्के जास्त असतो. हृदय फेलियर आणि हृदयविकाराचा झटका हे दोन्ही हृदयाशी संबंधित आजार आहेत. परंतु हार्ट फेलियर हळूहळू विकसित होतो तर हृदयविकाराचा झटका अचानक येतो.

असे का घडते

युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीच्या मते, ओ रक्तगट नसलेल्या रक्तगटांमध्ये हृदयविकाराचा झटका किंवा हृदय फेलियरच्या धोक्यामागे अनेक कारणे असू शकतात. या रक्तगटाच्या लोकांमध्ये रक्त गोठण्याची प्रक्रिया जलद होते. २०१७ च्या अभ्यासानुसार, नॉन ओ रक्तगट असलेल्या लोकांमध्ये नॉन-विल्ब्रँड घटकांचे प्रमाण जास्त असते. हे थ्रोम्बोटिक समस्यांशी संबंधित रक्त गोठणारे प्रथिने आहे.

( हे ही वाचा: विश्लेषण: पहिल्या हार्ट अटॅकआधी पुरुष व महिलांमध्ये दिसतात वेगवेगळी लक्षणे; वयानुसार कसा ओळखाल धोका?)

A आणि टाइप B रक्तगट असलेल्या लोकांना रक्त गोठण्यामुळे थ्रोम्बोसिसचा धोका ४४ टक्के जास्त असतो. हृदयविकाराच्या झटक्यासाठी रक्ताच्या गुठळ्या जबाबदार असतात. हे कोरोनरी धमनी अवरोधित करते, हृदयाच्या स्नायूंना ऑक्सिजन आणि पोषक तत्वांपासून वंचित ठेवते. यामुळेच हृदयविकाराचा झटका येतो.

हृदयविकाराचा झटका कशामुळे येतो?

जे लोक दिवसाचे २४ तास बसून असतात किंवा बसून काम करतात त्यांना हृदयविकार होण्याची शक्यता जास्त असते. कोणत्याही शारीरिक हालचाली दरम्यान अशा लोकांच्या हृदयाचे ठोके वाढतात आणि असे लोक लवकर थकतात. त्यांच्या रक्तात चरबीचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ते हृदयाला रक्तपुरवठा खंडित होण्यास तसेच रक्ताच्या गुठळ्या होण्यास अधिक संवेदनाक्षम असतात. यामुळे हृदयविकाराचा धोकाही वाढतो.

( हे ही वाचा: हार्ट अटॅकपासून करायचा आहे स्वतःचा बचाव? ‘ही’ औषधाची गोळी नेहमी जवळ ठेवा)

हृदयविकाराचा झटका कसा टाळता येईल?

नियमित व्यायाम किंवा योगासने हे सर्व दुष्परिणाम टाळू शकतात. न चुकता नियमित व्यायाम किंवा योगासने करणे नक्कीच फायदेशीर आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सुमारे तीन आठवड्यांनंतर, किती व्यायाम करायचा याचा सल्ला घेण्यासाठी ‘ट्रेडमिल टेस्ट’ करणे चांगले. याशिवाय तंबाखू आणि दारूचे सेवन टाळावे. ताण घेऊ नये. तेलकट आणि बाहेरचे अन्न कमी खा. सकस आहार घ्या.