नुकत्याच प्रकाशित झालेल्या मेटा-विश्लेषणानुसार, “डाळिंब खाल्ल्याने मधुमेह असलेल्या लोकांमध्ये जेवणानंतर वाढणाऱ्या साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते. याचे कारण असे की, डाळिंबातील प्युनिकलागिन (Punicalagin) नावाचे फायटोकेमिकल (Phytochemical) हे अन्नपदार्थ पचण्यास मदत करते. रक्तप्रवाहात ग्लुकोज सोडणाऱ्या एन्झाइमची क्रिया रोखते. डाळिंबातील इतर फायटोकेमिकल्स जसे की पॉलिफेनॉल्स (polyphenols), फ्लेव्होनॉइड्स (Flavonoids ) आणि टेरपेनॉइड्स ( Terpenoids) देखील ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि जळजळ कमी करण्यासाठी ओळखले जातात.
“डाळिंबाच्या रसाच्या एका डोसमुळे उपवासादरम्यान ग्लुकोज कमी होते आणि निरोगी व्यक्तींमध्ये इन्सुलिन वाढते,” असे लॉस एंजेलिस (यूसीएलए) येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी आयोजित केलेल्या आणि सायन्स डायरेक्टमध्ये प्रकाशित केलेल्या मेटा-विश्लेषणात असे दिसून आले आहे. याबाबत फोर्टिस सी-डॉक हॉस्पिटल फॉर डायबिटीज अँड अलाईड सायन्सेसचे अध्यक्ष डॉ. अनुप मिश्रा यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना, मधुमेहींनी आहारात फळं कशी समाविष्ट केली जाऊ शकतात, याबद्दल माहिती दिली आहे.
डाळिंब मधुमेह नियंत्रणात कशी मदत करते?
डाळिंबाचे मधुमेह, हृदयविकार आणि अगदी कर्करोगावर होणारे परिणाम यावर बरेच अभ्यास झाले आहेत, पण ते सर्व निर्णायक नाहीत. विद्यमान पुरावे काय सांगतात हे शोधणे हा या अभ्यासाचा उद्देश होता. संशोधनात, जेवणानंतर रक्तातील साखरेच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यावर डाळिंबाचा मध्यम स्वरुपात परिणाम होतो हे दिसून येते. हे प्युनिकलागिनमुळे (punicalagin ) होते, जे जेवणानंतर रक्तामध्ये हळूहळू शर्करा सोडण्यास परवानगी देते.
पण याचा अर्थ असा नाही की, ”मधुमेह असलेल्या प्रत्येक व्यक्तीने डाळिंबाचे सेवन सुरू केले पाहिजे. हा अभ्यास काही फायद्यांकडे निर्देश करतो. डाळिंब हे सामान्यतः सेवन केले जाणारे फळ नसल्यामुळे, लोक त्यांच्या आहारात समाविष्ट केलेल्या फळांपैकी एक म्हणून त्याचे सेवन करू शकतात. परंतु, मधुमेह असलेल्यांसाठी सर्व फळांच्या सेवनाबाबत काही निर्बंध लागू होतात.”
मधुमेह असलेल्या व्यक्ती किती फळे खाऊ शकतात, याची मर्यादा आहे का?
फळांमध्ये नैसर्गिक शर्करा असते, त्यामुळे ते जास्त प्रमाणात सेवन करू नये. एखादी व्यक्ती किती फळे खाऊ शकते हे त्यांच्या रक्तातील साखरेच्या पातळीच्या नियंत्रणावर आणि त्यांच्या स्वतःच्या मनावर अवलंबून असते. काही लोकांना काही विशिष्ट फळांच्या सेवनामुळे साखरेचे प्रमाण जास्त वाढते. सर्वसाधारणपणे, ज्यांचा मधुमेह नियंत्रणात आहे ते दिवसातून दोन वेळा फळांचे सेवन करू शकतात. अनियंत्रित मधुमेह असलेल्या व्यक्तीसाठी, फळे एका दिवसात एक किंवा त्यापेक्षा कमी प्रमाणात मर्यादित ठेवावीत. हंगामी फळे समाविष्ट करणे चांगले आहे.
अशी इतर फळे आहेत का, जी तुम्ही खाऊ शकता?
असे अभ्यास आहेत, जे मधुमेहासाठी ब्लूबेरीचे फायदेदेखील दर्शविले आहेत. परंतु, हे स्थानिक फळ नाही आणि ते महाग असू शकतात. त्याऐवजी लोक जांभुळसारख्या इतर फळांचे सेवन करू शकतात. आंब्याच्या सेवनामुळे होणाऱ्या परिणामाचे पुरावे अद्याप गोळा केले जात आहेत.
हेही वाचा – दूध, दही, बटर, पनीर खाऊन शरीर होतं लठ्ठ? तज्ज्ञांनी सांगितले किती प्रमाणात करावे सेवन?
रात्री फळे खाऊ शकतात का?
रात्री फळे खाण्यास काही हरकत नाही. खरं तर, काही रुग्णांना याची शिफारस केली जाते. ज्यांना हायपोग्लायसेमिक एपिसोड (Hypoglycemic episodes) होण्याची शक्यता आहे, त्यांना रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दूध आणि काही बदाम खाण्यास सांगतो. परंतु, अनेकांना दूध पिणे आवडत नाही, म्हणून त्याऐवजी फळांचा सल्ला देतो. सकाळी ११ ते ५ या वेळेत जेवणादरम्यान फळे खाणे उत्तम आहे, असे डॉ. मिश्रा सांगतात.