अन्न खाण्यासाठी आणि ते चघळण्यासाठी दात मोठी भूमिका बजावतात. दातदुखी ही एक सामान्य समस्या आहे, परंतु कधीकधी ही समस्या इतकी वाढते की त्यामुळे होणाऱ्या वेदना असाह्य होतात. अशा परिस्थितीत दातदुखीवर उपचार करण्यासाठी दंतचिकित्सकाकडे जाणे मजबुरी बनते. दातदुखीची अनेक कारणे आहेत. परंतु सर्वात महत्वाचं दातांच्या स्वच्छतेचा अभाव, दातांमधील पोकळी, जंतुसंसर्ग, पौष्टिकतेचा अभाव आणि काही वेळा दात कमकुवत झाल्यामुळेही दातदुखीची समस्या उद्भवते. तर प्रत्येक दातदुखी सारखी नसते आणि तिची कारणेदेखील वेगवेगळ्या प्रकारची असू शकतात. याच दातदुखीच्या पाच प्रकारांबद्दल आपण जाणून घेणार आहोत ज्याचा सामन्यपणे अनेकांना त्रास होतो.
दात दुखण्याची कारणे पुढीलप्रमाणे –
- जबड्याच्या मागे वेदना –
हेही वाचा- सकाळी उठल्यावर तुमचा चेहराही सुजलेला दिसतो? तर यामागे असू शकतात ‘ही’ गंभीर कारणे, जाणून घ्या
अनेकांना दातांच्या शेवटच्या भागात म्हणजे जबड्याच्या मागच्या बाजूला तीव्र वेदना होतात. या वेदना कायम राहिल्यास जबड्याला सूज येऊ लागते. अनेकदा या वेदना अक्कल दाढ काढल्यामुळे होऊ शकतात. तर कधी कधी मागचे दात जास्त घासल्यामुळे जबड्याच्या मागे वेदना होतात.
- जेवताना होणारी दातदुखी –
एखादी गोष्ट चघळताना किंवा सोलताना तुमचे दात दुखत अससतील तर त्याचे कारण दाताचे तुटने किंवा पोकळी असू शकते. अनेकदा आपणाला समजत नाही, पण काही दुखापतीमुळे किंवा आदळल्याने दाताला तडा जातो आणि त्याची मुळं बाहेर येतात आणि एखादी गोष्ट चघळताना, खाताना ते दात दुखू लागतात.
- अधूनमधून होणारी दातदुखी –
जर तुमचे दात अधुनमधून दुखत असतील तर मग समजून घ्या की हा संसर्ग पोकळीमुळे होत आहे. दातांमधील पोकळी हळूहळू प्रभावित होते आणि म्हणून ही वेदना अधुनमधून उद्भवते आणि नंतर सतत होते. कधीकधी हिरड्या कमकुवत झाल्यामुळे दातांमध्ये अधून मधून वेदना होतात. अशा स्थितीत एखादी गोष्ट खातना हिरड्यांमधून रक्तही येऊ शकते.
हेही वाचा- डायबिटीज आणि बीपीच्या रुग्णांसाठी लाल द्राक्ष ठरु शकतात फायदेशीर? तज्ञ सांगतात…
- संवेदना
दात दुखण्याबरोबरच दातांमध्ये थंड, गरम आणि तीक्ष्ण अशा संवेदना जाणवत असतील तर त्याला दातांची संवेदना म्हणतात. हे दात संक्रमण, पोकळी, दातांची झीज यासह दातांवर झालेली शस्त्रक्रिया यामुळे हा त्रास होऊ शकतो. दात संवेदनशील झाल्यामुळे संवेदना सुरु होते.
- सतत वेदना
जर दाताचे मूळ कमकुवत झाले असेल किंवा खराब झाले असेल तर दातामध्ये तीक्ष्ण आणि सतत वेदना होतात. त्यासाठी रूट कॅनॉल प्रक्रिया करावी लागते. जर मुळ बाहेर आले असेल किंवा संसर्ग झाला असेल तर दातांमध्ये तीक्ष्ण आणि सतत वेदना होतात.
दातदुखीपासून कसा बचाव कराल ?
- दातांखाली लवंग ठेवल्यास दातदुखीपासून आराम मिळू शकतो.
- कच्चा लसूण दातांना बॅक्टेरिया, इन्फेक्शन आणि फंगसपासून वाचवतो, त्यामुळे कच्चा लसूण नियमित चघळला पाहिजे.
- कमकुवत हिरड्यांमुळे दातदुखी होत असल्यास हळद, मीठ आणि मोहरीच्या तेलाने दातांची मालिश करु शकता.
- कांदा हे एक उत्तम अँटी-बॅक्टेरियल फूड देखील आहे, त्याचा रस कापसाच्या माध्यमातून दुखणाऱ्या जागी लावल्याने आणि कच्चा कांदा चघळल्यानेही दातदुखीपासून आराम मिळू शकतो.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे, अधिकच्या माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा)