Sugarcane Juice: उसाचा रस आपल्याला सगळ्यांनाच आवडतो.उन्हाळ्यात आपल्याला काहीतरी थंड असं पेय प्यावेसे वाटते. पण आपल्या आरोग्यासाठी रोज रोज थंड कोल्डड्रीक पिणं हे काही चांगले नसते त्यात अनेक प्रकारच्या गोष्टी समाविष्ट असतात. त्यामुळे कॉल्डड्रीक्सचे जास्त सेवन केल्यानं ते आपल्याला आरोग्यासाठी हानिकारकही ठरू शकते. तेव्हा नैसर्गिक घटकांचा आपण आपल्या आहारामध्ये समावेश करून घेऊ शकतो. उसाचा रस उन्हाळ्यात थंड पेय म्हणून पाहिला जातो.हा रस शरीराला पाण्याचा पुरवठा करतो तसेच लोह, खनिजांसह अनेक पोषक तत्वे यातून मिळतात. उसाचा रस बनवताना साखर, मीठ, लिंबू आणि बर्फ मिसळून रस तयार केला जातो. पण अनेकदा मनात प्रश्न येतो की मधुमेहाच्या रुग्णांनी उसाचा रस सेवन करावा की नाही? चला तर मग जाणून घेऊया काय बरोबर आहे.
मधुमेहींनी उसाचा रस प्यावा का?
उसाच्या रसात साखरेचे प्रमाण जास्त असल्याने मधुमेही रुग्णांना त्रास होऊ शकतो. मधुमेही रुग्णांनी उसाच्या रसापासून दूर राहावे. उसाचा रस रिफाइंड न करता थेट उसातून काढला जातो, त्यामुळे साखरेचे प्रमाण जास्त असल्याने मधुमेहामध्ये त्याचा रस सेवन करू नये.
मधुमेह रुग्णांसाठी उसाचा रस घातक
साखर शरीरात ग्लुकोज वाढवण्याचे काम करते. इन्सुलिन योग्य प्रकारे न मिळाल्याने ग्लुकोजचे नियंत्रण राहत नाही. म्हणूनच मधुमेहाच्या रुग्णांना साखरयुक्त पेय न पिण्याचा सल्ला दिला जातो. साखरेमुळे शरीरातील साखरेची पातळी खूप वेगाने वाढू शकते. त्यामुळे साखरेच्या रुग्णांनी उसाच्या रसापासून अंतर ठेवणे चांगले.
काय आहेत गुणधर्म?
आपल्याला उन्हाळ्यात एनर्जीची गरज असते तेव्हा उसाचा रस प्यायल्यानं आपल्याला तेवढी एनर्जी मिळते. यामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याची किमया असते. तुम्ही जर का रोज उसाच्या रसाचे सेवन केलेत तर तुम्हाला अनेक रोगांपासून मुक्तताही मिळू शकते. त्याचबरोबर यानं तुम्हाला कुठलं एनर्जी बुस्टिंग ड्रींकही घ्यायची गरज नाही. उसाचा रस हे स्वत: एका ओआरएसप्रमाणे काम करते. यानं डिहायड्रेशनही दूर होते.
पोषक तत्वांनी समृद्ध
साच्या रसात साखर पूर्णपणे नसते. त्याचे प्रमाण पाहिल्यास त्यात ७० ते ७५ टक्के पाणी असते. त्यामुळे शरीरातली पाण्याची कमतरता भरून येईल व किडनी स्टोन सारख्या आजारांपासून तुम्ही स्वतःला वाचवू शकता. उसाचा रस तया करताना त्यावर कोणतीही केमीकल प्रक्रिया केली जात नाही.
हेही वाचा – मधुमेहींमध्ये साखर वाढू नये म्हणून आंबा खाण्याचे 5 नियम
उसाच्या रसात साखर किती असते?
सुमारे २४० मिली उसाचा रस घेतल्यावर त्यात साखरेचे प्रमाण ५० ग्रॅमपर्यंत होते. उसामध्ये प्रथिने आणि चरबी नसतात. एका अभ्यासानुसार पुरुषांनी जास्तीत जास्त 9 चमचे आणि महिलांनी 6 चमचे साखर खावी. यापेक्षा जास्त साखर खूप नुकसान करते.