नवी दिल्ली : महिलांनी आहारात दररोज गोड पेयांचा समावेश केला तर त्यांना यकृताचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते, असा निष्कर्ष अमेरिकेतील संशोधकांनी काढला आहे. ‘ब्रिघम अ‍ॅन्ड वूमेन्स’ हॉस्पिटलने यासंबंधी संशोधन केले आहे. यामध्ये ९८ हजार ७८६ महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी ज्या महिला दररोज एक किंवा अधिक साखर असलेले पेय आहरात समावेश करतात त्यापैकी ६.८ टक्के महिलांना यकृताच्या कर्करोगाचा धोका ८५ टक्के वाढतो, असे दिसून आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> Health Special: स्पॉन्डिलायटीस का होतो? त्याचे किती प्रकार आहेत?

‘जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल असोसिएशन नेटवर्क ओपन’मध्ये प्रकाशित या संशोधनाचे लेखक लाँगलँग झाओ यांनी सांगितले की, साखरेपासून तयार केलेले पेय महिलांच्या आरोग्यासाठी अधिक घातक आहेत. त्यामुळे ‘क्रॉनिक लिव्हर’मुळे मृत्यूचे प्रमाण अधिक असते. अशा प्रकारचे हे पहिले संशोधन आहे. या संशोधनात स्वयंसेविका असलेल्या महिलांपैकी ज्या महिलांनी यकृतसंबंधी आजार असल्याची माहिती दिली, त्या महिला दररोज फ्रुट ज्यूस आणि शीतपेय पीत होत्या, असे स्पष्ट झाले आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sugary drink consumption can increase liver cancer risk in women zws
Show comments