Summer health tips: उन्हाळा आला की, वेगवेगळ्या आरोग्यदायक समस्यांना प्रत्येकालाच तोंड द्यावं लागतं. अनेक रोगांसोबतच या दिवसात नाकातून रक्त येणे ही सर्वात मोठी समस्या अनेकांना भेडसावते. उन्हाळ्यात तापमान वाढले की हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी होते. त्यामुळे नाकात कोरडेपणा येतो. नाकात कोरडेपणा आल्याने शिरेमध्ये कोरडेपणा किंवा जखमा फुटतात. त्यामुळे नाकातून रक्तस्त्राव सुरू होतो. कोरडेपणामुळे रक्तस्त्राव होण्याची समस्या असू शकते. ही समस्या ३ ते १० वर्षे वयोगटातील मुलांमध्ये जास्त आढळते. पण वृद्ध लोकही या समस्येने त्रस्त होऊ शकतात. नाकातील ऍलर्जी, अंतर्गत शिरा किंवा रक्तवाहिन्या खराब होणे, शरीरात पोषक तत्वांची कमतरता, रक्तदाब, अति उष्णता, जास्त शिंका येणे, सर्दी किंवा नाक जोरात चोळणे यामुळेही ही समस्या उद्भवू शकते.नाकातून रक्त येण्यावर घरच्या घरी उपचार करता येणे शक्य आहे
नाकातून रक्त येण्याची अनेक कारणं आहेत. त्यातले काही कारणं म्हणजे कोरडेपणा, नाक टोचणे, पडल्यामुळे नाकाला दुखापत होणे, अँस्पिरिनसारख्या औषधांचा प्रमाणापेक्षा जास्त वापर, लहान मुलांनी नाकात पेन्सिल, पेन किंवा एखादी वस्तू घातल्याने दुखापत झाल्यास, जखमा, अँलर्जी, जंतूसंसर्ग, उच्च रक्तदाब, रक्तात होणार्या गुठळ्यांच्या तक्रारी ही नाकातून रक्त येण्याची काही कारणे आहेत. त्यामुळे जर भविष्यात कधी नाकातून रक्त आलं तर घाबरण्याचं कारण नाही.
हेही वाचा – Drinking Milk at night: दूध पिण्याची योग्य वेळ माहितेय? जाणून घ्या दूध पिण्याची योग्य वेळ
उन्हाळ्यात नाकातून रक्त आल्यास हे करा
- थंड पाणी डोक्यावर टाकल्यास नाकातून रक्त येणे बंद होतं.
- नाकातून रक्त येत असल्यास बर्फ कपड्यात लपेटून नाकाजवळ ठेवल्यास रक्त येणे बंद होतं.
- कांदा कापून त्याचा दर्प घेतल्यास नाकातून येणारं रक्त बंद होतं.
- बेलाच्या पानांचा रस पाण्यात मिसळून पिल्याने फायदा होतो.
- नाकातून रक्त येत असेल तर नाका ऐवजी तोंडाने श्वास घ्यावा.
शरीर हायड्रेटेड ठेवावे –
कडक उन्हामुळे शरीराला खूप त्रास होऊ शकतो. त्यामुळे उन्हाळ्यात शरीर जास्तीत जास्त हायड्रेट ठेवा. शक्य तितके पाणी प्या. उन्हाळ्यात शरीरातून जास्त घाम येत असल्याने पाण्याची कमतरता भासते. म्हणून पाण्याचे अधिक सेवन करावे.साधे पाणी पिण्याव्यतिरिक्त नारळ पाणी, फळांचे ज्यूस, सरबत वगैरे पिऊ शकता.
हेही वाचा – Earphones Side Effects: सतत हेडफोन वापरताय तर सावधान! कानावर होतात असे परिणाम
हे पदार्थ चुकूनही खाऊ नका –
उन्हाळ्यात गरम अर्थात उष्ण पदार्थ खाऊ नयेत. गरम पदार्थ खाल्ल्याने नाकातील रक्तवाहिन्यांवर दाब पडतो. त्यामुळे नाकातून रक्त येऊ लागते. त्यामुळे उन्हाळ्यात उष्ण प्रकृतीचे, गरम, तसेच मसालेदार पदार्थ शक्यतो टाळावेत. जेवल्यानंतर लगेच पाणीही पिऊ नये.