Symptoms of dehydration: भारतामध्ये खूप कडक उन्हाळा असतो. या तीन ते चार महिन्यांमध्ये वातावरण अधिक गरम असते. उष्णतेच्या प्रभावामुळे शरीरावर परिणाम होत असतो. उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता होत असते. मानवी शरीरामध्ये मुबलक प्रमाणात पाणी नसल्याने डिहायड्रेशनची गंभीर समस्या उद्भवते असे म्हटले जाते. पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरात अनेक बदल झाल्याचे पाहायला मिळते. प्रथम थकवा जाणवून काही वेळानंतर चक्कर येऊ लागते. काही वेळेस लोकांना डिहायड्रेशनचा त्रास होत असतो. पण त्यांना त्याबद्दलची माहिती नसते. शरीरातील काही बदलांवरुन आपल्या डिहायड्रेशन झाले आहे असा अंदाज लावता येतो. या गोष्टी ओळखून त्यांवर उपचार करता येतात.

ओठ कोरडे पडणे.

आपले ओठ जर सुकून कोरडे पडायला लागले, तर शरीरामध्ये पाण्याची कमतरता आहे असे म्हटले जाते. शरीरात मुबलक प्रमाणात पाणी नसल्याने काहीजणांचे ओठ काळे पडतात. तर काहींच्या ओठांचे पापुद्रे निघायला लागतात. पाणी नसल्यामुळे शरीराचे ठराविक भाग कोरडे पडायला लागतात.

Health Special Unsafe Environment and Mental Health Hldc
Health Special: असुरक्षित वातावरण आणि मानसिक स्वास्थ्य
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
India Meteorological Department has warned a rain alert for 15 districts of Maharashtra state
‘या’ १५ जिल्ह्यांना १५ नोव्हेंबरला सतर्कतेचा इशारा !
Loksatta Chatura How to identify children racket filling
मुलांचे ‘रॅकेट फिलिंग’ ओळखा
Shocking video Year Old Boy Slaps Mother Repeatedly After Finding Her Over Drug Use
पोटच्या मुलानं आईला भररस्त्यात बेदम मारलं; कारण ऐकून नेटकरी म्हणाले बरोबर केलं; VIDEO पाहून सांगा तुम्हाला काय वाटतं
youth dies due to hot milk pot fell Shocking video viral
दारूची नशा बेतली जीवावर! मद्यधुंद तरुणाचा उकळत्या दुधाच्या कढईवर गेला तोल अन्…; वेदनादायी VIDEO
Special campaign against Pneumonia by Zilla Parishad to prevent child death
बालमृत्यू टाळण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे न्यूमोनियाविरोधात विशेष मोहीम

यूरीनचा रंग पिवळा होणे.

शरीरात पाणी नसल्याने लघवीचा रंग बदलतो असे तज्ज्ञ सांगतात. याद्वारे शरीरामध्ये पाण्याची कमतरता झाली आहे आणि त्यावर उपाय करायला हवा असा संदेश मेंदूपर्यंत पोहोचवला जातो. यूरोक्रोम रंगद्रव्यामुळे (Urochrome pigment) पाण्याची कमतरता होत असते. या यूरोबिलिन (Urobilin) असेही म्हटले जाते. डिहायड्रेशनचा त्रास होऊ नये म्हणून सतत पाणी पिणे आवश्यक असते.

आणखी वाचा – उन्हाळ्यामध्ये डायबिटीजचा त्रास का वाढतो? उष्णतेपासून बचाव करण्यासाठी मधुमेहग्रस्तांनी फॉलो कराव्यात ‘या’ महत्त्वपूर्ण टिप्स

सतत मळमळणे.

मळमळायला लागल्यावर शरीरात अपुऱ्या प्रमाणात पाणी आहे असा अंदाज लावला जातो. डिहायड्रेशन होण्यापूर्वी मळमळ व्हायला लागते. विविध शारीरिक क्रिया पार पडण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. पाण्याच्या कमतरतेमुळे शरीराचा मेटाबॉलिक रेट बिघडतो. यामुळे सतत मळमळतं अशी तक्रार लोक करत असतात.

आणखी वाचा – उष्माघातापासून स्वत:ला वाचवण्यासाठी ‘या’ खास टिप्स; उन्हाळ्यात असा घ्या आहार

ही तीन लक्षणे वेळीच ओळखल्याने डिहायड्रेशनचा सामना करता येतो. उन्हाळ्यामध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये पाणी प्यायल्याने डिहायड्रेशनमुळे होणारा त्रास टाळता येतो. यामुळे शरीर नेहमी हायड्रेटेड राहते.