Health Benefit Of Eating Raw Mangoes: भारतामध्ये आंबा हे फळ फार लोकप्रिय आहे. आंब्याला फळांचा राजा असे म्हटले जाते. या फळाची किंमत देखील अन्य फळांच्या तुलनेमध्ये जास्त असते. आपल्या देशात हापूससह आंब्याच्या अनेक प्रजाती पाहायला मिळतात. आंबा जेव्हा कच्चा असतो, तेव्हा त्याला कैरी असे म्हटले जाते. आपल्याकडे कैरी देखील आवडीने खाल्ली जाते. तिचा वापर जेवणामध्ये, लोणचं तयार करताना केला जातो. आंबट-गोड कैरी खाण्याचा अनेकांना मोह आवरत नाही. कच्च्या कैरीपासून बनवलेले सरबत उन्हाळ्यात आवडीने प्यायले जाते. कैरी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते. उन्हाळ्यात कैरीचा समावेश आहारामध्ये असणे का आवश्यक असते याबद्दलची माहिती आम्ही देणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साखरेचे प्रमाण नियत्रंणात राहते.

अन्य फळांच्या तुलनेमध्ये कैरीमध्ये साखरेचे प्रमाण कमी असते. यामुळे मधुमेहग्रस्त रुग्ण कैरीचे सहज सेवन करु शकतात. तिच्या सेवनामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.

रोगप्रतिकारशक्ती वाढते.

शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढावी यासाठी आवश्यक असलेले पोषक घटक कैरीमध्ये असतात. यात व्हिटामिन सी मुबलक प्रमाणात असते. एका अभ्यासानुसार, कैरीमध्ये व्हिटामिन ए देखील असते अशी माहिती समोर आली होती.

आणखी वाचा – Summer Bloating: उन्हाळ्यात पोटदुखीचा त्रास वाढला आहे का? उपाय म्हणून आजच ट्रॉय करा ‘ही’ होममेड हेल्थ ड्रिंक्स

हृदय निरोगी राहते.

कैरीमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असे महत्त्वपूर्ण घटक असतात. यांमुळे रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडते आणि हृदय निरोगी राहते. कैरीच्या सेवनामुळे रक्तदाबाशी संबंधित समस्या दूर होतात. यामध्ये मॅंगिफेरीनदेखील असते. हा अँटीऑक्सिडेंट घटक हृदय हेल्दी राहावे यासाठी मदत करत असतो. कैरीमुळे रक्तातील कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराइड्स आणि फ्री फॅटी अ‍ॅसिडची पातळी नियंत्रणात राहते.

आणखी वाचा – उन्हाळ्यात प्रखर सूर्यकिरणांपासून बचाव कसा करावा? जाणून घ्या याबद्दल तज्ज्ञ काय सांगतात…

कर्करोगाचा त्रास कमी होतो.

कैरीमध्ये पॉलिफेनॉल हा घटक आढळला जातो. या घटकामुळे कर्करोगावर मात करताना मदत होते. कच्या आंब्यामध्ये अँटी-कॅन्सर गुणधर्म असतात. यामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसचे प्रमाण कमी होते. तज्ज्ञानुसार, पॉलिफेनॉल कर्करोगाच्या पेशी तयार होण्यामध्ये अडथळा निर्माण होतो.