Sinus Problem In Summer: उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. या कालावधीमध्ये वातावरणातील बदलांमुळे सर्दी-पडसं होण्याची शक्यता असते. अशात जर एखाद्याला सायनस असेल, तर त्या व्यक्तीला अधिक त्रास सहन करावा लागतो. उन्हाळ्यामध्ये उष्ण आणि कोरड्या हवेमुळे सायनसचा त्रास वाढत जातो. यामुळे सर्दी, डोकेदुखी आणि ताप असे आजार बळावतात. बऱ्याचजणांना उन्हाळ्यात सायनसचा त्रास सुरु होतो. यावर मात करण्यासाठी डॉक्टरांची मदत घेणे आवश्यक असते. गरम वातावरणामध्ये काही घरगुती उपाय केल्यानेही सायनसचा त्रास कमी होऊ शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्याकडे तीन ते चार महिन्यांच्या कालावधीमध्ये कडक उन्हाळा असतो. सकाळी १० ते दुपारी ३ यांमध्ये सूर्य आग ओकतोय की काय इतक्या प्रमाणात उन्हाचा तडाखा बसत असतो. अशा वेळी एसी किंवा पंख्याचा वापर करून थंडावा मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. थंड वातावरणात बसून पुन्हा उन्हामध्ये गेल्याने सर्दी होण्याची शक्यता बळावते. याशिवाय थंड पदार्थ खाल्यानेही अशी स्थिती उद्भवते. अशा वेळी सर्दीसह सायनसचा त्रास व्हायला सुरुवात होते.

उन्हाळ्यात Sinus चा त्रास होऊ नये म्हणून काय करावे?

१. गरम पाण्याची वाफ घ्यावी.

नाकामध्ये संसर्ग झाल्याने सायनस होत असतो. गरम पाण्याची वाफ नियमितपणे घेतल्याने हा त्रास नाहीसा होऊ शकतो. वाफेमुळे श्वासनलिका स्वच्छ होते. त्याशिवाय संक्रमणासाठी कारणीभूत असलेले विषाणू देखील नष्ट होतात. उन्हाळ्यात कोरड्या हवेमुळे ही नलिका कोरडी होऊ शकते. वाफ घेतल्याने श्वासनलिकेमध्ये ओलावा टिकून राहतो. हा उपाय दिवसातून दोन वेळा केल्याने सायनसवर काही प्रमाणात आराम मिळू शकतो.

आणखी वाचा – उन्हाळ्यात डिहायड्रेशनची समस्या ठरु शकते धोकादायक; ‘ही’ ३ लक्षणे दिसल्यास लगेच करावेत उपचार

२. गरमागरम सूप प्यावे.

सायनस झालेल्या व्यक्तीची श्वासनलिका घट्ट होते. उन्हाळ्यात हा त्रास वाढत जातो. यावर उपाय म्हणून गरमागरम सूप पिण्याचा सल्ला दिला जातो. दिवसातून दोन वेळा सूप प्यायल्याने श्वासनलिकेला आलेली सूज कमी होते. यामुळे संक्रमणाचे प्रमाण देखील कमी होते. या पदार्थामध्ये विविध मसाल्यांचा समावेश करावा. यामुळे शरीराला फायदा होतो. सूपप्रमाणे हर्बल टी (Herbal Tea) चे सेवन केल्याने सायसनचे प्रमाण कमीकमी होत जाते.

(सायनससाठी हे घरगुती उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरु शकते.)

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Summer special home remedies for sinus problem in summer know more yps
Show comments