उन्हाळ्याचा हंगाम आता सुरू झाला आहे. उन्हाळ्यात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे अतिशय आवश्यक असते. शरीरामध्ये पाण्याची कमी झाल्यानंतर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आपण उन्हाळ्यात चांगल्या आहारावर जास्त भर दिला पाहिजे. विशेष करून उन्हाळ्यात आपले शरीर हायड्रेट ठेवले पाहिजे. उन्हाळ्यात सर्वाधि त्रास डिहायड्रेशनचा होऊ शकतो, म्हणजेच निर्जलीकरण शरीरातील पाण्याची पातळी कमी होणं. शरीरात योग्य प्रमाणात पाणी नसल्यास त्याचा परिणाम रक्ताभिसरण, पेशींच्या कार्यावर होतो. केवळ तहान लागेल तेव्हाच पाणी पिण्याच्या सवयीमुळे पेशींमध्ये पाण्याची कमतरता होते आणि त्याचा मेंदू, हृदय, यकृत, मूत्रपिंड, पोट याच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीर डिहायड्रेट ठेवले पाहिजे, आज आम्ही तुम्हाला अशा फळाबद्दल सांगणार आहोत, जे उष्माघातावर औषधापेक्षा कमी नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अशी अनेक फळे उन्हाळ्यात उपलब्ध असतात, जी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. असेच एक फळ म्हणजे बेल. शरीराला थंड ठेवण्यासोबतच पोटाशी संबंधित समस्या दूर करते. चला तर मग जाणून घेऊया या कठीण दिसणाऱ्या फळाच्या मऊ पिवळ्या रंगाच्या गरामध्ये दडलेले आरोग्य रहस्य. डायटीशियन डॉ. सुषमा यांच्या मते, बेल फळामध्ये अनेक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म असतात. फायबर समृद्ध असलेल्या बेलमध्ये पाणी, फॅट्स, प्रोटीन, ऊर्जा, कार्बोहायड्रेट्स, लोह, फॉस्फरस, कॅल्शियम, पोटॅशियम, जीवनसत्त्वे ए, बी, सी, रिबोफ्लेविन हेदेखील असतात.

बेल फळाचे फायदे

बेल उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवते, त्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते, उष्माघातापासून बचाव होतो. वेळेवर उपचार न केल्यास उष्माघात धोकादायक ठरू शकतो. तुम्ही बेलचा गर खाऊ शकता किंवा ज्यूसही बनवू शकता. या दोन्ही प्रकारे सेवन केल्याने उष्माघातापासून बचाव, तसेच डिहायड्रेशनची समस्या टाळू शकता. अर्धा पिकलेला किंवा पूर्ण पिकलेला बेलचा गर खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते. बेल फळ पोटाला शक्ती देते आणि त्याची कार्ये करण्याची क्षमता वाढवते.

मेंदूसाठी शक्तिवर्धक

तसेच पोटात अल्सरचा त्रास होत असताना बेल खाणे फायदेशीर ठरते. अनेक संशोधनातून असे दिसून आले आहे की, बेल फळ खाल्ल्याने पोटाच्या श्लेष्मल त्वचेवर एक थर तयार होतो, ज्यामुळे व्रण लवकर बरा होण्यास मदत होते. बेलमध्ये अनेक पोषक घटक असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. याचा प्रभाव थंड असतो. इंग्रजीत याला वुड ॲपल म्हणतात. हे हृदय आणि मेंदूसाठी शक्तिवर्धक म्हणून काम करते. या फळाचे सेवन बद्धकोष्ठता, जुलाब आणि पोटाच्या इतर समस्या दूर करण्यासाठी वर्षानुवर्षे केले जाते.

पाहा पोस्ट

हेही वाचा – Summer tips: उन्हाळ्यात दिवसातून कितीवेळा अंडी खावी? जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात

मधुमेहाच्या रुग्णांसाठीही बेल हे उत्तम फळ आहे. उन्हाळ्यात साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही याचे सेवन करू शकता. बेलमध्ये रेचक असते, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते, जे मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करते.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Summer tips health benefits of bael juice against heatstroke srk