उन्हाळा सुरु झाला आहे. एप्रिल महिन्यात तापमानाचा पारा विक्रमी उच्चांकावर पोहोचला आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानामुळे शरीराची लाही लाही होत आहे. अशा हवामानात आपल्या आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. या ऋतूमध्ये पोटाच्या समस्या जास्त होतात. उन्हाळ्यात तोलून मापून अन्न खावं लागतं. अशातच उन्हाळ्यात अंडी खावी का असा प्रश्न पडतो. त्यात अंडी खाणे बहुतेक लोकांचा हा आवडता नाश्ता असतो. आरोग्य तज्ज्ञ न्याहारीमध्ये अंडी खाण्याचा सल्ला देतात.तसेच फिटनेस फ्रेकदेखील प्रोटिन्स मिळविण्यासाठी अंड्यांचा आहारात समावेश करतात. एकूणच अंडी खाण्याचे अनेक फायदे आहेत. हे स्नायूंच्या विकासापासून शरीराला रोगांपासून वाचवण्यासाठी उपयुक्त ठरते. पण आता प्रश्न असा आहे की दिवसात किती अंडी खावीत, रोज अंडी खाणे सुरक्षित आहे का? तुमच्याया या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आम्ही सांगणार आहोत.
एका दिवसात किती अंडी खाणे योग्य आहे?
तज्ञांच्या मते, निरोगी व्यक्तीने दररोज दोन ते तीन अंडी खाणे आवश्यक आहे. निरोगी लोक आठवड्यातून ७ ते १० अंडी खाऊ शकतात. जे खेळाडू आहेत किंवा जे जीम, वर्कआउट करतात, त्यांना जास्त प्रोटीनची गरज असते त्यामुळे ते दिवसातून चार ते पाच अंडी खाऊ शकतात. जे लोक रोज अंडी खातात त्यांनी अंड्याचा पांढरा भागच खावा. याशिवाय जर कोणाला हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी दिवसात दोनपेक्षा जास्त अंडी खाऊ नयेत.ज्यांना कोलेस्ट्रॉलची समस्या आहे त्यांनी अंड्याचे सेवन कमी करावे किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
अंड्यातील पिवळा भाग खाल्ल्याने पडाल आजारी
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अंडी पूर्णपणे शिजवली पाहिजेत. कारण, कमी शिजवलेल्या अंड्यामुळे संसर्ग होऊ शकतो. अंड्याच्या बाहेरील आणि पिवळ्या भागात साल्मोनेला बॅक्टेरिया असू शकतात. जे तुम्हाला आजारी बनवू शकते. हाय ब्लड प्रेशर असणाऱ्या रुग्णांनी अंडी खाणे टाळले पाहिजे. पण तरीही जर तुम्ही त्यातील पिवळा भाग काढून खाल्लात तर त्यातून नुकसान होण्याची शक्यता कमी असते. कारण पिवळ्या भागात फॅट असते, ज्यामुळे हाय बीपी असलेल्या व्यक्तीला त्रास होतो. ज्या लोकांना मधुमेहाची समस्या आहे, त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच आहारात अंड्यांचा समावेश करावा. अंडी जास्त प्रमाणात खाल्ल्यास शरीरातील उष्णता वाढू शकते आणि त्यामुळे तुमचे पोटही खराब होऊ शकते.
अंडी खाण्याचे फायदे
अंडी खाल्ल्याने दृष्टी चांगली राहते.
वजन नियंत्रित ठेवण्यासाठी अंड्याचा पांढरा भाग खावा.
अंडी खाल्ल्याने शरीराला पुरेसे प्रथिने मिळतात.
अंडी खाल्ल्याने पोट भरलेले राहते, त्यामुळे अस्वास्थ्यकर अन्न टाळले जाते.
हेही वाचा – Mango season! आंबा खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात
कोणताही उपाय वापरण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.