Does your sunscreen irritate your eyes: उन्हाळा असो वा हिवाळा सनस्क्रीन वापरणं खूप महत्त्वाचं आहे. सनस्क्रीन आपल्या स्कीनकेअर रूटीनचा एक महत्त्वाचा भाग असतो. तुम्हाला ग्लास फिनिश स्कीन हवी असेल किंवा त्वचेवरील तेल नियंत्रित करणारी मॅट फिनिश स्किन हवी असेल, तर सनस्क्रीनमध्ये प्रत्येकासाठी वेगवेगळे फॉर्म्युलेशन्स उपलब्ध आहेत. पण काही वेळा जेव्हा आपण सनस्क्रीन लावतो, तेव्हा डोळ्यांची जळजळ होऊ लागते आणि बाहेर जाताना जेव्हा आपण तयार होत असतो तेव्हा डोळ्यातून पाणी आलेलं कोणालाच आवडत नाही. सनस्क्रीन लावल्याने आपल्या डोळ्यांची जळजळ का होते आणि यातले कोणते घटक टाळावेत? यावर अधिक माहिती मिळवण्यासाठी Indianexpress.com ने त्वचारोगतज्ज्ञांशी संवाद साधला.

मायरा डर्मा मेड येशील त्वचारोगतज्ज्ञ, डॉ. रिक्ता मोहन यांनी सांगितले की, सनस्क्रीन लावल्यानंतर डोळ्यात जळजळ होण्याचे कारण म्हणजे त्यातले काही घटक कोणाकोणाला सूट करत नाहीत किंवा काही घटक डोळ्यांच्या आजूबाजूला व्यवस्थितरित्या सेटल होत नाहीत.

How to clean pressure cooker stains burnt stains removal at home using colgate kitchen jugaad
कुकरमध्ये कोलगेट टाकताच कमाल झाली! परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही, पाहा VIDEO
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
La Nina, The rainy season, climate patterns, global phenomenon
विश्लेषण : ‘ला निना’चा पावसाळी मुहूर्त चुकला! आता कडाक्याच्या थंडीबरोबर गारपिटीचीही शक्यता?
curd in any food be dangerous
कोणत्याही पदार्थांमध्ये दह्याचा सतत वापर करणं ठरू शकतं घातक? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…
Viral video of groom ukhana at wedding navardevacha ukhana viral on social media
“मुलगी काळी…”, नवरदेवाने घेतला जगात भारी उखाणा, VIDEO पाहून कराल कौतुक
Success story of nadia chauhan managing director of parle agro brand owner of appy fizz bailey water company
बिसलेरीसारख्या कंपन्यांना फुटला घाम! ‘या’ महिलेने वयाच्या १७ व्या वर्षी सांभाळली व्यवसायाची धुरा, कष्टाने कंपनीची उलाढाल ८००० कोटींवर पोहोचवली
Period related lower back pain
Lower Back Pain : मासिक पाळीदरम्यान पाठदुखी कमी होण्यास किंवा टाळण्यास मदत करतील ‘हे’ सात उपाय? वाचा, डॉक्टरांचा सल्ला
Health Special What exactly is insulin
Health Special : इन्सुलिनच्या जगात

हेही वाचा… दररोज चालायला तर जाताय; पण कॅलरीज बर्न होत नाहीयेत! मग फॉलो करा तज्ज्ञांच्या ‘या’ ९ टिप्स…

“केमिकल फिल्टर्स, जसे की अवोबेंझोन (avobenzone), ऑक्सिबेंझोन (oxybenzone), आणि ऑक्टिनोक्सेट (octinoxate) हे डोळ्यांना त्रास देऊ शकतात. हे UV किरणांपासून त्वचेचे रक्षण करत असताना जर हे डोळ्यात गेले, तर डोळ्यात जळजळ होऊ शकते.” त्यांनी हे देखील म्हटले की, सनस्क्रीनमध्ये सुगंध असल्यास ती संवेदनशील त्वचा आणि डोळ्यांसाठी योग्य नसेल आणि त्यामुळे जळजळ होऊ शकते.

हेही वाचा… तुमच्या पाळीव श्वानांना ‘ही’ फळे खायला देताय? मग वेळीच थांबा! आरोग्यासाठी ठरतील धोकादायक, तज्ज्ञ म्हणतात…

डॉ. मोहन यांच्या मते कोणती सनस्क्रीन तुमच्यासाठी योग्य आहे हे शोधणे महत्त्वाचे आहे. “काही लोकांच्या त्वचेला या घटकांपासून किंवा विशिष्ट फॉर्म्युलेशनपासून जास्त संवेदनशीलता असू शकते. कधी कधी त्या घटकांमुळे ॲलर्जी होऊ शकते. जर जळजळ पुन्हा पुन्हा होत असेल, तर लगेच त्या प्रोडक्टचा वापर थांबवा,” असे त्यांनी सांगितले.

जेव्हा डोळ्यात जळजळ होऊ लागते, तेव्हा ती थांबवण्याचा सर्वात सुरक्षित मार्ग कोणता?

घामामुळे किंवा चेहऱ्यावर हात फिरवताना सनस्क्रीन डोळ्यात जाऊ शकते. अशा परिस्थितीत जर डोळ्यात जळजळ होत असेल, तर लगेच सनस्क्रीन लावणे थांबवा. “तुमचे डोळे स्वच्छ पाण्याने नीट धुवा. डोळ्यांना आराम देण्यासाठी थंड, ओले कापड लावा आणि सुनिश्चित करा की तिथे खाज, जळजळ किंवा लालसरपणा नसेल,” असे डॉ. मोहन म्हणाल्या.

सतर्कता घेण्यासाठी डॉ. मोहन यांनी सांगितले की, तुम्ही तुमच्यासाठी योग्य असलेली सनस्क्रीन वापरत आहात याची खात्री करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे एका त्वचारोगतज्ज्ञाशी (dermatologist) सल्लामसलत करणे. “तज्ज्ञ तुमच्या त्वचेचा प्रकार आणि संवेदनशीलतेनुसार योग्य प्रोडक्ट्स सुचवू शकतात आणि जळजळ किंवा संवेदनशीलतेची समस्या होणार नाही याची खात्री करू शकतात,” असे डॉ. मोहन म्हणाल्या.

Story img Loader