निरोगी जीवनशैलीसाठी संतुलित दिनचर्येने तुमचा दिवस सुरू करणे आवश्यक आहे आणि पौष्टिक नाश्त्याशिवाय कोणतीही दिनचर्या पूर्ण होत नाही. काहींना आंबट-तिखट चवदार नाश्ता खाऊन दिवसाची सुरुवात करायला आवडते, तर काही जण त्यांच्या सकाळची सुरुवात गोड पदार्थ खाल्ल्याशिवाय करू शकत नाहीत. पण, सकाळी सकाळी साखरयुक्त नाश्ता खाल्ल्याने तुमच्या तात्काळ ऊर्जेवर परिणाम होऊ शकतो. त्याचा तुमच्या एकूण आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

सल्लागार आहारतज्ज्ञ आणि मधुमेह शिक्षक कनिक्का मल्होत्रा यांनी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना, गोड नाश्ता तुमच्या ऊर्जेच्या पातळीवर कसा प्रभाव टाकू शकतो हे स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, “शर्करायुक्त पर्याय सुरुवातीच्या ऊर्जेला चालना देतात, परंतु हे सहसा त्यानंतर रक्तातील साखरेची पातळी वेगाने कमी ???होते???(की कमी करतात), ज्यामुळे तुम्हाला थकवा जाणवतो आणि अधिक गोड खाण्याची इच्छा निर्माण होते. म्हणूनच कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स समृद्ध न्याहारीची शिफारस केली जाते. हे पोषक घटक रक्तातील साखरेचे प्रमाण स्थिर ठेवण्यास, ऊर्जेतील चढउतार कमी करण्यास आणि सकाळपासून तुम्हाला सतर्क आणि केंद्रित ठेवण्यास मदत करतात.”

MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Common lifting mistakes and how to avoid them
Lifting Heavy Objects Tips : जड वस्तू उचलताना तुम्हीसुद्धा श्वास रोखून ठेवता का? मग थांबा! डॉक्टरांचा हा सल्ला वाचा
fruits pack the most nutritional punch
Nutrient Rich Fruits : कोणती फळं सर्वात जास्त पोषण देतात तुम्हाला माहिती आहे का? मग आहारतज्ज्ञांनी दिलेली ‘ही’ यादी वाचा
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
When Aishwarya Rai Bachchan shared her tips for glowing skin
वयाच्या पन्नाशीतही तजेलदार त्वचा असणाऱ्या ऐश्वर्या रायने सांगितले सौंदर्याचे रहस्य? तज्ज्ञांचे मत जाणून घ्या…
AI lawyer responds to CJI Chandrachud's question
CJI DY Chandrachud to AI Lawyer: “भारतात फाशीची शिक्षा…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा AI वकिलाला प्रश्न; उत्तराने झाले सर्वच अवाक

सकाळी गोड नाश्ता घेतल्याने दीर्घकालीन परिणाम होतात का?

मल्होत्रा यांच्या म्हणण्यानुसार, “साखरयुक्त पदार्थांचे नियमित सेवन केल्याने अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात, यासह:

वजन वाढणे : जास्त साखरेचे सेवन लठ्ठपणाला कारणीभूत ठरते.
टाइप ३ मधुमेह : रक्तातील साखरेचे प्रमाण सातत्याने वाढल्याने मधुमेह होण्याचा धोका वाढू शकतो.
हृदयरोग : साखरेचे सेवन उच्च रक्तदाब आणि अस्वास्थ्यकर कोलेस्ट्रॉलच्या पातळीत योगदान देऊ शकते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
दातांच्या समस्या : साखरयुक्त पदार्थ हे दात किडण्याचे प्रमुख कारण आहेत.

नाश्त्यामध्ये उच्च पौष्टिक मूल्य असलेले गोड पदार्थ खावे का? (What about sweet foods that have high nutritional value?)

उच्च पौष्टिक मूल्य असलेले गोड पदार्थ केवळ साखरयुक्त मिठाईपेक्षा उत्तम पर्याय आहेत. जर गोड नाश्त्यामध्ये प्रथिने, फायबर आणि निरोगी फॅट्ससारखे आवश्यक पोषक घटक असतील तर तो संतुलित आहाराचा भाग असू शकतो. “उदाहरणार्थ, फळे, दही आणि बदामाने बनवलेली घरगुती स्मूदी असे पदार्थ गोडपणा आणि मौल्यवान पोषक दोन्ही देते,” असे मल्होत्रा यांनी स्पष्ट केले.

शेवटी कोणत्याही नाश्त्यासाठी आरोग्यदायी पर्याय निवडणे महत्त्वाचे आहे. शर्करायुक्त तृणधान्ये (sugary cereals) आणि पेस्ट्री रक्तातील साखर वाढवू शकतात आणि पोषक तत्वांचा ऱ्हास करतात, तर संपूर्ण धान्य, फळे आणि प्रथिने यांचा समावेश असलेला गोड नाश्ता हे आरोग्यदायी पर्याय आहेत. फायबर आणि प्रथिनांसह गोड पदार्थांचे मिश्रणदेखील शाश्वत ऊर्जा प्रदान करू शकते.

आरोग्यदायी गोड पदार्थांचा नाश्ता करताना किती प्रमाणात खात आहोत आणि एकूण साखरेचे सेवन याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. आरोग्यदायी पर्याय फायदेशीर असले तरी जास्त प्रमाणात सेवन केल्याने वजन वाढू शकते आणि आरोग्याच्या इतर समस्या निर्माण होतात. लक्षात ठेवा, संयम महत्त्वाचा आहे आणि एकंदर आरोग्यासाठी योग्य आहार आवश्यक आहे.

Story img Loader