Sweet potato with skin: तुम्ही रताळे खाण्यापूर्वी ते सोलता का? रताळ्याची साल म्हणजे निसर्गाचं स्वतःचं संरक्षण कवच. ते केवळ रताळ्याच्या आतल्या भागाला ओलसर आणि ताजे ठेवत नाही तर त्यात आवश्यक पोषक तत्वेदेखील असतात, जी अनेकदा सोलल्यावर वाया जातात. Indianexpress.com ने रताळ्याच्या सालीचे सेवन करण्याचे पौष्टिक फायदे समजून घेण्यासाठी होलिस्टिक हेल्थ आणि वेलनेस कोच ईशा लाल यांच्याशी संपर्क साधला.

आरोग्य फायदे

प्रीबायोटिक्स आणि फायबर-समृद्ध : रताळ्याच्या सालीमध्ये खूप फायबर्स असतात, जे आपल्या आतड्यांतील बॅक्टेरियांना पोषण देतात, पचन सुधारतात आणि जास्त काळ आपले पोट भरलेले ठेवतात. सोललेल्या रताळ्याच्या तुलनेत मध्यम आकाराच्या रताळ्यामध्ये जवळजवळ दुप्पट फायबर असते.

अँटिऑक्सिडंट : रताळ्याच्या सालीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जसे की फिनोलिक कंपाउंड्स आणि फ्लेवोनॉइड्स, जे फ्री रॅडिकल्सशी लढायला मदत करतात. यामुळे दाहकता कमी होते आणि एकूणच आरोग्याला मदत होते.

व्हिटॅमिन बूस्ट : रताळ्याच्या सालीत आतल्या भागापेक्षा अधिक व्हिटॅमिन C आणि E असतात, जे त्वचा आरोग्य आणि रोगप्रतिकारक वाढवण्यास मदत करतात.

खनिज शक्ती : रताळ्याच्या सालीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि मॅंगनीजसारखी आवश्यक खनिजे असतात, जी हृदयाच्या आरोग्यासाठी आणि स्नायूंच्या कार्यासाठी महत्त्वाची असतात.

तुमच्या आहारात रताळ्याच्या सालीचा समावेश कसा करावा?

जर साल खाणे तुम्हाला आवडत नसेल, तर तुमच्या जेवणात ते समाविष्ट करण्याचे काही मार्ग येथे आहेत.

१. भाजलेले रताळ्याचे वेजेस : संपूर्ण रताळ्याच्या वॅजेस ऑलिव्ह ऑइल, पेपरिका आणि रोझमेरीमध्ये मिसळा.. त्यांना कुरकुरीत होईपर्यंत भाजा आणि तुम्हाला तुम्ही सालं खाताय याची जाणीवही होणार नाही – ते एक सुंदर कुरकुरीतपणाचा अनुभव देतात!

२. सूपमध्ये भर घालणे : सुपासाठी रताळ्याचे सालासह लहान चौकोनी तुकडे करा. साले टेक्चर वाढवतात आणि पोषक तत्वे वाढवतात.

३. रताळे नट बटर : एक क्रीमी बटर बनवण्यासाठी रताळे त्यांच्या सालासह वाफवून त्यात आल्मंड बटर, दालचिनी आणि खजूर घाला. तुमचं स्वीट नट बटर तयार आहे.

४. स्किन चिप्स : रताळे बारीक कापून त्यावर ऑलिव्ह तेल आणि मसाले घालून भाजा किंवा बेक करा, जेणेकरून हेल्दी चिप्स तयार होतील.

साल ठेवून खाल्ल्याने, ईशा लाल यांनी म्हटले की तुम्ही फक्त तुमचं आरोग्य सुधारत नाही, तर पर्यावरणाचंही रक्षण करत आहात. “साल काढल्यामुळे अन्नाचा अपव्यय होतो—अभ्यासानुसार रताळ्याची पोषणमूल्ये २० टक्के सालासोबत वाया जातात. रताळ्याचं साल फक्त खाण्यायोग्यच नाही, तर ते मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन C ने भरपूर असलेलं एक सुपर्ब हिवाळ्यातील सुपरफूड आहे. ते आपल्या आहारात समाविष्ट केल्याने तुमचं पचन, रोगप्रतिकारक शक्ती आणि एकूणच आरोग्य सुधारू शकतं,” असं त्यांनी सांगितलं.

Story img Loader