Swollen Veins In Legs: अनेकदा खूप वेळ उभं राहिल्याने किंवा बसल्याने पायाला मुंग्या येतात, पोटऱ्या सुजल्यासारख्या वाटू लागतात. पायात प्रचंड वेदना आणि जळजळ सुद्धा जाणवू शकते. क्वचित असे झाल्यास काळजी करण्याची गरज नाही पण हा त्रास वारंवार होत असल्यास हे व्हेरिकोज व्हेन्सचे खराब झाल्याचे लक्षण असू शकते. हा एक असा आजार आहे ज्यात पायाच्या नसा फुगीर व निळ्या- हिरव्या व करडया रंगाच्या दिसू लागतात. आज आपण व्हेरिकोज व्हेन्सचे लक्षण व उपाय जाणून घेणार आहोत.
भारतीय योग गुरु, लेखक, संशोधक डॉ. हंसा योगेंद्र यांच्या माहितीनुसार जर तुमच्या पायाच्या नसा बरेच दिवस निळ्या रंगाच्या दिसत असतील व तुम्हाला उठता बसता पायात कळ येत असेल तर सावध व्हा.
व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे काय? (What Is Varicose Veins)
आपल्या पायांच्या नसांमध्ये सुद्धा व्हॉल्व असतात ज्यांचे काम रक्तप्रवाह सुरळीत ठेवणे असते. जेव्हा काही कारणांनी व्हॉल्व कमकुवत होतात तेव्हा त्यांची कार्यक्षमता कमी होऊ लागते. व्हॉल्वमध्ये अडथळे तयार झाल्याने रक्त जमा होऊ लागते व साचल्याने रक्त खराब होऊ शकते. या रक्ताचा रंग काळसर होऊन नसांना सूज येते व या नसांचा रंग हिरवट-निळा दिसू लागतो. जर वेळीच उपचार केले नाही तर व्हेरिकोज व्हेन्स काही दिवसांनी खराब होतात, व त्यांची कार्यक्षमताही संपते.
व्हेरिकोज व्हेन्स खराब झाल्याची लक्षणे (Symptoms Of Varicose Veins)
हा त्रास सहसा मेनोपॉज किंवा गर्भधारणेदरम्यान महिलांना जाणवू शकतो त्यामुळे या दोन्ही टप्प्यांमध्ये काळजी घ्यायला हवी. एका अभ्यासात समोर आलेल्या माहितीनुसार जगभरात २५ % महिला व १०% पुरुष हे व्हेरिकोज व्हेन्सच्या त्रासाने पीडित आहेत. व्हेरिकोसिटीची लक्षणे आढळून आल्यास वैद्यकीय सल्ला घेणे फायद्याचे ठरेल. त्यासाठी व्हेरिकोज व्हेन्स खराब झाल्याची लक्षणे जाणून घेऊयात..
- पायदुखी
- पोटऱ्यांना सूज
- पायाच्या तळव्यांना जळजळ
- पायाला मुंग्या येणे
- पाय जड होणे
हे ही वाचा<< किडनीतुन युरिक ऍसिड बाहेर फेकतील धण्याचे दाणे? ‘ही’ लक्षणे दिसण्याआधी ‘या’ पद्धतीने करा सेवन
व्हेरिकोज व्हेन्सवर उपचार (How to prevent varicose veins)
- एकाच स्थितीत बसून किंवा उभे राहिल्याने व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास वाढू शकतो त्यामुळे दर काही वेळाने चालून पायाची हालचाल करा.
- जर तुम्ही नोकरी करत असाल आणि आपल्याला सतत चालणे शक्य नसेल तर निदान पायाला पाठिंबा देऊ शकेल असे कपडे घालायला हवेत. घट्ट व मऊ स्टोकिंग्स घातल्याने आपल्याला पायदुखीमध्येही आराम मिळू शकतो.
- शीर्षासन, मेरुदांडासन, पदौत्तानासन, सर्वांगासन, नौकासन अशी आसने करणे फायदेशीर आहे. यामुळे पायात रक्त साचून राहिले असल्यास ते वाहते होण्यास मदत होते.