Taking Shower Of Sun Exposure Is Good Or Not : सध्या सोशल मीडियावर रेसिपीपासून ते अगदी डाएट प्लॅनपर्यंत अनेक संकल्पना इतरांबरोबर शेअर करण्याचा जणू काही ट्रेंडच सुरू आहे. पण, इंटरनेटवर तुम्हाला आढळणारे आरोग्यविषयक दावे लक्षात घेऊन, त्यांचा तुमच्या दैनंदिन दिनचर्येत समावेश करण्यापूर्वी तज्ज्ञांकडून त्या दाव्यांची पडताळणी करून घेणे आवश्यक असते. अलीकडेच आम्हाला असाच एक इन्फ्ल्यूएन्सरने केलेला दावा आढळला. त्यात एक आरोग्यविषयक गोष्ट सांगण्यात आली आहे. त्यात असा दावा केला गेलाय की, दिवसाची वेळ, सूर्यप्रकाशाचा कोन व तुम्ही अंघोळ करण्याची वेळ या बाबी तुमच्या शरीरात किती ड जीवनसत्त्व शोषले जाते यावर परिणाम करू शकतात.

तर इन्फ्ल्यूएन्सर सांगण्यानुसार…

  • एखाद्याला १०-३० मिनिटे सूर्यप्रकाश मिळायला हवा.
  • मांड्या आणि पोटाला सूर्यकिरण मिळायला हवेत. त्यामुळे हात आणि पाय दुखणार नाहीत.
  • ड जीवनसत्त्वयुक्त पदार्थ खा (सॅल्मन, अंड्याचा पिवळा भाग, फोर्टिफाइड डेअरी (fortified dairy) व मशरूम)
    गरज पडल्यास सप्लिमेंट घ्या. विशेषतः जर तुम्ही स्तनपान करीत असाल तर…
  • सूर्यप्रकाशानंतर लगेच अंघोळ करू नका. एक तास वाट पाहा. (कारण- तुमच्या त्वचेला सूर्यप्रकाश शोषण्यासाठी वेळ लागतो.)
  • तर पुरेसे ड जीवनसत्त्व मिळविण्यासाठी दररोज सूर्यप्रकाशात राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पण, असा एक सामान्य समज आहे की, सूर्यप्रकाशानंतर लगेच आंघोळ करणे ही चांगली कल्पना नाही.

तर याबद्दल जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने, मुंबईच्या परळ येथील ग्लेनिगल्स हॉस्पिटलच्या औषधांच्या अंतर्गत वरिष्ठ सल्लागार डॉक्टर मंजुषा अग्रवाल यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी हा दावा फेटाळून लावला. त्या म्हणाल्या की, तुम्ही लगेच अंघोळ केली किंवा एक तासानंतर सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यानंतर तुमच्या शरीरात तयार होणाऱ्या ड जीवनसत्त्वाच्या प्रमाणात बदल होणार नाही. कारण- ती प्रक्रिया आतून होते.

सूर्यप्रकाश अंगावर घेतल्यानंतर अंघोळ केल्याने ड जीवनसत्त्व शरीरातून वाहून किंवा निघून जाऊ शकते, अशी अनेकांना काळजी वाटते; पण यासंबंधी केला जाणारा दावा खरा नाही. कारण- त्वचेच्या पेशींमधील कोलेस्ट्रॉलशी जेव्हा यूव्हीबी किरणांचा संपर्क येतो तेव्हा ड जीवनसत्त्व त्वचेत संश्लेषित होते. ही प्रक्रिया शरीराच्या बाहेरच्या नाही, तर आतील भागात होते. तसेच काहींना असे वाटेल की, त्वचा धुण्याने ड जीवनसत्त्व शोषण्यापूर्वीच निघून जाऊ शकते. पण, अभ्यासांद्वारे पुष्टी केली गेलीय की, एकदा ड जीवनसत्त्व त्वचेच्या खोल थरांमध्ये तयार झाले की, ते फक्त पाण्याने किंवा साबणाने धुतले जात नाही, असे डॉक्टर मंजुषा अग्रवाल यांनी सांगितले आहे.

म्हणून स्नानानंतर सूर्यप्रकाश आंघोळ करणे चांगले आहे. शरीर नैसर्गिकरीत्या ड जीवनसत्त्वाची निर्मिती नियंत्रित करते आणि अंघोळीनंतर त्यावर परिणाम होत नाही. त्याऐवजी संपूर्ण आरोग्यासाठी सुरक्षित सूर्यप्रकाश आणि त्वचेच्या हायड्रेशनवर लक्ष केंद्रित करणे खूप महत्त्वाचे आहे, असे डॉक्टर मंजुषा अग्रवाल यांनी सांगितले आहे.

म्हणून सोशल मीडियावरील कोणत्याही व्हायरल पोस्ट किंवा ट्रेंडवर विश्वास ठेवणे थांबवा. कारण- ऑनलाइन खूप चुकीची माहिती पसरवली जात आहे. ही बाब लक्षात घेता, तज्ज्ञांच्या मदतीने सर्व गैरसमज दूर करून घेणे चांगले ठरेल, असे डॉक्टर मंजुषा अग्रवाल यांनी सांगितले आहे.