Ice Bath: काही वर्षांपासून ‘आइस बाथ’ अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. एकेकाळी खास खेळाडूंसाठी राखीव असलेल्या या आइस बाथला आता जगभरातील फिटनेस प्रिय आणि व्यायाम करणारे लोक स्वीकारत आहेत. ‘आइस बाथ’ (ज्याला ‘कोल्ड वॉटर इमर्सन’, असेही म्हणतात). त्यामध्ये तुमचे शरीर ठरावीक वेळेसाठी बर्फाच्या पाण्यात बुडवावे लागते.

बर्फाच्या पाण्याचे तापमान सामान्यतः १०-१५°C पर्यंत असते. हल्ली सोशल मीडियावरही अनेक कलाकार, खेळाडू बर्फाच्या पाण्यात ‘आइस बाथ’ घेतानाचे व्हिडीओ शेअर करीत असतात. व्यायामानंतर बरे होण्यापासून ते मानसिक आरोग्यापर्यंत सर्व गोष्टींमध्ये ही थेरपी मदत करते; पण हा ‘आइस बाथ’ खरोखरच उपयुक्त ठरतो का?

लोक ‘आइस बाथ’ वापरण्याचे एक मुख्य कारण म्हणजे स्नायूंच्या वेदना कमी करणे आणि व्यायामानंतर शरीरप्रकृती सुधारणे. धावपटू, वेटलिफ्टर्स व फुटबॉल खेळाडूंसह खेळाडू सामान्यतः आईस बाथ वापरतात. आणि असे बरेच पुरावे आहेत की, व्यायामानंतर आइस बाथ घेणे आरोग्याची तक्रार दूर होण्यास मदत करू शकते. संशोधनातून असे दिसून आले आहे की, तीव्र व्यायामानंतर लगेचच ‘आइस बाथ’ घेतल्याने स्नायूंच्या वेदना कमी होऊ शकतात. स्नायूंची ताकद, शक्ती व लवचिकता यांसारख्या बाबींमध्ये सुधारणा होण्यासाठी ‘आइस बाथ’ मदत करू शकतो हेदेखील दर्शविले गेले आहे.

व्यायामानंतर होणारी जळजळ, स्नायूंना येणारी सूज व स्नायूंचे नुकसान कमी करून, सुधारणा करण्यास आइस बाथ साह्यभूत ठरतो. तसेच, ‘आइस बाथ’मुळे लॅक्टेटसारख्या मेटाबोलाइट्सचे क्लिअरन्स सुधारतात. म्हणून जर तुम्हाला सलग दोन दिवस तीव्र व्यायाम करावा लागत असेल, तर ‘आइस बाथ’ हा एक चांगला पर्याय असू शकतो; परंतु तुम्ही खेळाडू असलात तरीही तो सातत्याने वापरला जाऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

आइस बाथचा एक मार्ग म्हणजे या व्यायामानंतर स्नायूंच्या ऊतींमध्ये होणारी जळजळ कमी करणे, स्नायू बरे होणे या बाबतीत मदत मिळते. परंतु, ही जळजळ शरीराला परिस्थितीशी जुळवून घेण्यास आणि मजबूत होण्यास मिळणारा सिग्नल म्हणूनही काम करते. या कारणामुळे आइस बाथचा जास्त वापर (म्हणजे बहुतेक प्रशिक्षण सत्रांनंतर) केल्याने ताकद, सहनशक्ती व शक्ती, तसेच स्नायूंच्या वाढीतील प्रशिक्षणाशी संबंधित वाढही मंदावू शकते. विशेष बाब म्हणजे आइस बाथमुळे अॅरोबिक फिटनेसला हानी पोहोचत नाही. याचा अर्थ असा की अॅरोबिक प्रशिक्षण सत्रांनंतर तुम्हाला पाहिजे तितक्या वेळा आइस बाथ वापरणे योग्य ठरू शकते.

आइस बाथ आणि सामान्य आरोग्य

अलीकडेच, आइस बाथने व्यापक फिटनेस आणि वेलनेस समुदायांमध्ये लोकप्रियता मिळवली आहे. समर्थकांचे म्हणणे आहे की, आइस बाथ मानसिक आरोग्य, रोगप्रतिकार शक्ती यांसाठी फायदेशीर ठरू शकतो. परंतु, या क्षेत्रातील संशोधन सध्या तरी कमी आहे.

आम्ही अलीकडेच सामान्य लोकसंख्येमध्ये (खेळाडूंऐवजी) आइस बाथ आणि आरोग्य परिणामांवर आधारित सर्व प्रकाशित संशोधनांचे परीक्षण करणारा एक पद्धतशीर आढावा घेतला.

आम्हाला ११ अभ्यासांतून आढळले, त्यापैकी काहींमध्ये बर्फाच्या आंघोळीऐवजी थंड पाण्याने आंघोळ करण्याचा वापर करण्यात आला. पुराव्यांवरून असे दिसून आले आहे की, नियमितपणे थंड पाण्याने अंघोळ केल्याने ताणतणावात थोडीशी घट होऊ शकते. तसेच, झोपेची गुणवत्ता व स्वतःचे जीवनमान यांत थोडीशी सुधारणा होऊ शकते आणि सर्दी किंवा फ्लू हे आजारही कमी होऊ शकतात.

काही धोके आहेत का?

लोकसंख्येच्या पातळीवर बर्फाच्या अंघोळीच्या धोक्यांचे परीक्षण करणारे कोणतेही संशोधन झालेले नसले तरी काही संभाव्य धोके आहेत.
क्वचित प्रसंगी थंड पाण्यात बुडवल्याने किंवा अंघोळ केल्याने कोल्ड शॉक होतो, असे दिसून आले आहे. ही स्थिती त्वचेच्या तापमानात जलद घट झाल्यामुळे होते. त्यामुळे श्वास लागणे, हायपर व्हेंटिलेशन, उच्च रक्तदाब आणि क्वचितच, कार्डियाक अ‍ॅरिथमिया (हृदयाचे अनियमित ठोके) होऊ शकतात, ज्यावर लवकर उपचार न केल्यास ते घातक ठरू शकते.

बर्फाच्या अंघोळीत जास्त वेळ (३० मिनिटांपेक्षा जास्त) राहिल्याने हायपोथर्मियाचा धोका वाढू शकतो. असे काही पुरावे आहेत, जे शरीराचे तापमान धोकादायकपणे कमी करते.

जर तुम्ही आइस बाथ घेण्याचा विचार करीत असाल, तर महत्त्वाच्या टिप्स

जर तुम्ही आइस बाथ घेण्याचा विचार करीत असाल, तर काही गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत.

जास्त थंड होऊ नका : बहुतेक संशोधनांतून असे दिसून आले आहे की, १०-१५°C तापमान त्यांच्या परिणामकारकतेला अनुकूल करण्यासाठी पुरेसे थंड असते.

जास्त वेळ आईस बाथमध्ये राहू नका : संशोधनानुसार बर्फाच्या अंघोळीचा कालावधी बऱ्याचदा बदलतो. काही जण फक्त तीन मिनिटांपर्यंत टिकतात; तर काही जण ३० मिनिटांपर्यंत. तथापि, सर्वांत सामान्य श्रेणी १०-२० मिनिटे आहे, जी आरोग्य आणि व्यायामानंतरचे फायदे मिळविण्यासाठी पुरेशी आहे, असे दिसते. म्हणून जर तुम्ही आइस बाथसाठी नवीन असाल, तर एकूण १० मिनिटांपासून सुरुवात करा.

हळूहळू आत जा : थंड पाण्यात बुडवल्यानंतर पहिल्या ३० सेकंदांत तुमचा ताण शिगेला पोहोचतो आणि नंतर तो कमी होतो. तीव्र थंडीचा धक्का बसण्याची शक्यता कमी करण्यासाठी, तुमच्या छातीचा वरचा भाग आणि तुमचा चेहरा नेहमी पाण्यापासून दूर ठेवा.

तुम्हाला कसे वाटते त्याचे निरीक्षण करा : आइस बाथमध्ये तुम्हाला कसे वाटते आहे याकडे लक्ष द्या. थरथरणे सामान्य असले तरी, चक्कर येणे किंवा सुन्न होणे हे एक लक्षण असू शकते.

विचार करून वापर करा : जर तुम्ही स्नायूंची ताकद, शक्ती किंवा आकार सुधारण्यासाठी प्रशिक्षण घेत असाल, तर आइस बाथ दैनंदिन दिनचर्या म्हणून वापरण्याऐवजी आइस बाथ कमी प्रमाणात वापरण्याचा विचार करा.

Story img Loader