TB Transmitted Through Kissing or Sexual Contact: क्षयरोग (टीबी) हा एक अत्यंत संसर्गजन्य जीवाणू आहे, जो प्रामुख्याने फुफ्फुसांवर परिणाम करतो. परंतु, शरीराच्या इतर भागांमध्येदेखील तो पसरू शकतो. जेव्हा एखादी संक्रमित व्यक्ती खोकते, शिंकते किंवा बोलते तेव्हा क्षयरोग हवेतील थेंबांद्वारे पसरतो हे सर्वज्ञात आहे.
तथापि, एखाद्याला असा प्रश्न पडू शकतो की हा आजार चुंबन किंवा लैंगिक संपर्कामुळे पसरू शकतो का? क्षयरोग फुफ्फुसांच्या पलीकडे असलेल्या भागांवरदेखील परिणाम करू शकतो, जसे की लिम्फ नोड्स (lymph nodes), हाडे आणि अगदी जननेंद्रिय, श्वसनमार्गाबाहेरील संक्रमणाबद्दलदेखील चिंता कायम आहे.
वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वे हवेतून क्षयरोगाच्या प्रसारावर भर देतात, परंतु जवळच्या शारीरिक संपर्कातून क्षयरोग पसरण्याची शक्यता अजूनही उत्सुकतेचा विषय आहे.
तर, चुंबनाद्वारे क्षयरोगाचे जीवाणू संक्रमित होऊ शकतात का?

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

डॉ. विकास मित्तल, पल्मोनोलॉजिस्ट आणि संचालक, वेलनेस होम क्लिनिक अँड स्लीप सेंटर, पश्चिम विहार आणि संचालक, श्वसन औषध विभाग, सी के बिर्ला हॉस्पिटल, पंजाबी बाग, म्हणतात, “क्षयरोग हा प्रामुख्याने मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस (Mycobacterium tuberculosis) बॅक्टेरियामुळे होणारा फुफ्फुसांचा संसर्ग आहे. संक्रमित व्यक्ती खोकते, शिंकते किंवा बोलते तेव्हा हवेतील लहान थेंबांद्वारे ते पसरते. जर एखाद्याच्या घशात किंवा लाळेत सक्रिय टीबी असेल तर चुंबनाद्वारे हा जीवाणू पसरण्याची शक्यता असते.

तथापि, ते पुढे म्हणतात की, टीबी पसरण्याचा हा सर्वात सामान्य मार्ग नाही. “प्रसाराचा मुख्य मार्ग हवा हाच आहे. जिथे बॅक्टेरिया फुफ्फुसांमध्ये श्वासाद्वारे जातात. थेट लाळेची देवाणघेवाण धोकादायक ठरू शकते, कारण चुंबन घेताना जवळच्या संपर्कात आल्यास संक्रमित थेंब श्वासात जाण्याची शक्यता असते.

लैंगिक संपर्काद्वारे क्षयरोग पसरण्याचा धोका, विशेषतः जननेंद्रियाच्या क्षयरोगाच्या बाबतीत डॉ. मित्तल म्हणतात, “जननेंद्रियाचा क्षयरोग हा फुफ्फुसाबाहेरील क्षयरोगाचा एक प्रकार आहे, म्हणजेच तो फुफ्फुसाबाहेरील भागांवर, जसे की पुनरुत्पादक अवयवांवर परिणाम करतो. या प्रकारचा टीबी सामान्यतः एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला थेट संक्रमित होण्याऐवजी शरीराच्या दुसऱ्या संक्रमित भागातून बॅक्टेरिया पसरल्यामुळे होतो.”

ते पुढे म्हणतात, “जननेंद्रियाचा क्षयरोग लैंगिक संपर्काद्वारे पसरतो असे कोणतेही ठोस पुरावे नाहीत. तथापि, क्षयरोगाचे जीवाणू शारीरिक द्रवांमध्ये असू शकतात आणि क्वचित प्रसंगी, उघडे फोड किंवा जखमा असल्यास संक्रमणाचा धोका असू शकतो. पण एकंदरीत, क्षयरोगाचे लैंगिक संक्रमण अत्यंत दुर्मीळ मानले जाते.

चुंबन किंवा जवळीक साधून सुप्त क्षयरोगाचा संसर्ग होऊ शकतो का?

डॉ. मित्तल म्हणतात की, सुप्त क्षयरोग म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या शरीरात क्षयरोगाचे जीवाणू असतात, परंतु ते जीवाणू निष्क्रिय असतात आणि लक्षणे निर्माण करत नाहीत. “सुप्त क्षयरोग असलेल्या लोकांमधून हा आजार इतरांना पसरत नाही, कारण त्यांच्या फुफ्फुसात किंवा लाळेत जीवाणू निष्क्रिय असतात. याचा अर्थ असा की जवळचा संपर्क, ज्यामध्ये चुंबन किंवा जवळीक यांचा समावेश आहे, त्यामुळे संसर्गाचा कोणताही धोका निर्माण होत नाही,” असं ते स्पष्ट करतात.

जर भविष्यात सुप्त क्षयरोग सक्रिय झाला तर डॉ. मित्तल म्हणतात की, अशी व्यक्ती नंतर बॅक्टेरिया पसरवू शकते, सामान्यतः खोकण्याद्वारे किंवा शिंकण्याद्वारे. म्हणूनच सुप्त क्षयरोग असलेल्या लोकांना तो सक्रिय होण्यापासून रोखण्यासाठी अनेकदा उपचार दिले जातात.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tb transmitted through kissing or sexual contact know about tuberculosis disease dvr